काँग्रेस नेते आशिष देशमुख यांची हकालपट्टी होणार?, वारंवार पक्षाच्या नेत्यांविरोधात बोलण्यावरून कारवाई

आता काँग्रेसकडून पक्षनेतृत्वाविरोधात का बोलता अशी विचारणा करण्यात केली. त्यासंदर्भात पत्र देऊनही त्याचे उत्तर या नेत्याने दिले नाही. त्यामुळे काँग्रेसच्या या नेत्याला काँग्रेसमधून बाहेर जावे लागणार आहे.

काँग्रेस नेते आशिष देशमुख यांची हकालपट्टी होणार?, वारंवार पक्षाच्या नेत्यांविरोधात बोलण्यावरून कारवाई
Follow us
| Updated on: Apr 04, 2023 | 1:39 PM

नागपूर : नागपुरातील एक मोठा काँग्रेस नेता वारंवार पक्षाच्या नेतृत्वावर टीका करतो. पक्ष नेतृत्वालाच चुकीची वक्तव्य केल्याने त्यांनी माफी मागावी, असं म्हणतो. या प्रकारामुळे या काँग्रेस (Congress) नेत्यावर काँग्रेसकडून कारवाई केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा काँग्रेसचा नेता नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना भेटला. त्यामुळे हा नेता राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या. आता काँग्रेसकडून पक्षनेतृत्वाविरोधात का बोलता अशी विचारणा करण्यात केली. त्यासंदर्भात पत्र देऊनही त्याचे उत्तर या नेत्याने दिले नाही. त्यामुळे काँग्रेसच्या या नेत्याला काँग्रेसमधून बाहेर जावे लागणार आहे.

राहुल गांधी यांनी माफी मागण्याची केली होती मागणी

नागपुरातील काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांच्यावर आता कारवाई केली जाणार आहे. आशिष देशमुख यांची काँग्रेसमधून हकालपट्टी केली जाणार आहे. देशमुख यांच्याबाबत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा झाली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात देशमुख यांनी वक्तव्य केलं होतं. राहुल गांधी यांनी माफी मागावी, असंही ते म्हणाले होते.

हे सुद्धा वाचा

आशिष देशमुख यांची हकालपट्टी होणार

आशिष देशमुख यांनी काँग्रेसमध्ये राहून काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांवर टीका केली. राहुल गांधी, मल्लिकार्जून खर्गे, नाना पटोले यांच्यावर टीका केली. त्यामुळे आशिष देशमुख यांची काँग्रेसमधून हकालपट्टी होणार आहे, अशी माहिती आहे. प्रदेश काँग्रेसच्या शिस्तभंग समितीकडून याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय समितीकडे पाठवण्यात आला.

तुम्ही वारंवार पक्ष विरोधी, पक्षाच्या नेत्यांविरोधी वक्तव्य का करता, अशी विचारणा प्रदेश काँग्रेस समितीकडून आशिष देशमुख यांना करण्यात आली आहे. यासंदर्भातील पत्र देशमुख यांना देण्यात आलं आहे. याचं उत्तर आशिष देशमुख यांनी दिलं नाही. शिवाय माफीही मागितली नाही. त्यामुळे आशिष देशमुख यांची हकालपट्टी काँग्रेसमधून निश्चित असल्याची माहिती आहे.

त्यांचे मानसिक संतुलन बिघडले

यासंदर्भात बोलताना काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले, आशिष देशमुख सातत्याने वरिष्ठ नेत्यांवर टीका करत असतात. टीकेची झोड उठवत असतात. यावरून एक गोष्टी स्पष्ट दिसत आहे. आशिष देशमुख यांचे मानसिक संतुलन तपासण्याची गरज आहे. त्यांना लोकांचा पाठिंबा नाही. पक्षविरोधी कारवाया करण्याचा प्रयत्न असल्याचंही ते म्हणाले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.