“ओबीसींना डिवचण्याचा प्रयत्न करु नका, त्यांच्या हक्काचा एक कणही कमी होऊ देणार नाही”
ओबीसींच्या हक्काचं जे असेल त्यातील एक कणही कमी होऊ देणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. (Uddhav thackeray Maratha OBC)
मुंबई : “ओबीसी प्रवर्गातील समाजाला त्यांच्या न्याय्य आणि हक्काचं जे आहे ते देऊ. त्यांच्या हक्काचं जे असेल त्यातील एक कणही कमी होऊ देणार नाही,” असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. सोमवारपासून (14 डिसेंबर) दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनास सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुंबईत पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी बोलताना त्यांनी वरील आश्वासन दिले. (CM Uddhav thackeray on Maratha and OBC reservation)
राज्यात गैरसमज पसरवू नका
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या पार्श्नभूमीवर राज्यातील मराठा समाज आक्रमक झालेला आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी प्रवर्गातील आरक्षणाला धक्का लावू नये, अशी मागणी ओबीसी समाजाकडून होत आहे. या बाबत विचारले असता, “राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यासाठी आमची वकिलांशी चर्चा सुरु आहे. ओबीसी प्रवर्गातील समाजामध्ये गैरसमज पसरवू नये. त्यांच्या हक्काचंं जे आहे, त्यातील एक कणही आम्ही कमी होऊ देणार नाही. त्यांच्या हक्काचं काहीच जाऊ देणार नाही,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. (CM Uddhav thackeray on Maratha and OBC reservation)
विरोधकांनी सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करु नये
यावेळी बोलताना, उद्धव ठाकरे यांनी ओबीसी सामजाच्या आरक्षणाला धक्का लगू देणार नाही असे आश्वसन दिले. तसेच, यावेळी विरोधकांवरही सडकून टीका केली. “ओबीसी समाजामध्ये गैरसमज पसरवू नका. विऱोधकांनी राज्यातील सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करु नये. विरोधकांनी राज्यातील एकजुटीला तडा देऊ नये,” असे सांगत, ओबीसी समाजाला न डिवचण्याचे आवाहन ठाकरे यांनी केले.
यावेळी, पत्रकारांच्या प्रश्नांचे उत्तर देताना त्यांनी विरोधाकांवर चौफेर टीका केली. दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत आपल्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवणं चुकीचं असल्याचं मत त्यांनी मांडलं. तसेच, आपल्याच देशातील लोकांना देशद्रोही ठरवणं आपल्या संस्कारात बसत नसल्याचेही यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.
‘…नाहीतर शेतकऱ्यांच्या घरीदेखील धाडी टाकतील’, उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारला मिश्किल टोलाhttps://t.co/YWR2yLK3WQ @OfficeofUT @CMOMaharashtra @ShivSena @BJP4Maharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 13, 2020
संबंधित बातम्या :
मराठा आरक्षण, कोरोना ते शेतकरी; फडणवीसांचे ठाकरे सरकारला फटकारे; अधिवेशन वादळी ठरण्याचे संकेत
भाजपला ‘ओबीसीं’चा नारा देण्याची वेळ का आलीय?; वाचा राजकीय विश्लेषकांना काय वाटतं?
भुजबळ, वडेट्टीवार वातावरण खराब करत आहेत, सरकारला समाजात तेढ निर्माण करायची आहे का?; मेटेंचा सवाल
(CM Uddhav thackeray on Maratha and OBC reservation)