मुख्यमंत्र्यांचा विश्वास नांगरे पाटलांना मध्यरात्री फोन, म्हणाले…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना नववर्षाच्या पूर्वसंध्येला फोन केला.

मुख्यमंत्र्यांचा विश्वास नांगरे पाटलांना मध्यरात्री फोन, म्हणाले...
Follow us
| Updated on: Jan 03, 2021 | 7:09 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना नववर्षाच्या पूर्वसंध्येला फोन केला. मुख्यमंत्र्यांनी फोन करुन मला या वर्षीची सुरुवात माझ्या मुंबई पोलीस दलातील बहाद्दर जवानांसोबत करायची आहे, असं मुख्यमंत्री नांगरे पाटील यांना म्हणाले. नांगरे पाटलांनी खास फेसबुक पोस्ट शेअर करत मुख्यमंत्र्यांच्या फोनबद्दलचा खास अनुभव शेअर केला आहे. (Cm uddhav Thackeray Call Mumbai joint Commissioner Vishawas nangare patil)

मध्यरात्री मुख्यमंत्र्यांना नववर्षाच्या शुभेच्छा देणारा संदेश पाठवला. सुखद धक्का देणारा मा मुख्यमंत्री महोदयांचा फोन आला. विश्वासराव मला या नवीन वर्षाची सुरुवात माझ्या मुंबई पोलीस दलातील बहाद्दर जवानांसोबत करायची आहे. रात्रभर तुम्ही काम करून थकाल. मी दुपारी एक वाजता येतो, असं मुख्यमंत्री फोनवर म्हणाल्याचं नांगरे पाटलांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

कोरोनाशी लढा देताना गेले वर्षभर 98 पोलिस अधिकारी आणि कर्मचारी शहीद झाले. हजारो जन योद्धयाप्रमाणे या आजाराशी झुंजले. कोरोना शहीदांच्या कुटुंबीयांना शासनाकडून मिळणारी 50 लक्ष आणि पोलीस आयुक्तांच्या पुढाकाराने मिळणारी 10 लक्ष मदत ही पथदर्शी आहे. अशा कर्मचाऱ्यांसाठी राज्याच्या प्रमुखांची अशी दिलासादायक भेट ही मनोबल वाढवणारी ठरली, अशा भावना सहपोलिस आयुक्त नांगरे पाटील यांनी व्यक्त केल्या.

गेले वर्षभर दक्षिण मुंबईतील सुमारे 300 जणांच्या चोरीला गेलेल्या मालमत्ता हस्तगत केल्या होत्या. मंगळसुत्र म्हणजे सौभाग्याचं लेणं… चोर ज्यावेळी असा दागिना खेचतो त्यावेळी महिलेला मानसिक धक्का पोहोचतो. आमच्या विनंतीला मान देऊन माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्ही चोरांकडून परत मिळवलेली 25 मंगळसूत्रे संबंधित भगिनींना देऊ केल्यावर त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले, असा भावनिक क्षणही पाटील यांनी पोस्टमध्ये लिहिला आहे.

मुंबई पोलिसांमधील आमच्या उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सन्मान यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला. असाधारण आसूचना पदक प्राप्त पोलीस उपायुक्त गणेश शिंदे आणि एएसआय मुनीर शेख यांचेही कौतुक झाले. एकंदरीत वर्षाची सुरुवात उमेद वाढवणारी ठरली, असं नांगरे पाटील यांनी सरतेशेवटी म्हटलं. (Cm Uddhav Thackeray Call Mumbai joint Commissioner Vishawas nangare patil)

हे ही वाचा

अहंकार सोडा, राजधर्म पाळा, कृषी कायदे मागे घ्या; सोनिया गांधींचा मोदी सरकारवर हल्ला

सरकारं येत असतात, जात असतात; सूडबुद्धीने कोणी काही करू नयेः अजित पवार

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.