सर्वपक्षीय बैठकीत राज ठाकरे यांच्याकडून सरकारला 9 सूचना

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 18 राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबत सल्लामसलत केली. (CM Uddhav Thackeray calls all party meeting amid Corona Lockdown)

सर्वपक्षीय बैठकीत राज ठाकरे यांच्याकडून सरकारला 9 सूचना
Follow us
| Updated on: May 07, 2020 | 3:42 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीला सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह 18 पक्षांच्या नेत्यांना या बैठकीचे निमंत्रण देण्यात आलं होतं. महाराष्ट्रात ‘कोरोना’चे संकट गडद होत असताना उद्धव ठाकरे सर्वपक्षीय नेत्यांची मते जाणून घेत आहेत. (CM Uddhav Thackeray calls all party meeting amid Corona Lockdown)  मुख्यमंत्री सध्याची कोरोना संदर्भातली सरकारची तयारी आणि राजकीय पक्षातील नेत्यांच्या सूचना आणि अपेक्षित सहकार्य याविषयी चर्चा केली.

या बैठकीदरम्यान राज ठाकरे यांनी सरकारला लॉकडाऊच्या एक्झिट प्लॅनबाबत विचारणा केली. तसंच सरकाला 9 सूचना दिल्या.

राज ठाकरे यांच्या नऊ सूचना

1) कंटेन्मेंट झोनमध्ये काही गोष्टी गृहीत धरलं जातं आहे तिथे अधिक फोर्स वाढवा, पोलीस थकले आहेत. ते सुद्धा तणावात आहेत. अशा ठिकाणी काही भाग जे आहेत, महाराष्ट्रात काही ठिकाणी गृहित धरलं जातंय तिथे SRPFलावून दरारा निर्माण करावा. लोक बाहेर येऊ नयेत, कोरोना पसरु नये.

2) हा रमजानचा महिना आहे, अनेक लोक बाहेर पडत आहेत. अनेक सण आपण घरात साजरे केले. मुस्लिम समाजानेही तसा विचार करावा, जर ऐकत नसेल तर फोर्स लावावी

3) छोटे दवाखाने सुरु करावेत. दवाखाने सुरु करताना तिथे पोलीस असावा, रांगांचं नियंत्रण त्यांनी करावा

4) स्पर्धा परीक्षाचे जे तरुण अडकले आहेत, त्यांना घरी पोहोचवण्याची व्यवस्था करावी

5) परप्रांतिय कामगार आहेत ते परत येताना त्यांची महाराष्ट्रात येताना तपासणी करावी. ते ज्या राज्यातून येत आहेत, त्यांची परिस्थिती माहित नाहीत. त्यामुळे तपासणी करावी. त्याचवेळी परत येताना त्यांची राज्य स्थलांतरित कायद्याखाली नोंदणी करावी. आजपर्यंत जो गोंधळ झाला होता, आता तो सुधारण्याची वेळ आहे.

6) आता परप्रांतिय गेले आहेत, त्यामुळे कामगारांअभावी महाराष्ट्रातील उद्योग बंद, आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील जे तरुण आहेत, त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवून त्यांना रोजगार द्यावा. परप्रांतिय जे बाहेर गेले आहेत, त्यांच्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांना रोजगार मिळेल, संधी आहे ती घालवू नये..

7) शाळा कशाप्रकारे सुरु करणार? ई लर्निंग वगैरे प्रत्येक ठिकाणी शक्य नाही. शहरातही अनेक ठिकाणी अशक्य आहे. ती बाब पालकांपर्यंत पोहोचवंणं

8) मनपा, सुरक्षा कर्मचारी यांच्याबाबत सुरक्षेची काळजी घ्यावी. सफाई कामगार आजारी पडत आहेत, त्यांनी हात वर केले, तर शहरांची अवस्था काय होईल? त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष द्या

9) सर्वात महत्त्वाची सूचना – हा लॉकडाऊन आहे त्याबाबत सरकारचा एक्झिट प्लॅन काय? जेव्हा केव्हा लॉकडाऊन काढणार, त्याबाबत एक्झिट प्लॅन असावा. जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत तुम्ही लॉकडाऊन ठेवू शकत नाही. तो आयत्यावेळी सांगून उपयोग नाही, त्याची आधी कल्पना द्यावी. तो कसा काढणार, काय सुरु होईल, काय बंद होईल, ते लोकांना सांगावं.

LIVE UPDATE 
  • सर्वपक्षीय बैठकीला सुरुवात, मुख्यमंत्र्यांचा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राजकीय नेत्यांशी संवाद
  • मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, राज ठाकरे मंत्रालयात उपस्थित, थोड्याच वेळात बैठक
  • मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरेही सर्वपक्षीय बैठकीला हजर

सर्वपक्षीय बैठक

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 18 राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबत सल्लामसलत करणार आहेत. महाविकास आघाडीतील दिग्गज नेते या बैठकीला असतील. उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना निमंत्रण आहे.

याशिवाय मनसे अध्यक्ष राज ठाकरेही या बैठकीला उपस्थिती लावणार असल्याची माहित आहे. उद्धव ठाकरे यांनी याआधीही ‘कोरोना’च्या संकट काळात राज ठाकरे यांच्याशी फोनवरुन चर्चा होत असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे राज ठाकरे सरकारला काय सूचना करणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

हेही वाचा : अधिकारी आम्हाला विचारत नाहीत, मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांची नाराजी

विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनाही मुख्यमंत्र्यांनी बैठकीसाठी बोलावले आहे. तसेच एमआयएम, माकप, भाकप, शेकाप अशा लहानमोठ्या 18 पक्षांच्या नेत्यांनाही बोलावले आहे.

कोणकोणत्या पक्षांचे नेते होणार सहभागी

शिवसेना कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस भारतीय जनता पक्ष (CM Uddhav Thackeray calls all party meeting amid Corona Lockdown) महाराष्ट्र नवनिर्माण सेना एमआयएम मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष शेतकरी कामगार पक्ष

(CM Uddhav Thackeray calls all party meeting amid Corona Lockdown)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.