AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे- नरेंद्र मोदी भेटीचे तीन अर्थ, फडणवीस-पवार भेटीशी संबंध आहे का?

जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) भेटतात, तेव्हा ठाकरे- मोदी भेटीची चर्चा तर होणारच

उद्धव ठाकरे- नरेंद्र मोदी भेटीचे तीन अर्थ, फडणवीस-पवार भेटीशी संबंध आहे का?
Uddhav Thackeray_Narendra Modi
Follow us
| Updated on: Jun 08, 2021 | 7:09 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. राज्यातील मराठा आरक्षणासह (Maratha reservation) विविध 12 मुद्दे यावेळी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांसमोर मांडले. मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची भेट झाली त्यावेळी अजित पवार आणि अशोक चव्हाणही उपस्थित होते. मात्र या भेटीनंतर उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांची वैयक्तिक भेट झाल्याचं सांगण्यात येत आहे. (CM Uddhav Thackeray met PM Narendra Modi what is political Interpretation)

या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) भेटतात, तेव्हा ठाकरे- मोदी भेटीची चर्चा तर होणारच, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी दिली. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि अन्य नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन संवाद प्रारंभ केला, याचा आनंद आहे. संवादाचा नेहमी फायदाच होतो, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

राजकीय विश्लेषक आणि लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान यांनी या भेटीचे राजकीय अर्थ काय असू शकतात, यावर भाष्य केलं आहे.

ठाकरे- मोदी भेटीचे तीन अर्थ

1) संदीप प्रधान यांच्या मते, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये बंद दाराआड झालेली चर्चा ही अर्थातच राजकीय असणार आहे. गेल्या काही दिवसात भाजपच्या राज्यातील नेत्यांनी वेगवेगळ्या मार्गांनी वेगवेगळ्या एजन्सीकडे तक्रारी करून ठाकरे कुटुंब यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे यासंदर्भात कारवाईचा बडगा ठाकरे कुटुंबीयांवर उगारला जाऊ नये याबाबत चर्चा झालेली असू शकते.

2) याखेरीज दोन चार दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली होती. त्यानंतर राजकीय चर्चांना ऊत आला. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटल्यानंतर अशाच राजकीय चर्चांना ऊत यावा याकरिता कदाचित उद्धव ठाकरे यांनी वक्तव्य केले असू शकते.

3) तिसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की महाराष्ट्रात जर शिवसेनेला काही राजकीय निर्णय घ्यायचा असेल, तर त्याबाबतची चर्चा ही केवळ मोदींच्या पातळीवर होऊ शकते असा संकेत राज्यातील भाजपच्या नेत्यांना देणे हाही उद्धव ठाकरे यांचा हेतू असू शकतो, असे मत संदीप प्रधान यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्राचं शिष्टमंडळ मोदींच्या भेटीला 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे एकूण 12 मागण्या मांडल्या आहेत. ओबीसी, मराठा आणि पदोन्नतीतील आरक्षणासह विविध मागण्यांचा त्यात समावेश आहे. मोदींनी या मागण्या गंभीरपणे ऐकून घेऊन त्यात लक्ष घालण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे हे प्रश्न सकारात्मकपणे सोडवले जातील, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या  

‘ते’ दुखणं कायमचं दूर करु, मुख्यमंत्र्यांसमोर अजित पवारांचा पंतप्रधान मोदींना शब्द

मराठा आरक्षण ते मेट्रो कारशेड, मुख्यमंत्र्यांनी मोदींपुढे मांडल्या 12 मागण्या; वाचा सविस्तर

पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात काय चर्चा झाली?, वाचा महत्त्वाचे आणि मोठे 10 मुद्दे

(CM Uddhav Thackeray met PM Narendra Modi what is political Interpretation)

जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.