Cm Eknath Shinde : एकनाथ शिंदे सरकारची शनिवारी अग्निपरीक्षा, बहुमत सिद्ध करण्याचे राज्यपालांचे आदेश

राज्यपालांनी एकनाथ शिंदे सरकारला शनिवारी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता या बहुमत चाचणीकडेही संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

Cm Eknath Shinde : एकनाथ शिंदे सरकारची शनिवारी अग्निपरीक्षा, बहुमत सिद्ध करण्याचे राज्यपालांचे आदेश
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 30, 2022 | 9:20 PM

मुंबई : राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून आजच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शपथ घेतली आहे. तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) शपथ घेतली आहे. या नव्या सरकारची येत्या शनिवारी अग्निपरीक्षा असणार आहे. राज्यपालांनी एकनाथ शिंदे सरकारला शनिवारी बहुमत सिद्ध करण्याचे (Floor Test) आदेश दिले आहेत. त्यामुळे आता या बहुमत चाचणीकडेही संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. येत्या शनिवारी विधानसभेचं हे विषेश अधिवेशन आहे. विधानसभा अध्यक्षांची निवडही येत्या शनिवारीच आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा येणारा शनिवार हा मोठा ठरणार आहे. आम्ही राहिलेली कामं पुढे घेऊन जाणार आहे. रखडलेल्या प्रकल्पांनाही चालना देण्याचा निर्णय झालेला आहे. तसेच महाराष्ट्रातील सर्वांत विकास हाच आमचा उद्देश आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. तर आजच त्यांनी पदभारही स्वीकारला आहे.

सरकार अग्निपरीक्षा सहज पार करणार

कुठल्याही सरकारला अस्तिावत आल्यानंतर आपलं बहुमत सिद्ध करावं लागतं. तसेच या सरकारलाही बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. उद्धव ठाकरे सरकार आपले बहुमत सिद्ध करण्यास अपयशी ठरल्यानेच हे सरकार अस्तित्वात आले आहे. एकनाथ शिंदे यांचं बंड हे ठाकरे सरकारला घेऊन डुबलं आहे. त्यामुळे राज्यात आता भाजप आणि शिंदे गटाचं सरकार आहे. याही सरकारला आपलं बहुमत हे सिद्ध करावेच लागणार आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्याकडील आमदारांचं आकडा पहिल्यास या सरकारला बहुमत सिद्ध करणे खूप कठीण जाईल, असे वाटत नाही. त्यामुळे नवे सरकार ही सुद्धा अग्निपरीक्षा सहज पार करेल असा विश्वास आता भाजप नेत्यांकडूनही व्यक्त करण्यात येत आहे.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

आपण नवीन सुरुवात करत आहोत. आपल्यासोबत अनुभवी उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यामुळे कारभार करण्यास अडचण येणार नाही राज्यातील विकास कामे विविध प्रकल्प आणि समाज घटकाला न्याय देण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी हातात हात घालून काम करावे लागते ही एका रथाची दोन चाके आहेत लोकांनी आपल्यावर विश्वास दाखवला आहे. तो सार्थ ठरवायाचा आहे. आपल्या कामातून गती किमान शासन प्रशासन आहे. असा संदेश जाणे मेट्रो समृद्धी महामार्ग जलसंपदा विभागांचे महत्त्वाचे प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करावयाचे आहेत त्यासाठी प्रशासनाचे सहकार्य मिळेलच, हा विश्वास आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.