MLC Polls | काँग्रेस सहाव्या जागेसाठी आग्रही, मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार?

काँग्रेसने महाविकास आघाडीच्या सहाव्या जागेवर दावा केल्यामुळे या निवडणुकीत चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. (Congress stand in Maharashtra MLC polls)

MLC Polls | काँग्रेस सहाव्या जागेसाठी आग्रही, मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार?
Maharashtra Vidhansabha
Follow us
| Updated on: May 07, 2020 | 11:00 AM

मुंबई : विधानपरिषदेच्या 9 रिक्त जागांसाठी 21 मे रोजी मतदान होत आहे. (Congress stand in Maharashtra MLC polls) मुख्यमंत्री स्वत: या निवडणुकीत उमेदवार असल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र काँग्रेसने महाविकास आघाडीच्या सहाव्या जागेवर दावा केल्यामुळे या निवडणुकीत चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. (Congress stand in Maharashtra MLC polls)

विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या संख्याबळानुसार 5 जागा निवडून येतील असा विश्वास तिन्ही पक्षांना आहेच. पण सहावी जागाही लढावी असा काँग्रेसचा आग्रह आहे. महाविकास आघाडी 5 आणि भाजप 4 जागा लढवून बिनविरोध निवड करण्याचा शिवसेना-राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. त्यासाठी काँग्रेस नेत्यांचीही समजूत काढण्याचा प्रयत्न सुरु आहेत.

विधानपरिषदेत भाजप 3, राष्ट्रवादी काँग्रेस 3 , काँग्रेस 2 आणि शिवसेनेचे 1 सदस्य निवृत्त झाले आहेत. आता संख्याबळानुसार यंदा निवडणुकीत निवडून येण्यासाठी 29 मतांचा कोटा आवश्यक आहे.

विधानसभेत भाजपच्या आमदारांचे संख्याबळ लक्षात घेतल्यास पक्षाचे 4 सदस्य निवडून येणे कठीण नाही. भाजपनेही आपण चौथा उमेदवार निवडून आणू असा दावा केला आहे. मात्र मुख्यमंत्री उमेदवार असलेली विधानपरिषद निवडणूक बिनविरोध व्हावी हा महाराष्ट्राच्या राजकारणातील अलिखित संकेत आहे.

कोरोना प्रादुर्भावाच्या वातावरणात निवडणुकीसाठी होणारी मतदान प्रक्रिया नको, सोशल डिस्टिन्सिंगला धक्का बसेल अशी भीती राजकीय पक्षांना आहे.

महाविकास आघाडीच्या 5 जागांपैकी 2 जागा शिवसेना, 2 जागा राष्ट्रवादी काँग्रेस आणि 1 जागा काँग्रेसने लढवण्याचे धोरण आहे. मात्र हे धोरण काँग्रेसला मान्य नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सहकार्य केल्यास 6 जागा निवडून येऊ शकतात असा काँग्रेसचा दावा आहे. गेल्या मार्च महिन्यात झालेल्या राज्यसभा निवडणुकीतही पक्षावर अन्याय झाल्याची काँग्रेसची भावना आहे.

त्यामुळे काँग्रेस आपल्या आग्रहावर ठाम राहिल्यास आणि 6 जागा लढायचे ठरलं तर निवडणूक होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री असल्याने त्यांच्यासाठी मतांचा कोटा वाढवावा लागणार आहे. महाविकास आघाडीचा एकही उमेदवाराचा पराभव झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला धक्का बसण्याची शक्यता आहे.

कुणाचं संख्याबळ काय?

सध्या ज्या जागा रिक्त झाल्यात त्यात भाजपच्या 3, राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3, काँग्रेसच्या 2 आणि शिवसेनेची 1 अशा एकूण 9 जागांचा समावेश आहे. संख्याबळाचा विचार केला तर महाविकासआघाडीच्या 5 आणि भाजपच्या 3 जागा सहज निवडून येतील. पक्षीय बलाबल लक्षात घेता भाजपकडे 105, शिवसेनेकडे 56, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 54, काँग्रेसचे 44, बहुजन विकास आघाडी 3, समाजवादी पार्टी 2, एमआयएम 2, प्रहार जनशक्ती 2, मनसे 1, माकप 1, शेतकरी कामगार पक्ष 1, स्वाभिमानी पक्ष 1, राष्ट्रीय समाज पक्ष 1, जनसुराज्य पक्ष 1, क्रांतिकारी शेतकरी पक्ष 1, अपक्ष 13 आमदारांचा समावेश आहे. त्यातून निवडून येण्यासाठी एका जागेसाठी 29 मतांची गरज आहे. त्यामुळे या निवडणुकीत एका जागेसाठी चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.

विधानपरिषदेची निवडणूक कधी?

कोरोनामुळे रखडलेल्या महाराष्ट्र विधानपरिषदेच्या रिक्त 9 जागांसाठी अखेर निवडणूक जाहीर झाली आहे. येत्या 21 मे रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्याच दिवशी म्हणजे 21 तारखेलाच मतमोजणी आणि निकाल जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा पेच निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा केली. (Maharashtra legislative council polls).

(Congress stand in Maharashtra MLC polls)

संबंधित बातम्या 

EXCLUSIVE : आरामात चौथा उमेदवार निवडून आणणार : देवेंद्र फडणवीस

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.