मुलगी पळवून नेऊ म्हणणारे विधानसभेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
"तुम्हाला जी मुलगी आवडली, ती पळवून आणा असं, सांगणारे राजकारणी आहेत, ते निवडून येतात."
मुंबई : “तुम्हाला जी मुलगी आवडली, ती पळवून आणा असं, सांगणारे राजकारणी (CM Uddhav Thackeray At VidhanParishad ) आहेत, ते निवडून येतात. ते इथे आहेत. सैनिकांच्या पत्नीबद्दल बोलणारे इथे आहेत. मतांच्या राजकारणासाठी एवढे आपण आगतिक आहोत”, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महिला सुरक्षेवरुन विधानपरिषदेत विरोधकांवर हल्लाबोल केला.
“महिला अत्याचारांना चाप लावायचा असेल, तर संस्कारक्षम (CM Uddhav Thackeray At VidhanParishad ) समाज निर्माण करण्याची गरज आहे. याची सुरुवात प्रत्येकानेच आपल्या घरापासून केली, तरच खऱ्या अर्थानं महिला सक्षमीकरण होईल”, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यांनी आज विधानपरिषदेत केलं.
येत्या महिला दिनाच्या निमित्तानं, विधानपरिषदेत आज ”महिलांच्या शाश्वत विकासाची उद्दिष्ट आणि महिला सक्षमीकरण” यासंदर्भातला ठराव उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मांडला होता. या प्रस्तावावरील चर्चेला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं.
“फक्त कायदे कडक करुन चालणार नाहीत, तर पक्षाच्या आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन चांगला समाज घडवायचा असेल, तर नतद्रष्टांचा माज उतरवायला हवा, महिलेचा अपमान करणारा राज्यकर्ता असूच शकत नाही”, असं यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.
“महिला अत्याचारांची जबाबदारी सरकार म्हणून टाळणार नाही. मात्र, संस्कार हा विषय अत्यंत महत्वाचा आहे, तो घराघरात रुजवायला हवा”, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.
हेही वाचा : मित्राने मला समजावं, म्हणून अर्थसंकल्पावर सोप्या भाषेत पुस्तक लिहिलं : उद्धव ठाकरे
“देशाचं रक्षण करायला महिला सज्ज आहेत. मात्र, महिलांचं रक्षण करण्यासाठी कोणी आहे का? हा मोठा प्रश्न आपल्यासमोर आहे”, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी महिलांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली.
मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर आक्षेप, विरोधकांचा गोंधळ, विधानपरिषदचे कामकाज तहकूब
मुख्यमंत्र्यांच्या विधानपरिषदेतील भाषणावर आक्षेप घेत विरोधकांनी गोंधळ घातल्याने विधानपरिषदचे कामकाज आज (5 मार्च) 5 वाजल्यानंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
विधानपरिषदेत दुपारी 3 वाजल्यानंतर महिलासक्षमीकरण विषयावर चर्चा सुरु झाली. दरम्यान, प्रसाद लाड हे भाषण करत असताना अचानक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रसाद लाड यांच्या एका मुद्द्यावर उत्तर द्यायला सुरुवात केली. मात्र, यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी या संपूर्ण चर्चेलाच उत्तर दिले आणि निघून गेले.
हेही वाचा : मुंबईच्या महापौरांनी भाजपचा विरोधी पक्षनेतेपदाचा दावा फेटाळला
यावर विरोधकांनी तीव्र आक्षेप नोंदवला. अनेक सदस्यांची भाषणे बाकी असतांना, आपलं मत मांडायला तयार असतांना शासनाने, मुख्यमंत्री यांनी लगेच उत्तर द्यायला कशी सुरुवात केली? सभागृहाला कल्पना का दिली नाही?, असा प्रश्न उपसभापती नीलम गोऱ्हे यांना विचारण्यात आला. मात्र, उमसभापती गोऱ्हे यांनी पुढील कामकाज पुकारले. यावर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला. त्यामुळे विधानमपरिषदेचं कामकाज (CM Uddhav Thackeray At VidhanParishad ) दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
महिला सुरक्षित राहण्याची जबाबदारी पुरुषांची आहे : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही महिला सुरक्षेवर त्यांची प्रतिक्रिया दिली. आदित्य ठाकरे म्हणाले, “घरात, शाळेत संस्कार स्त्री करते. आपण मुलांना चांगला स्पर्श, चुकीचा स्पर्श यातील फरक शिकवला पाहिजे. महिला अत्याचार झाले की, आपण स्त्रीला प्रश्न विचारतात. पण, पुरुषांना प्रश्न विचारत नाही. स्त्रीने काय कपडे घातले, किती वाजता बाहेर गेली, हेच बोललं जातं.”
“आपण महिला स्वरक्षणाचे धडे शिकवले पाहिजे. महिला सुरक्षित राहण्याची जबाबदारी पुरुषांची आहे, स्त्री-पुरुष समानता शाळेत शिकवली पाहिजे. महिला कमकुवत नाही हे बिंबवलं पाहिजे”
“जे महिला करतात ते पुरुषही करतात. मोठ्या हॉटेलमध्ये शेफ जेवण बनवतात. महिला पोलीस अधिकारी जिथे असतात तिथे कायदा सुव्यवस्था चांगली असते. मला कुणाकडे बोट दाखवायचे नाही. हातात बांगडी घातली का? हे बोललं जातं. झाशीची राणी बांगड्या घालून युद्ध लढली. पृथ्वी ही ती आहे. ती धरती माँ आहे. आपल्या शिव्या ह्या कोण नावाने असतात त्या आई बहिणीच्या नावाने आहेत वडील, भाऊच्या नावाने नाहीत”, असं मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं.