AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसची महागाईची गुढी, बाळासाहेब थोरांतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

इंधन दरवाढ आणि महागाई विरोधात काँग्रेस पक्षातर्फे देशव्यापी महागाईमुक्त भारत अभियान राबवून आंदोलन करण्यात येत आहे. शुक्रवारी काँग्रेसच्या वतीने महसूल मंत्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली पुणे येथील अलका चौकात महागाईची गुढी उभारून, घोषणाबाजी करत केंद्र सरकारच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसची महागाईची गुढी, बाळासाहेब थोरांतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
बाळासाहेब थोरात, काँग्रेस आंदोलनImage Credit source: TV9
| Updated on: Apr 01, 2022 | 9:02 PM
Share

मुंबई : केंद्रातील नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या सरकारला सर्वसामान्य जनतेशी काही देणे घेणे राहिलेले नाही. मोदी सरकारकडून (Modi Government) दररोज इंधन दरवाढ करून सर्वसामान्यांची लूट केली जात आहे. लोकांच्या कष्टाच्या कमाईची लूट करणा-या मोदी सरकारला सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार राहिला नसून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केली. इंधन दरवाढ आणि महागाई विरोधात काँग्रेस पक्षातर्फे देशव्यापी महागाईमुक्त भारत अभियान राबवून आंदोलन करण्यात येत आहे. शुक्रवारी काँग्रेसच्या वतीने महसूल मंत्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली पुणे येथील अलका चौकात महागाईची गुढी उभारून, घोषणाबाजी करत केंद्र सरकारच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.

आमदार संग्राम थोपटे, शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, देवीदास भन्साळी, सरचिटणीस अभय छाजेड, दीप्ती चवधरी, रविंद्र धंगेकर, अरविंद शिंदे, कमलताई व्यवहारे, दत्ता बहिरट, वीरेंद्र किराड, अजित दरेकर, गोपाळ तिवारी, रमेश अय्यर, चंद्रशेखर कपोते, प्रशांत सुरसे, महिला काँग्रेस अध्यक्षा पूजा आनंद, सोनाली मारणे, स्वाती शिंदे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.

थोरातांचा केंद्र सरकारवर निशाणा

‘जनता जाब विचारल्याशिवाय राहाणार नाही’

यावेळी केंद्र सरकारचा समाचार घेत थोरात म्हणाले की, पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, खाद्यातेलासह सर्व जिवनावश्यक वस्तुंचे दर गगनाला भिडले आहेत. पण त्यावर भाजपा गप्प बसून आहे. 2014 पूर्वी केंद्रात काँग्रेसप्रणित युपीएचे सरकार असताना महागाईच्या विरोधात आंदोलन करणारे भाजपचे नेते आता कुठे लपले आहेत? भाजपाचे सरकार आल्यास 40 रुपये लिटर पेट्रोल देऊ, 100 दिवसात महागाई कमी करू अशा घोषणा भाजपा नेते करत होते पण सत्तेत येऊन 7 वर्ष झाली तरी केंद्रातील भाजपा सरकारने काहीच केले नाही. उलट 70 रुपये लिटरचे पेट्रोल 115 रुपये व डिझेल 100 रुपयांच्या वर गेले आहे. युपीएचे सरकार असताना एलपीजी सिलिंडर 350 रुपयांना येत होता आता तो 1000 रुपये झाला तरी भारतीय जनता पक्षाचे नेते बोलत नाही. या नेत्यांना जनता जाब विचारल्याशिवाय राहाणार नाही. जनतेच्या मनात महागाईबद्दल असंतोष असून त्याचा कधीही उद्रेक होईल.

राज्यभरात काँग्रेसचं आंदोलन

माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली उस्माबाद जिल्ह्यातील उमरगा येथे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वाढत्या महागाईविरोधात आंदोलन करत मोदी सरकारचा निषेध केला. चंद्रपूर, सिंधुदुर्ग, धुळे शहर, नाशिक शहर, लातूरसह राजाच्या इतर भागातही महागाईमुक्त भारत आंदोलन करत केंद्र सरकारच्या विरोधात घोषाबाजी करण्यात आली. महागाईविरोधातील आंदोलन हे विविध कार्यक्रमासह आठवडाभर राबविले जाणार आहे.

इतर बातम्या :

Sanjay Raut Video: सकाळी राष्ट्रवादीच्या गृहमंत्र्यांविरोधात ‘कठोर’ झालेले राऊत दुपारपर्यंत ‘मवाळ’ कसे झाले? गृहकलह मिटला?

‘संजय राऊत राष्ट्रवादीच्या पे रोलवर’, चंद्रकांतदादांचा चिमटा; गृहमंत्री लेचेपेचे असल्याचाही टोला

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.