तीन वेळा आमदार झाल्याने मंत्रिपदाची इच्छा होती, पण… : संग्राम थोपटे

आम्हाला बदनाम करण्यासाठी विरोधी पक्षातील कोणाचं कटकारस्थान आहे का, याचाही शोध घेत असल्याचं संग्राम थोपटे यांनी सांगितलं.

तीन वेळा आमदार झाल्याने मंत्रिपदाची इच्छा होती, पण... : संग्राम थोपटे
Follow us
| Updated on: Jan 01, 2020 | 9:24 AM

पुणे : मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात काँग्रेस भवनची तोडफोड केली. मात्र संग्राम थोपटे यांनी या तोडफोडीविषयी मला काहीच कल्पना नाही. हा प्रकार चुकीचा असल्याचं सांगत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. तीन वेळा आमदार झाल्याने मंत्रिपदाची इच्छा होती, असं थोपटे (Sangram Thopte on Supporters Ruckus) म्हणाले.

तोडफोड ही काँग्रेसची परंपरा नाही. कोणी दगडफेक केली, याची वस्तुस्थिती तपासली पाहिजे. हे कार्यकर्ते शहरातले आहेत की ग्रामीण भागातील आहेत, हे तपासावे लागेल. त्याचबरोबर आम्हाला बदनाम करण्यासाठी विरोधी पक्षातील कोणाचं कटकारस्थान आहे का, याचाही शोध घेत असल्याचं संग्राम थोपटे यांनी सांगितलं. संग्राम थोपटे हे पुण्यातील भोर मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार आहेत.

काँग्रेस हा अहिंसा विचारसरणीचा पक्ष आहे. त्यामुळे झालेला प्रकार चुकीचा आहे. मंत्रिपदाचा निर्णय हा पक्षश्रेष्ठींचा निर्णय असतो. मंत्रिपदाची इच्छा तर प्रत्येकालाच असते. तीन वेळा आमदार झाल्याने मलाही मंत्रिपदाची इच्छा होती. मंत्रिपद न मिळाल्याने कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या असतीलही, मात्र अशाप्रकारचा उद्रेक चुकीचा आहे. पक्षश्रेष्ठी कोणालाही मंत्रिपदाचा शब्द देत नाहीत. पक्षश्रेष्ठींनी घेतलेला निर्णय योग्य असेल आणि तो मला मान्य असल्याचंही संग्राम थोपटे यांनी सांगितलं.

आमदार थोपटेंच्या कार्यकर्त्यांची काँग्रेस कार्यालयावर दगडफेक, मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने राडा

मला डावलण्यात कोणतंही कारण नाही. मेरीट ठरलेला असतो. मंत्रिमंडळात समावेश झाला असता, तर मतदारसंघाचा विकास करता आला असता. माझ्या सांगण्याने काही घडलेलं नसल्याने माझ्यावर कारवाई होण्याचा प्रश्नच येत नाही. मला त्याची काळजी वाटत नाही. मी पक्षाचा आदेश मानणारा कार्यकर्ता असल्याचे संग्राम थोपटे यांनी म्हणाले.

जे झाले ते चुकीचे असून त्याचं समर्थन मी करु शकत नाही. माझ्यावरील कारवाई करण्याच्या मागणीसंदर्भात माझ्याकडे कोणतीही माहिती नाही. त्याचबरोबर माझ्याविरोधात गुन्हा दाखल होत असल्याची मला माहित नाही. जर काही अडचण असेल तर मी पक्षीय पातळीवर मांडत असतो, असं थोपटेंनी स्पष्ट (Sangram Thopte on Supporters Ruckus) केलं.

सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’.
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं.
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर.
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?.
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?.