CM Uddhav Thackeray : ठाकरे आणि शिवसेना ही नावं न वापरता जगून दाखवा; उद्धव ठाकरेंचं बंडखोरांना थेट आव्हान

आतापर्यंत एकनाथ शिंदे गटाने केवळ बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, त्यांचे हिदुत्व याचा उल्लेख केला होता. तर आमदारांच्या संख्याबळावर त्यांनी हीच खरी शिवसेना असल्याचेही सांगितले होते. या दोन बाबींना धरुनच आता उद्धव ठाकरे यांनी त्यांना खुले आव्हान केले आहे. ठाकरे आणि शिवसेना ही नावे न वापरता जगून दाखवा असे त्यांनी म्हटल्याने आता भविष्यात या दोन शब्दाचा वापर शिंदे गटाकडून कसा केला जाणार हे पहावे लागणार आहे.

CM Uddhav Thackeray : ठाकरे आणि शिवसेना ही नावं न वापरता जगून दाखवा; उद्धव ठाकरेंचं बंडखोरांना थेट आव्हान
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 24, 2022 | 3:07 PM

मुंबई : शिवसेनेतील आमदारांच्या बंडानंतर पक्ष प्रमुख तथा (CM Udhav Thackeray) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आतापर्यंत त्यांनी चर्चेला या त्यावरून मार्ग काढू असे आवाहन केले होते. मात्र, आता मुख्यमंत्री हे अॅक्शनमोडमध्ये आहेत. शिवसेना पक्षावर दावा करणाऱ्या (Eknath Shinde) एकनाथ शिंदे गटाला त्यांनी चोख उत्तर दिले असून ठाकरे आणि (Shivsena) शिवसेना ही नावे न वापरता जगून दाखवा असा इशाराच त्यांनी बंडखोरांना दिला आहे. बंडखोर आमदारांची संख्या वाढत असताना दुसरीकडे पक्ष संघटनेचे प्रयत्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे करीत आहेत. त्याच अनुशंगाने जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत त्यांनी ऑनलाईनद्वारे सहभाग नोंदवला होता. जे सोडून गेले त्यांच्या बाबत अधिकचा विचार न करता आता पक्षाचे संघटन महत्वाचे असून माझी इच्छाशक्ती दांडगी आहे. त्यावर सर्वकाही सुरळीत होईल असा विश्वास त्यांनी बैठकीला उपस्थित असलेल्या जिल्हा प्रमुखांना दिला आहे.

ज्या दोन शब्दांचा वापर त्यावरच पक्ष प्रमुखांनी ठेवले बोट

आतापर्यंत एकनाथ शिंदे गटाने केवळ बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, त्यांचे हिदुत्व याचा उल्लेख केला होता. तर आमदारांच्या संख्याबळावर त्यांनी हीच खरी शिवसेना असल्याचेही सांगितले होते. या दोन बाबींना धरुनच आता उद्धव ठाकरे यांनी त्यांना खुले आव्हान केले आहे. ठाकरे आणि शिवसेना ही नावे न वापरता जगून दाखवा असे त्यांनी म्हटल्याने आता भविष्यात या दोन शब्दाचा वापर शिंदे गटाकडून कसा केला जाणार हे पहावे लागणार आहे. आतापर्यंत केवळ बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षाला समोर करुन बंडखोर आमदार आपली भूमिका मांडत होते. त्यावरच उद्धव ठाकरे यांनी आव्हान दिल्याने आता शिंदे गटाची कोंडी होणार के पहावे लागणार आहे.

लोंकामध्ये वावरा मग किंमत समजेल

आतापर्यंत शिवसेनेचा आणि ठाकरे नावाचा वलय होता. याचा विसर आमदारांना पडला आहे. सध्या ज्या भूमिकेत बंडखोर आहेत त्यामागे मोठ्या पक्षाचा हात आहे. मात्र, तेथेही भविष्य दिसत असेल तर खुशाल जावा पण माझा फोटो न वापरता लोकांमध्ये वावरुन दाखवा असे आव्हानही मुख्यमंत्र्यांनी बंडखोरांना दिले आहे. जिल्हा प्रमुखांची बैठक असली तरी मुख्यमंत्र्यांचा रोष मात्र बंडखोर आमदारांवर होता हे काही आता लपून राहिलेले नाही. त्यामुळे आता सर्व काही स्पष्ट झाले असून पक्ष प्रमुख हे संघटना मजबुतीकऱणासाठी रिंगणात उतरले आहेत.

हे सुद्धा वाचा

जिल्हा प्रमुखांच्या बैठकीचे अनेक अर्थ

सध्या जिल्हा प्रमुखांपासून ते नगरसेवकांपर्यंतच्या बैठकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्व देण्यास सुरवात केली आहे. हे करीत असताना बंडखोरांनी घेतलेला भूमिका कशी चुकीची आहे हे देखील ते पदाधिकाऱ्यांना पटवून सांगत आहेत. शिवाय जिल्हा प्रमुख आणि नगरसेवकांनी आता पुन्हा वेगळी वाट निवडून नये अशा पध्दतीनेही ते मार्गदर्शन करीत आहेत. त्यामुळे बैठक पदाधिकाऱ्यांची असली तरी त्यामागे अनेक अर्थ आणि उद्दिष्ट हे दडलेले आहेत.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.