CM Uddhav Thackeray | कुठलीही गर्दी न करता कार्तिकी वारी साधेपणाने पार पाडा; मुख्यमंत्र्यांचं आवाहन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री 8 वाजता समाजमाध्यमांद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत.

CM Uddhav Thackeray | कुठलीही गर्दी न करता कार्तिकी वारी साधेपणाने पार पाडा; मुख्यमंत्र्यांचं आवाहन
Follow us
| Updated on: Nov 22, 2020 | 9:54 PM

मुंबई : कोरोनाची पुढील लाट ही लाट नसून त्सुनामी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना गाफिल राहू नये, हात धुणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे आणि मास्क लावणे या त्रिसूत्रीचं काटकोरपणे पालन करावं, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी आज (22 नोव्हेंबर) समाजमाध्यमांद्वारे (CM Uddhav Thackeray addressing Maharashtra) राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोनाच्या राज्यातील स्थितीबाबत माहिती दिली. तसेच, नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं (CM Uddhav Thackeray addressing Maharashtra).

LIVE 

[svt-event title=”छत्रपती शिवाजी महारांचा महाराष्ट्र, जे म्हणतो ते करुन दाखवतो – मुख्यमंत्री” date=”22/11/2020,8:20PM” class=”svt-cd-green” ] छत्रपती शिवाजी महारांचा महाराष्ट्र, साधुसंतांचा महाराष्ट्र हा जिद्दी आहे, तो जे म्हणतो ते करुन दाखवतो – मुख्यमंत्री [/svt-event]

[svt-event title=”आता लॉकडाऊनच्या दिशेने जायचे की कुठे जायचं यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं – मुख्यमंत्री” date=”22/11/2020,8:15PM” class=”svt-cd-green” ] कोरोनाचे संकट संपलेलंन नाही. कोरोनाची त्सुनामी येण्याची शक्यता, अजूनही वेळ गेलेली नाही, आज महाराष्ट्राची स्थिती नियंत्रणात आहे, आपण सध्या एका वळणावर, पण आता लॉकडाऊनच्या दिशेने जायचे की कुठे जायचं यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं – मुख्यमंत्री [/svt-event]

[svt-event title=”मास्क घाला, हात धूवा आणि दोन हात अंतर ठेवा – मुख्यमंत्री ” date=”22/11/2020,8:12PM” class=”svt-cd-green” ] मास्क घाला, हात धूवा आणि दोन हात अंतर ठेवा हिच त्रिसूत्री आहे, हेच उपाय महत्त्वाचे आहेत – मुख्यमंत्री [/svt-event]

[svt-event title=”24, 25 कोटी जनतेला आपल्याला लसीकरण करायचं आहे – मुख्यमंत्री” date=”22/11/2020,8:11PM” class=”svt-cd-green” ] लस हाताशी आलेली नाही, अजूनही हातात काहीही आलेलं नाही, जरी डिसेंबरमध्ये आली तर राज्यातील 12-साडे 12 कोटी जनतेला ही लस द्यायची आणि त्याचे डबल डोज द्यायचे म्हणजे 24, 25 कोटी जनतेला आपल्याला लसीकरण करायचं आहे [/svt-event]

[svt-event title=”आपणच आपली जबाबदारी पाळली पाहिजे – मुख्यमंत्री” date=”22/11/2020,8:11PM” class=”svt-cd-green” ] रात्रीचा कर्फ्यू करण्याचं मला काही लोक सूचवत आहेत, पण सर्व गोष्टी कायदे करुन होणार नाही, आपणच आपली जबाबदारी पाळली पाहिजे, दिवाळीत आपण फटाके फोडले नाहीत, त्यासाठी कायदे करणअयाची गरज पडली नाही – मुख्यमंत्री [/svt-event]

[svt-event title=”सर्व उघडलं म्हणजे कोरोना गेला, असं नाही – मुख्यमंत्री” date=”22/11/2020,8:10PM” class=”svt-cd-green” ] कृपा करुन असं समजू नका की सर्व उघडलं म्हणजे कोरोना गेला, अजित दादा बोलले की गर्दी इतकी झाली की त्यात कोरोना चेंगरुन मेला, तर असं नसतं, असा कोरोना जात नाही [/svt-event]

[svt-event title=”महाराष्ट्राने प्रत्येक लढ्यात यश मिळवलं” date=”22/11/2020,8:06PM” class=”svt-cd-green” ] महाराष्ट्राने प्रत्येक लढ्यात यश मिळवलं, कोरोनाची लढाई एकत्रितपणे लढायची आहे – – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे [/svt-event]

[svt-event date=”22/11/2020,8:02PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event date=”22/11/2020,6:57PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

“काल मी हुतात्मा चौक येथे गेलो होतो. संयुक्त महाराष्ट्रामध्ये ज्यांनी बलिदान दिले, त्यामुळे ही राजधानी आपल्याला मिळाली. 4 दिवसांनी 26 नोव्हेंबर येतोय. तोही एक वेगळा लढा होता. मुंबईत घुसलेल्या पाकिस्तानी अतिरेक्यांना बहाद्दर पोलिसांनी, NSG कमांडोंनी तिथे जाऊन ठोकून काढले.”

“ज्या-ज्या वेळेला आपण असा लढा दिला त्या लढ्यात आपण यश मिळवलं. कारण आपली जिद्द! एकदा का महाराष्ट्राने काही करायचं ठरवलं की महाराष्ट्र करून दाखविल्याशिवाय राहत नाही. हा आजपर्यंतचा इतिहास आहे आणि त्याच इतिहासाची पुनरावृत्ती कोरोनाबरोबरच्या लढाईमध्ये करायची आहे.”

“माझे कुटुंब, माझी जबाबदारी” ही मोहीम आपण राज्यभर राबवली. ती राबवताना आशा व अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, पोलिस, महसूल यंत्रणा आणि काही स्वयंसेवी संस्था यांनी अफाट काम केले आहे. गेल्याही वेळी मी त्यांना धन्यवाद दिले आहे, याही वेळेला धन्यवाद देतो.”

“तुम्ही सहकार्य करत आहात म्हणूनच आपण ही लाट, तो आकडा खाली आणू शकलो. पण, मी मागेही बोललो होती की दिवाळीनंतर अधिक काळजी घ्यावी लागेल कारण गर्दी वाढली आहे. असं समजू नका की कोरोनाचं संकट नाहीसं झालं आहे. मला थोडी तुमच्यावर नाराजी पण व्यक्त करायची आहे. आजही अनेक जण मास्क वापरत नाहीत.”

“मी अगदी तळमळीने सांगतोय. पश्चिमात्य देशांत कोरोनाची लाट अधिक गांभीर्याने घेतली गेली आहे. अनेक ठिकाणी लॉकडाऊन केले आहे. दिल्लीत दुसरी-तिसरी लाट आलीए. अहमदाबादमध्ये रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. पहिल्या लाटेशी तुलना केली तर ही दुसरी-तिसरी लाट त्सुनामी आहे की काय अशी भीती वाटते.”

“आपल्याकडे आरोग्य व्यवस्था, आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. अगदी रुग्णशय्या, डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, महसूल यंत्रणा, पोलिस यंत्रणा आहे. पण त्यांना किती राबवून घ्यायचे? त्यांच्यावर किती ताण टाकायचा? गेले ८ महिने ते सतत दिवसरात्र काम करताहेत, अहोरात्र मेहनत करताहेत.”

“आजपर्यंत हे सिद्ध झालेलं आहे की ज्येष्ठ नागरिक आणि ज्यांना सहव्याधी आहेत, त्यांच्यावर कोरोना घातक दुष्परिणाम करतो, त्यांना अधिक घायाळ करतो किंबहुना काहीजणांचे त्यात दुर्दैवी मृत्यू देखील होतात. आताच्या लाटेमध्ये तरुण देखील संक्रमित होत आहेत. तरुणांमुळे ज्येष्ठांनाही लागण होऊ शकते.”

“आज मी तुमच्यासमोर एवढ्यासाठीच आलो आहे की कृपा करून असं समजू नका की सगळं आता उघडलं म्हणजे कोरोना गेला. आज सुद्धा लस हाताशी आली नाही आहे. काल-परवा मी काही जणांशी बोललो. लस येते येते म्हणतात पण अजूनही हातात काही आलं नाही.”

“आता नवीन गोष्ट लक्षात येत आहे ते म्हणजे पोस्ट कोविड, कोविड होऊन गेल्यानंतरचे दुष्परिणाम. मेंदू, किडनी, पोट, फुफ्फुसे, श्वसन संस्थेवर परिणाम होतात आणि काही जणांना त्याचे नंतर दुष्परिणाम भोगावे लागतात. कशासाठी आपण ही विषाची परीक्षा घ्यायची? का आपण त्याकडे दुर्लक्ष करायचं?”

“म्हणून तीच त्रिसूत्री महत्त्वाची आहे… मास्क घाला, दोन हात अंतर ठेवा आणि हात धूत रहा. दोन हात, चार हात, जितकं लांब राहता येईल तितकं रहा.”

“अनावश्यक गर्दी टाळली गेली पाहिजे. आता ऑफिसेस सुरू झाले, सगळ्या गोष्टी सुरू झाल्या तरी अजूनही आपण शाळा नाही उघडू शकलो. निर्णय घेतला आहे पण अजूनही उघडू शकू की नाही हे प्रश्नांकित आहे. शालेय विद्यार्थी, शिक्षक आजारी असतील तर काय ही सगळी काळजी घेत आपण पुढे जात आहोत.”

“मला यात काही राजकारण आणायचं नाहीए. हे उघडा, ते उघडा… सगळं उघडतो, जबाबदारी घेता? जेवढी माझ्या जनतेची जबाबदारी सरकारच्या माध्यमातून माझ्यावर आहे तेवढी हे उघडा, ते उघडा म्हणणाऱ्यांवर नाही.”

“मी अजूनही आपल्याला सांगतो आहे की अनावश्यक ठिकाणी जाऊ नका, आवश्यक नसेल तर घराबाहेर पडू नका आणि लक्षणे दिसली तर ताबडतोब स्वतःवर उपचार करून घ्या किंबहुना चाचणी जरूर करून घ्या. हे मी आपल्याला अत्यंत तळमळीने सांगतो.”

“अजूनही वेळ गेलेली नाही आणि पुन्हा वेळ येणार नाही अशी खात्री मला आहे. आपण एका वळणावर उभे आहोत. आज महाराष्ट्राची रुग्णसंख्या कमी करण्यामागे जशी यंत्रणेची मेहनत आहे, तसेच आपले सहकार्य देखील आहे. पण ह्या वळणावर कोणत्या दिशेने जायचे हे आपण ठरवायचे आहे.”

“आपण सगळेजण जिद्दी आहात. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, साधुसंतांचा महाराष्ट्र जे मनात आणेल ते करुन दाखवतो. म्हणूनच मी आपल्याला आपुलकीच्या भावनेने सांगतो आहे, गर्दी टाळा, अनावश्यक ठिकाणी जाणे टाळा, मास्क लावणे विसरु नका, हात धूत रहा, एकमेकांपासून अंतर ठेवा.”

“पुन्हा आपल्या सांगतो हीच त्रिसुत्री आपल्याला या व्हायरसपासून लांब ठेवू शकते. या धोक्याच्या वळणावर सावध राहण्यासाठी मी आपल्याशी संवाद साधला आहे. आपले हे महाविकास आघाडीचे सरकार जे जे शक्य असेल ते पूर्ण, पूर्ण आणि पूर्ण करुन दाखवल्याशिवाय राहणार नाही, हे वचन मी आपल्याला देतो.”

“आजपर्यंत जे सहकार्य आपल्याकडून मिळाले, तशाच सहकार्याची यापुढेही अपेक्षा करून तूर्त मी आपली रजा घेतो.”

राजधानी दिल्लीत कोरोनाचा उद्रेक

गेल्या काही दिवसांपासून राजधानी दिल्लीत कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. दिल्लीत दर दिवशी हजारो लोकांना कोरोनाची बाधा होत आहेत. तर दिल्ली पाठोपाठ मुंबईची परिस्थिती चिंताजनक होताना दिसत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

त्याशिवाय कोरोनाचा वाढता आकडा, लोकलमध्ये गर्दी, तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे यांसह अनेक कारणामुळे लोकलचा निर्णय लांबणीवर पडला आहे. कोरोनाचा वाढता आकडा पाहता मुंबईतील सर्व शाळा मात्र 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, मुंबईत काल कोरोनाचे 1092 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर  1053 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 17 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या 9325 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत वाढ

16 नोव्हेंबर – 409 17 नोव्हेंबर – 541 18 नोव्हेंबर – 871 19 नोव्हेंबर – 924 20 नोव्हेंबर – 1031 21 नोव्हेंबर – 1092

(CM Uddhav Thackeray addressing Maharashtra)

संबंधित बातम्या : 

मुंबई महापालिका अलर्ट मोडवर, कोरोनाची दुसरी लाट परतवून लावण्यासाठी उपाययोजना

Mumbai Corona | मुंबईत कोरोनाचा चढता क्रम, पाच दिवसात रुग्णांची संख्या दुप्पट

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.