‘..आणि मग लोक तारे दाखवतात’, मुख्यमंत्र्यांच्या शस्त्रक्रियेनंतरच्या पहिल्यावहिल्या संबोधनात भाजपा टार्गेटवर
काही गोष्टी होण्यातल्या नसतात त्या सांगतात आणि लोक फसतात आणि मतं देऊन मोकळी होतात. मग पाच वर्षे काही बोलायचं नाही. मग पुढच्या वर्षी अहो तुम्ही बोलला होतात की, तुमच्यासाठी तारे तोडून आणू, मग लोकं बऱ्याचदा त्यांनाच तारे दाखवतात. तर अशा गोष्टी आपण कधी केल्या नाहीत आणि करणारही नाहीत', अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी भाजपला चिमटा काढलाय.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी जनतेला नवीन वर्षानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. पाठीच्या मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बऱ्याच दिवसांपासून माध्यमांसमोर किंवा जनतेसमोर आले नाहीत. नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनातही (Winter Session) मुख्यमंत्री अनुपस्थित राहिले. त्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीकाही केली. आता मोठ्या कालावधीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे समोर आले. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी जनतेला नव वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. तसंच यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार निशाणाही साधलाय.
‘राजकारण म्हटल्यावर आपण काही केलं तर भ्रष्टाचार केला, नाही केलं तर यांनी काहीच केलं नाही. मग शेवटी आपली टिमकी आपल्यालाच वाजवावी लागते की आम्ही हे केलं, आम्ही ते केलं. आम्ही हे करु, आम्ही ते करु आणि यालाच तर राजकारण म्हणतात. अनेकजण असे आहेत की वाटेल ते सांगतात. आम्ही तुमच्यासाठी तारे तोडून आणू, आम्ही तुमच्यासाठी चंद्रावर उड्डाणपूल बांधून देऊ. या काही गोष्टी होण्यातल्या नसतात त्या सांगतात आणि लोक फसतात आणि मतं देऊन मोकळी होतात. मग पाच वर्षे काही बोलायचं नाही. मग पुढच्या वर्षी अहो तुम्ही बोलला होतात की, तुमच्यासाठी तारे तोडून आणू, मग लोकं बऱ्याचदा त्यांनाच तारे दाखवतात. तर अशा गोष्टी आपण कधी केल्या नाहीत आणि करणारही नाहीत’, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी भाजपला चिमटा काढलाय.
मुंबईकरांना नवीन वर्षाचं मोठं गिफ्ट
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नगरविकास खात्याची ऑनलाईन बैठक आज पार पडली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी 500 चौरसफुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करत असल्याची मोठी घोषणा आज केली आहे. 500 चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करात माफी दिल्यामुळे आता महापालिकेचा दरवर्षी 340 कोटींचा कर बुडणार आहे. मुंबईमध्ये 500 चौरस फुटांचे जवळपास 15 लाख घरे आहेत. ज्यामध्ये 28 लाख कुटुंब राहतात. या कुटुंबांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना नव्या वर्षात हे मोठं गिफ्ट मिळाले आहे.
‘थांबायचं नाही, पण सतर्क आणि सावध राहायला हवं’
तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी ट्विटरद्वारे जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. ‘थांबायचं नाही. पण सतर्क आणि सावध राहायला हवं. कितीही आव्हानं येऊ देत. त्यावर आपण मात करूया. नव्या वर्षात हीच हिंमत बांधुया. आरोग्यदायी, समृद्ध महाराष्ट्र आणि बलशाली भारत घडवण्यासाठी एकजूट होऊया’, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
थांबायचं नाही. पण सतर्क आणि सावध राहायला हवं. कितीही आव्हानं येऊ देत. त्यावर आपण मात करूया. नव्या वर्षात हीच हिंमत बांधुया. आरोग्यदायी, समृद्ध महाराष्ट्र आणि बलशाली भारत घडवण्यासाठी एकजूट होऊया, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 31, 2021
इतर बातम्या :