मुख्यमंत्र्यांच्या ड्रायव्हिंगचं कसब, हात सोडून नमस्कार, स्टिअरिंगवर कसलेले हात
महाविकास आघाडी सरकारचं स्टिअरिंग नेमकं कुणाकडे आहे, हा विषय सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरला आहे (CM Uddhav Thackeray raised hand from steering of car and greeted journalists in Pune).
पुणे : राज्याच्या कारभाराचं स्टिअरिंग नेमकं कुणाकडे आहे, यावरुन वादंग उठला असताना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र प्रत्यक्ष गाडीवरील स्टिअरिंगवरील आपलं कौशल्य दाखवलं. स्टिअरिंगवरील दोन्ही हात सोडून, चालत्या गाडीतून हात जोडून नमस्कार करताना उद्धव ठाकरे पाहायला मिळाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी पुणे दौरा केला (CM Uddhav Thackeray raised hand from steering of car and greeted journalists in Pune).
दिवसभर पुणे प्रशासनाच्या बैठका घेऊन, उद्धव ठाकरे संध्याकाळी मुंबईकडे निघाले. मुख्यमंत्र्यांनी पुण्याच्या शासकीय कार्यालायातून गाडी काढली तेव्हा काही पत्रकार प्रश्न विचारण्यासाठी पुढे आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी गाडीच्या स्टिअरिंगवरुन दोन्ही हात उचलले आणि सर्व पत्रकारांना हात जोडून नमस्कार केला (CM Uddhav Thackeray raised hand from steering of car and greeted journalists in Pune).
पुणे : राज्याच्या कारभाराचं स्टिअरिंग नेमकं कुणाकडे आहे, यावरुन वादंग उठला असताना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र प्रत्यक्ष गाडीवरील स्टिअरिंगवरील आपलं कौशल्य दाखवलं. स्टिअरिंगवरील दोन्ही हात सोडून, चालत्या गाडीतून हात जोडून नमस्कार करताना उद्धव ठाकरे पाहायला मिळाले pic.twitter.com/jwlMvm9UKN
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 30, 2020
महाविकास आघाडी सरकारचं स्टिअरिंग नेमकं कुणाकडे आहे, हा विषय सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान, सत्तेचं स्टिअरिंग राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांकडे आहे, अशी टीका विरोधी पक्षाकडून नेहमी होते (CM Uddhav Thackeray raised hand from steering of car and greeted journalists in Pune).
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
‘स्टिअरिंग’वरुन खेचाखेची
दरम्यान, या स्टिअरिंगवरील चर्चेला सुरुवात झाली ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘सामना’तील मुलाखतीवरुन. “महाविकास आघाडी सरकार हे रिक्षासारखंच आहे. या रिक्षाची स्टेअरिंग माझ्याकडे आहे, तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे प्रमुख पक्ष पाठीमागे बसले आहेत”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘सामना’च्या मुलाखतीत म्हणाले होते.
अजित पवारांकडून स्टिअरिंगवरील फोटो शेअर
मुख्यमंत्र्यांनी स्टिअरिंग आपल्याच हाती असल्याचं सांगितल्यानंतर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 27 जुलै रोजी ट्विटरवर शेअर केलेला फोटो पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. अजित पवारांनी 27 जुलैला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना, दोघांचा एकत्र फोटो शेअर केला होता. उद्धव ठाकरे आणि अजित पवार एकाच गाडीत बसले असून गाडीची स्टिअरिंग अजित पवार यांच्याकडे होतं. त्यामुळे अजित पवारांनी जाणीवपूर्वक स्टिअरिंगवाला फोटो शेअर केला की काय अशी चर्चा रंगली.
Best wishes to the Hon. CM of Maharashtra, ShivSena Party President & Maha Vikas Aghadi Leader, Shri. Uddhav Thackeray ji. Wish you a healthy & long life! @OfficeofUT @CMOMaharashtra pic.twitter.com/PlrNgNg508
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) July 26, 2020
देवेंद्र फडणवीस यांचा टोला
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या स्टिअरिंगच्या विधानावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही टोला लगावला होता. “ऑटोरिक्षाचं स्टिअरिंग उद्धवजींच्या हातात आहे, पण कुठे जायचं ते मागे बसलेले ठरवतात”, असा टोला फडणवीसांनी लगावला.
‘शिवसंग्राम’चे अध्यक्ष विनायक मेटे यांनी तीन दिवसांपूर्वी “राज्यात तीन मुख्यमंत्री आहेत. उद्धव ठाकरे नावाला मुख्यमंत्री, मंत्रालयातून काम करणारे अजित पवार हे दुसरे मुख्यमंत्री, तर शरद पवार हे सुप्रीम मुख्यमंत्री आहेत”, अशी टीका केली. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीदेखील राज्यात दोन-तीन मुख्यमंत्री असल्याचा टोला लगावला होता.
या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी मुंबई ते पुणे आणि त्यानंतर पुणे ते मुंबई असं ड्रायव्हिंग स्वत: केलं. तसं पाहता कोरोना संकट काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत:च्या गाडीचं स्टिअरिंग स्वत: सांभाळतात. स्टिअरिंग कुठलंही असो, ते आपल्याच हातात आहे, हे मुख्यमंत्र्यांनी आज पुन्हा एकदा दाखवून दिलं.
हेही वाचा : सरकार तीनचाकी रिक्षाच, स्टिअरिंग माझ्याकडे, दोघे पाठी : उद्धव ठाकरे