मुख्यमंत्री आणि शिवसेना आमदारांची समोरासमोर बैठक, नेमकं काय ठरलं?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (28 सप्टेंबर) मुंबईत शिवसेना आमदारांची महत्त्वाची बैठक घेतली (CM Uddhav Thackeray take important meeting of Shivsena MLA).
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (28 सप्टेंबर) मुंबईत शिवसेना आमदारांची महत्त्वाची बैठक घेतली. यावेळी मुख्यमंत्री आणि आमदारांनी समोरासमोर बसून वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा केली (CM Uddhav Thackeray take important meeting of Shivsena MLA). यात निधीच्या कमतरतेपासून मतदारसंघातील इतर प्रश्नांपर्यंतच्या विषयांवर चर्चा झाली. उद्धव ठाकरे यांनी आमदारांच्या अडचणी समजून घेतानाचा ते प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलंय. शिवसेना आमदार आणि प्रवक्ते सुनील प्रभू यांनी याबाबत माहिती दिली.
आमदार सुनील प्रभू म्हणाले, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या आमदारांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या आहेत. या बैठकांमध्ये मुख्यमंत्री आणि आमदारांनी समोरासमोर बसून मतदारसंघातील प्रश्न, निधीची कमतरता या प्रश्नांबद्दल चर्चा केली. आज पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेनेचे आमदार उपस्थित होते. यावेळी विकास कामांबद्दल चर्चा करण्यात आली.”
“आज शिवसेनेचे आमदार उपस्थित होते. यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनाही मुख्यमंत्री भेटणार आहेत. आमदार हतबल नाहीत, तर संतुष्ट आहेत. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेतले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीच्या आमदारांना भेटून त्यांच्या कामाच्या संदर्भातला आढावा घेऊन आवश्यक आदेश देत आहेत,” असंही सुनील प्रभू यांनी सांगितलं.
आज माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी विदर्भातील विविध प्रश्नांच्या अनुषंगाने माझी व विदर्भातील शिवसेनेचे आमदार यांची बैठक वर्षा निवासस्थानी घेतली.मतदारसंघ, जिल्हा व विदर्भातील विविध प्रश्नांच्या अनुषंगाने चर्चा केली. @CMOMaharashtra pic.twitter.com/cVvyTrOdCU
— Sanjay Rathod (@SanjayDRathods) September 25, 2020
यावेळी सुनील प्रभू यांनी संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात बैठकीत कुठल्याही प्रकारची चर्चा झालेली नसल्याचं सांगितलं. दरम्यान, याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विदर्भातील विविध प्रश्नांच्या अनुषंगाने विदर्भातील शिवसेना आमदारांची वर्षा निवासस्थानी बैठक घेतली होती. मतदारसंघ, जिल्हा आणि विदर्भातील विविध प्रश्नांच्या अनुषंगाने यावेळी चर्चा केली होती. शिवसेना आमदार संजय राठोड यांनी स्वतः याची माहिती दिली होती.
हेही वाचा :
शिवसेना येत नसल्यास राष्ट्रवादीने भाजपसोबत सरकार स्थापन करावं, आठवलेंचं आमंत्रण
सुशांत सिंह प्रकरणी जे छाती बडवून घेत होते, ते आता कुठे गेले? : अनिल परब
CM Uddhav Thackeray take important meeting of Shivsena MLA