Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thackery Govt meeting: ‘ आपण अधिकाऱ्यांना ओळखण्यात कमी पडलो, पण आता लढायला पाहिजे’

अशाप्रकारे फोन टॅप होत राहिले तर अधिकाऱ्यांवर विश्वास तरी कसा ठेवायचा, असा उद्विग्न सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला. | CM Uddhav Thackeray

Thackery Govt meeting: ' आपण अधिकाऱ्यांना ओळखण्यात कमी पडलो, पण आता लढायला पाहिजे'
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Mar 25, 2021 | 10:30 AM

मुंबई: मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्यांकडून परस्पर फोन टॅप करण्यात आल्याचा प्रकार उजेडात आल्यानंतर ठाकरे सरकारक खडबडून जागे झाले आहे. परमबीर सिंह आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी ठाकरे सरकारकडून (Thacekray govt) रणनीती आखली जात आहे. त्यासाठी बुधवारी रात्री वर्षा बंगल्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महत्त्वाच्या मंत्र्यांची बैठक पार पडली. (Thackeray govt gears up for battle against bjp and parambir singh letter bomb)

या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन टॅपिंगच्या प्रकाराविषयी संताप व्यक्त केला. आपण अधिकाऱ्यांना ओळखण्यात कमी पडलो. अशाप्रकारे फोन टॅप होत राहिले तर अधिकाऱ्यांवर विश्वास तरी कसा ठेवायचा, असा उद्विग्न सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला. मात्र, आता देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आरोप खोडून काढायला हवेत. त्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन लढले पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांनी महाविकासआघाडीच्या नेत्यांना सांगितले.

तर काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनीही फोन टॅपिंगविषयी चिंता व्यक्त केली. मंत्र्यांचे फोन पोलीस अधिकाऱ्यांकडून टॅप होत असतील तर ही गंभीर बाब आहे. अशा परिस्थितीत कामं करणं अवघड होऊन बसेल, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले.

‘माझ्यावरील आरोप खोटे, मी पैशांची देवाणघेवाण केली नाही’

या बैठकीत गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही स्वत:ची बाजू मांडली. माझ्यावर करण्यात आलेले भ्रष्टाचाराचे आरोप खोटे आहेत. मी पैशांचा कोणताही व्यवहार केलेला नाही, असे अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितल्याचे समजते. दरम्यान, परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी ठाकरे सरकारकडून निवृत्त न्यायाधीशांचा आयोग नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात लवकरच घोषणा होऊ शकते. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही ट्विट करुन दूध का दूध, पानी का पानी करावे!, असे म्हटले आहे.

सुप्रिया सुळेंनी घेतली सोनिया गांधींची चर्चा

परमबीर सिंह यांचा लेटरबॉम्ब आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पोलीस दलातील बदल्यांतील भ्रष्टाचाराचा आरोप केल्यानंतर आता महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) नेते खडबडून जागे झाल्याचे दिसत आहे. या धक्क्यातून सावरत आता सर्व नेते डॅमेज कंट्रोल करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी महाविकासघाडीच्या गोटात जोरदार हालचाली सुरु आहेत.

या पार्श्वभूमीवर गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. सुप्रिया सुळे यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. तुमच्याशी चर्चा करणे हे नेहमीच आनंददायी असते. तुमच्या बहुमोल मार्गदर्शनासाठी खूप खूप आभारी आहे, असे सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता ही चर्चा नेमकी कशासाठी होती, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. संबंधित बातम्या:

महाविकासआघाडीच्या वेगवान हालचाली; सुप्रिया सुळे सोनियांना भेटल्या, मुंबईतही नेत्यांची गुप्त खलबतं

(Thackeray govt gears up for battle against bjp and parambir singh letter bomb)

आमची बदनामी थांबवा; खोक्याच्या बायकोच जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषण
आमची बदनामी थांबवा; खोक्याच्या बायकोच जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषण.
फहीम खानने पोलीसांशी घातली हुज्जत, व्हिडिओ व्हायरल
फहीम खानने पोलीसांशी घातली हुज्जत, व्हिडिओ व्हायरल.
कारागृह पोलीस भरतीसाठी 3 हजार मुलींची गर्दी; गोंधळ उडल्याने दुखापत
कारागृह पोलीस भरतीसाठी 3 हजार मुलींची गर्दी; गोंधळ उडल्याने दुखापत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड न्यायालयात चालणार
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड न्यायालयात चालणार.
औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही; RSS ने स्पष्ट केली भूमिका
औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही; RSS ने स्पष्ट केली भूमिका.
गुन्हेगारीमध्ये महाराष्ट्र कितवा; फडणवीसांनी विधानसभेत थेट मांडले आकडे
गुन्हेगारीमध्ये महाराष्ट्र कितवा; फडणवीसांनी विधानसभेत थेट मांडले आकडे.
नागपूर पोलिसांनी हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं
नागपूर पोलिसांनी हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.
'औरंगजेब तुमचा बाप की तुम्ही त्याच्या खानदानातले',आव्हाड कोणावर भडकले?
'औरंगजेब तुमचा बाप की तुम्ही त्याच्या खानदानातले',आव्हाड कोणावर भडकले?.
'अध्यक्ष महोदय, मी चॉकलेट नाही, कॅडबरी दिली', फडणवीसांचा मिश्किल विनोद
'अध्यक्ष महोदय, मी चॉकलेट नाही, कॅडबरी दिली', फडणवीसांचा मिश्किल विनोद.
लालपरीनं प्रवास करताय? प्रवास करताना एसटी बिघडली तरी नो टेन्शन कारण...
लालपरीनं प्रवास करताय? प्रवास करताना एसटी बिघडली तरी नो टेन्शन कारण....