दानवे किती रस्त्यावर असतात, हे माहीत आहे, बाळासाहेब थोरातांचा टोला

राहुल गांधी हे गरीब माणसांमध्ये मिसळतात, अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दानवेंना उत्तर दिले

दानवे किती रस्त्यावर असतात, हे माहीत आहे, बाळासाहेब थोरातांचा टोला
Follow us
| Updated on: Oct 05, 2020 | 2:14 PM

मुंबई: राहुल गांधी यांना रस्त्यावरील आंदोलनाची सवय नाही, असे वक्तव्य करणारे भाजप खासदार रावसाहेब दानवे यांना काँग्रेसकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. रावसाहेब दानवे किती रस्त्यावर असतात हे आम्हा सर्वांना माहिती आहे. मुळात ते लाटेवर निवडून आले आहेत. परिणामी त्यांच्याविषयी फार बोलण्याची गरज नाही. याउलट राहुल गांधी हे गरीब माणसांमध्ये मिसळतात, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटले. ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Balasaheb Thorat hits back Raosaheb Danve)

यावेळी बाळासाहेब थोरात यांनी हाथरस बलात्कार प्रकरणावरुन भाजपला चांगलेच धारेवर धरले. त्यांनी म्हटले की, मुलींवर होणारा अन्याय देश सहन करु शकत नाही. सर्वांच्याच भावना तीव्र आहेत. समाज उत्स्फुर्तपणे रस्त्यावर येत असताना भाजपची भूमिका संशयास्पद आहे. भाजपचे आमदार केवळ संस्कृतीच्या गप्पा मारतात. हाथरसमध्ये ज्या मुलीवर अत्याचार झाले, ती संस्कारित नव्हती का? ज्या मुलांनी तिच्यावर अत्याचार केले, ते संस्कारित होते का, असा सवालही यावेळी बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला.

काय म्हणाले होते रावसाहेब दानवे? हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गेलेल्या राहुल गांधी यांना कोणीही धक्काबुक्की केली नाही. मात्र, त्यांना जास्त गर्दीत फिरायची सवय नाही. त्यामुळे ते पडले. विरोधी पक्ष नेते म्हणून मी त्यांचा सन्मान करतो, अशी खोचक टिप्पणी रावसाहेब दानवे यांनी केली होती.

आता जनजीवन सुरळीत करायलाच पाहिजे- बाळासाहेब थोरात कोरोनाची साथ येऊन आता सहा महिने उलटून गेले आहेत. त्यामुळे आता भविष्यात कोरोनासह जगावे लागणार, ही वस्तुस्थिती नाकारुन चालणार नाही. त्यामुळे आता जनजीवन सुरळीत करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. त्यासाठी प्रशासनाबरोबरच नागरिकांनी आपली काळजी घेतली पाहिजे. नियमांचे पालन करत जनजीवन सुरळीत केले पाहिजे. अर्थव्यवस्था बंद करुन चालणार नाही, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. (Balasaheb Thorat hits back Raosaheb Danve)

संबंधित बातम्या:

राहुल गांधींना धक्काबुक्की नाहीच, गर्दीत फिरायची सवय नसल्याने ते पडले : रावसाहेब दानवे

(Balasaheb Thorat hits back Raosaheb Danve)

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.