अजित पवार आणि बच्चू कडू यांच्यात तू तू मैं मैं; नेमकं काय घडलं…?

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यात तू तू मैं मैं झाल्याचं पाहायला मिळालं. निधीच्या मागणीवरुन दोन्ही नेत्यांमध्ये खडाजंगी झाली. | DCM Ajit Pawar And Bacchu Kadu

अजित पवार आणि बच्चू कडू यांच्यात तू तू मैं मैं; नेमकं काय घडलं...?
Ajit pawar And bacchu kadu
Follow us
| Updated on: Feb 09, 2021 | 7:54 AM

अमरावतीराज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यात तू तू मैं मैं झाल्याचं पाहायला मिळालं. निधीच्या मागणीवरुन दोन्ही नेत्यांमध्ये खडाजंगी झाली. अमरावती विभागाच्या वार्षिक नियोजनाच्या बैठकीदरम्यान हा प्रकार घडला. (Conflict Between DCM Ajit Pawar And State Minister Bacchu Kadu)

अमरावती विभागाच्या वार्षिक नियोजनाची बैठक सोमवारी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित करण्यात आलेली होती. यावेळी अकोला जिल्ह्याला दिलेल्या निधीवर बच्चू कडू समाधानी नव्हते. परिणामी बच्चू कडू यांनी आक्रमक होत नाराजी व्यक्त केली.

नियोजन भवनात पार पडलेल्या बैठकीत विविध लोकप्रतिनिधींच्या मागण्या लक्षात घेऊन अमरावती जिल्ह्यासाठी 300 कोटींची तरतूद करण्यात आली. तसंच यवतमाळ 325 कोटी, बुलडाणा 295 कोटी, वाशिम 185 तर अकोला जिल्ह्यासाठी 185 कोटींचा निधी देण्यात आला.

अजित पवार यांच्या निधी वाटपावर बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली. तसंच यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये खडाजंगी झाल्याची माहिती आहे. आपण अधिक निधीची मागणी करुनही कमी निधी मिळाल्याची भावना कडू यांनी व्यक्त केली. तर दुसरीकडे विभागातील पाचही जिल्ह्यांना तरतुदीपेक्षा वाढीव निधी दिल्याचं अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

मी सरकारमध्ये असल्याने बोलू शकत नाही. मात्र विदर्भाचा अनुशेष भरुन काढला जावा, यासाठी आपण अधिक निधीची मागणी केली होती, मात्र निधी वाढून देण्यात आला नाही. परंतु निधी वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करु, असं बच्चू कडू म्हणाले.

हे ही वाचा :

“काहीही करा, आमच्या जालिंदरला वाचवा”; करारी, आक्रमक अजितदादा जेव्हा भावुक होतात…!

अमित शाहांच्या पायगुणात इतकीच ताकद असती तर…, सामनातून टीकेचे बाण

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.