उद्धव म्हणाले, मी पॅकेज घोषित करणारा मुख्यमंत्री नाही, फडणवीस म्हणतात, पॅकेज म्हणा किंवा काहीही, पण पूरग्रस्तांना मदत करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर हे दोन्ही नेते आज कोल्हापूर जिल्ह्यात होते. दोन्ही नेत्यांनी स्वतंत्रपणे कोल्हापुरातील पूरस्थितीची पाहणी केली.

उद्धव म्हणाले, मी पॅकेज घोषित करणारा मुख्यमंत्री नाही, फडणवीस म्हणतात, पॅकेज म्हणा किंवा काहीही, पण पूरग्रस्तांना मदत करा
CM Uddhav Thackeray_Devendra Fadnavis
Follow us
| Updated on: Jul 30, 2021 | 3:55 PM

कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर हे दोन्ही नेते आज कोल्हापूर जिल्ह्यात होते. दोन्ही नेत्यांनी स्वतंत्रपणे कोल्हापुरातील पूरस्थितीची पाहणी केली. या पाहणीनंतर दोघांनीही स्वतंत्र पत्रकार परिषदा घेऊन आपआपली भूमिका मांडली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मी पॅकेज जाहीर करणारा मुख्यमंत्री नाही तर मी मदत करणारा मुख्यमंत्री आहे असं म्हटलं. यावर देवेंद्र फडणवीस यांनी पॅकेज असो की घोषणा, सामान्य माणसाला पैसे मिळणे, मदत मिळणे आवश्यक आहे, असा टोला लगावला.

देवेंद्र फडणवीस यांनीही पत्रकार परिषद घेऊन कोल्हापूरसह राज्यातील पूरस्थितीचा आढावा घेऊन, काही उपाययोजना सुचवल्या. मात्र त्याचवेळी त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारल्या.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “पॅकेज असो की घोषणा, सामान्य माणसाला पैसे मिळणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री त्याला काहीही म्हणूदेत”

केंद्राकडे पैसे मागणार नाहीत असं मुख्यमंत्री म्हणतात. पण NDRF च्या नियमानुसार तिकडे नुकसानाची अहवाल पाठवावा लागतो. ही मदत मिळण्याआधी SDRF मधून आपल्याला पैसे खर्च करता येतात. शिवाय NDRF चे निकष मोदी सरकारनेच बदलले. 2015 पर्यंत हे निकष स्थिर होते. इतक्या वर्षात मोदींनीच नियम बदलून, तोकडी मदत दुप्पट केली, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?

मी पॅकेज जाहीर करणारा मुख्यमंत्री नाही तर मी मदत करणारा मुख्यमंत्री आहे. मी ह्याच्या आधी देखील सांगितलं आहे की मी सवंग लोकप्रियतेसाठी कोणतीही घोषणा करणार नाही. मपण सगळ्या पूरग्रस्तांना मदत नक्की करेन, असा पुनरुच्चार मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज कोल्हापुरात बोलताना केला.

VIDEO :  देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद 

संबंधित बातम्या  

पूरग्रस्तांचं कर्ज माफ करा, नियमित कर्ज भरणाऱ्यांचे 50 हजार रुपये तातडीने द्या; देवेंद्र फडणवीस यांची मागणी

मी पॅकेज घोषित करणारा मुख्यमंत्री नाही तर मदत करणारा मुख्यमंत्री : उद्धव ठाकरे

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.