Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महापालिकेवर शिवसेनेची सत्ता, तर मुंबईचे पालकमंत्रिपद काँग्रेसकडे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच राज्यातील मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर (Guardian minister of mumbai)   केले.

महापालिकेवर शिवसेनेची सत्ता, तर मुंबईचे पालकमंत्रिपद काँग्रेसकडे
Follow us
| Updated on: Jan 08, 2020 | 10:49 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच राज्यातील मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर (Guardian minister of mumbai)   केले. त्यानंतर आज (8 जानेवारी) मुख्यमंत्र्यांनी जिल्हानिहाय पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली. विशेष म्हणजे ज्या मुंबईवर गेले अनेक वर्ष शिवसेनेचे वर्चस्व आहे त्याच मुंबईचे पालकमंत्रिपद यंदा काँग्रेसच्या वाट्याला गेले आहे. काँग्रसेचे आमदार आणि वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांना मुंबईचे पालकमंत्रिपद (Guardian minister of mumbai) मिळालेले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महानगर पालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे मुंबई म्हटलं की शिवसेना असं समीकरण बनलं आहे. पण त्याच मुंबईचं पालकमंत्रिपद काँग्रेसकडे गेल्यानं सर्वत्र चर्चा सुरु आहे.

भाजप-शिवसेनेच्या सरकारमध्ये मुंबईचे पालकमंत्रिपद हे शिवसेनेकडे होते. उद्योगमंत्री सुभाष देसाई हे मुंबईचे पालकमंत्री होते तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात माजी राज्यमंत्री सचिन अहिर हे मुंबईचे पालकमंत्री होते. पण यंदाच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये मुंबईचे पालकमंत्रिपद हे काँग्रेसच्या वाटल्या गेले असून सुभाष देसाई यांना औरंगाबादचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या यादीत राष्ट्रवादीला 12, शिवसेनेला 13 आणि काँग्रेसला 11 जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे.

कोण आहेत अस्लम शेख ?

आमदार अस्लम शेख हे मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. शेख हे पहिल्यांदा 2009 रोजी विधानसभेवर निवडून गेले. काँग्रेस पक्षातून त्यांनी तीन वेळा विधानसभा निवडणूक जिंकली आहे. महाविकासआघाडी सरकारमध्ये त्यांना वस्त्रोद्योग, मत्स व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्रिपद मिळालेलं आहे.

राष्ट्रवादी (12)

1. पुणे- अजित अनंतराव पवार 2. रायगड – आदिती सुनिल तटकरे 3. नाशिक- छगन चंद्रकांत भुजबळ 4. अहमदनगर- हसन मियालाल मुश्रीफ 5. सातारा- शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील 6. सांगली- जयंत राजाराम पाटील 7. सोलापूर- दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील 8. जालना- राजेश अंकुशराव टोपे 9. परभणी- नवाब मोहम्मद इस्लाम मलिक 10. बीड- धनंजय पंडितराव मुंडे 11. बुलडाणा- डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे 12. गोंदिया- अनिल वसंतराव देशमुख

शिवसेना (13)

1. मुंबई उपनगर- आदित्य उद्धव ठाकरे 2. ठाणे- एकनाथ संभाजी शिंदे 3. रत्नागिरी- अनिल दत्तात्रय परब 4. सिंधुदुर्ग- उदय रविंद्र सामंत 5. पालघर- दादाजी दगडू भुसे 6. धुळे- अब्दुल नबी सत्तार 7. जळगाव- गुलाबराव रघुनाथ पाटील 8. औरंगाबाद- सुभाष राजाराम देसाई 9. वाशिम- शंभुराज शिवाजीराव देसाई 10. यवतमाळ- संजय दुलीचंद राठोड 11. गडचिरोली- एकनाथ संभाजी शिंदे 12. उस्मानाबाद- शंकरराव यशवंतराव गडाख 13. अकोला- ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू

काँग्रेस (11)

1. मुंबई शहर- अस्लम रमजान अली शेख 2. नंदुरबार- ॲड. के.सी. पाडवी 3. कोल्हापूर- विजय ऊर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात 4. हिंगोली- वर्षा एकनाथ गायकवाड 5. नांदेड- अशोक शंकरराव चव्हाण 6. लातूर- अमित विलासराव देशमुख 7. अमरावती- ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर (सोनावणे) 8. नागपूर- डॉ. नितीन काशिनाथ राऊत 9. वर्धा – सुनील छत्रपाल केदार 10. भंडारा- सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील 11. चंद्रपूर- विजय नामदेवराव वडेट्टीवार

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.