Sonia Gandhi : सोनिया गांधींना कोरोनाची लागण, अन्य काही नेत्यांनासुद्धा कोरोनाची लागण
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे.
नवी दिल्ली : काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी (sonia Gandhi) यांना कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनिया गांधी यांच्या काँग्रेस (Congress) नेत्यांसोबत बैठका सुरु होत्या. सातत्यानं सुरु असलेल्या बैठकांचं सत्र सोनिया गांधी यांचं काँग्रेस नेत्यांसोबत सुरु होतं. दरम्यान, आता सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाल्यां समोर आल्यानं संपर्कात आलेल्या इतरही काँग्रेस नेत्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची भीती व्यक्त केला जातोय. काँग्रेस प्रवक्तेत रणदीप सुरजेवाला यांनी ही माहिती दिली आहे. बुधवारी संध्याकाळी सोनिया गांधी यांना ताप आला होता. तापाची हलकी लक्षणं समोर आल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. ही चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली असल्याच स्पष्ट झालंय.
सोनिया गांधी यांना ईडीची नोटीस
नॅशनल हेराल्ड प्रकरणात 55 कोटींचा गैरव्यवहार झाला होता. याबाबत सुब्रमण्यम स्वामी यांनी आरोप केला होता. 2012मध्ये सुब्रमण्यम स्वामी यांनी एक याचिका दाखल करून काँग्रेस नेत्यांवर फसवणुकीचे आरोप केले होते. 2008 मध्ये एजेएलची सर्व प्रकाशने बंद करण्यात आली होती. तसेच या एजेएल कंपनीवर 90 कोटींचं कर्जही झालं होतं. त्यानंतर काँग्रेने यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड नावाने एक नवी अव्यवसायिक कंपनी बनवली. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासहीत मोतीलाल व्होरा, सुमन दुबे, ऑस्कर फर्नांडिस आणि सॅम पित्रौदा आदी नेते या कंपनीत संचालक होते. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडे या कंपनीचे 76 टक्के शेअर होते. तर इतरांकडे 24 टक्के शेअर होते. काँग्रेस पक्षाने या कंपनीला 90 कोटींच कर्जही दिलं होतं. या कंपनीने एजेएलचं अधिग्रहन केलं होतं.
काँग्रेस नेत्यांची कालपासूनच जोरदार टीका
‘ब्रिटीश राजवट उखडून टाकण्यासाठी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने 1937 मध्ये नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र काढले, ज्याचे नेते महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरकार पटेल, श्री पुरुषोत्तम दास टंडन, आचार्य नरेंद्र देव, श्री रफी अहमद किडवाईसह इतर नेते होते. ब्रिटिशांना या वृत्तपत्राचा एवढा धोका वाटतं होता की 1942 मध्ये ‘भारत छोडो’ आंदोलनात नॅशनल हेराल्डवर बंदी घातली. जी 1945 पर्यंत चालली. “स्वातंत्र्य चळवळीचा आवाज” बनलेल्या या वृत्तपत्राचा मुख्य मंत्र होता. “स्वातंत्र्य धोक्यात आहे, सर्व शक्तीने त्याचे रक्षण करा” आज पुन्हा ब्रिटिश राजवटीला पाठिंबा देणारी विचारसरणी ‘स्वातंत्र्य चळवळीचा आवाज’ दाबण्याचे षडयंत्र रचलं जात आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या कटाचे प्रमुख आहेत. ईडी हे त्यांचे आवडते हत्यार आहे,’ अशी टीका कॉंग्रेसच्या नेत्यांनी केली आहे.