शिवसेनेत राजकीय भूकंप, काँग्रेस सतर्क, कमलनाथ यांना महाराष्ट्रातील घडामोडींवर लक्ष ठेवण्याचे आदेश
कठीण काळात काँग्रेस आणि गांधी परिवाराच्या पाठिशी ते कायम उभे राहिले. त्यामुळे कमलनाथ यांच्या खांद्यावर काँग्रेसने महाराष्ट्राची धुरा दिली आहे.
मुंबई : सध्या राज्यात राजकीय घडामोडींनी वेग घेतलाय. अश्यात आता काँग्रेसदेखील अॅक्शन मोडमध्ये आलीये. कमलनाथ यांनी काँग्रेसच्या (Congress) घडामोडींकडे लक्ष देण्यास सांगितलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचे निरिक्षण करण्यासाठी काँग्रेसकडून कमलनाथ (Kamalnath) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या राज्यातील राजकीय घडामोडी पाहता राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोन्ही पक्ष सावध झाले आहेत. आपले आमदार आपल्या संपर्कात राहतील, आपल्या पाठिशी राहतील यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
काल विधान परिषदेची निवडणूक झाली. त्यानंतर आज राज्यात राजकीय भूकंप झालाय. अश्यात काँग्रेस सावध झाली आहे. काँग्रेसने कमलनाथ यांनी काँग्रेसच्या घडामोडींकडे लक्ष देण्यास सांगितलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचे निरिक्षण करण्यासाठी काँग्रेसकडून कमलनाथ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबाबतचं पत्रकही काँग्रेसच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलं आहे.
काँग्रेसची बैठक
आज सकाळी काँग्रेसची दिल्लीत बैठक पार पडली. तिथे हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला सुशीलकुमार शिंदेही उपस्थित असल्याची माहिती आहे. ते कालच काँग्रेसच्या या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीसाठी गेले होते. त्यानंतर आता राज्यातही आमदारांची बैठक होणार आहे. आशिष देशमुख यांनी नाना पटोलेंच्या राजीनाम्याची मागणीदेखील केली आहे.
कमलनाथ कोण आहेत?
कमलनाथ हे गांधी कुटुंबाच्या सर्वात विश्वासू लोकांपैकी एक आहेत. कमलनाथ मध्यप्रदेशात सरकारचे नेतृत्व करत असताना अनेकांची नाराजी होती. अनेकांनी जाऊन हायकमांड सोनिया गांधी यांची भेट घेतली. पण कमलनाथ यांना जे हवं होतं तेच झाले. त्यांना सरकार गमवावं लागलं तरी ते झुकले नाहीत. त्यामुळे ते गांधी घराण्याच्या विश्वासू लोकांच्या यादीत आणखी बर गेले. कठीण काळात काँग्रेस आणि गांधी परिवाराच्या पाठिशी ते कायम उभे राहिले. त्यामुळे कमलनाथ यांच्या खांद्यावर काँग्रेसने महाराष्ट्राची धुरा दिली आहे.