गुलाम नबी आझाद सोनिया गांधीच्या भेटीला! 5 राज्यातील लाजीरवाण्या पराभवानंतर काँग्रेसमध्ये घडामोडींना वेग
Congress Gulam Nabi Azad : गुलाम नबी आझाद सोनिया गांधींच्या भेटीला गेल्यानं पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. 10, जनपथ या दिल्लीतील सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी त्यांनी गुलाम नबी आझाद यांनी भेट घेतली आहे.
नवी दिल्ली : गुलाम नबी आझाद यांनी सोनिया (Sonia Gandhi) यांची भेट घेतली आहे. गुरुवारी गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांच्यासोबत G-21 नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीत पाच राज्यात काँग्रेसनं केलेल्या निराशाजनक कामगिरीवर चर्चा झाली होती. सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी गुलाम नबी आझाद यांनी भेट घेतली आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर काँग्रेसनं आत्मपरिक्षणासाठी बैठक घेतली होती. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा झाली होती. या बैठकीत काँग्रेस अध्यक्षपदावरुन काय चर्चा झाली, यावरुनही तर्क वितर्क लढवण्यात आले होते. दरम्यान, नुकतंच पाच राज्यांतील निवडणुकीत (5 State assembly election Result) लाजीरवणाऱ्या पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचीही उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्या जागी नव्या काँग्रेस नेत्यांकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आता गुलाम नबी आझाद सोनिया गांधींच्या भेटीला गेल्यानं पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. 10, जनपथ या दिल्लीतील सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी त्यांनी गुलाम नबी आझाद यांनी भेट घेतली आहे.
पाहा फोटो :
Congress leader Ghulam Nabi Azad reaches 10, Janpath to meet party president Sonia Gandhi. pic.twitter.com/rtW7EyTekN
— ANI (@ANI) March 18, 2022
सोनिया गांधीची भेट घेतल्यानंतर काय म्हणाले?
काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीतून काही सल्ले देण्यात आले होत. आगामी निवडणुकांमध्ये विरोधी पक्षाला धूळ चारण्यासाठी आणि निवडणूक जिंकण्यासाठी काय करायला, हवं या दृष्टीनं महत्त्वपूर्ण बदल गरजेचे असल्याचं गुलाम नबी आझाद यांनी म्हटलंय. सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांनी बोलत होते. एकजुटीनं निवडणुकीला सामोरं जाण्याची गरज यावेळी आझाद यांनी व्यक्त केली.
Working Committee was asked for suggestions on the reasons for defeat in 5 states. The discussion was held to fight unitedly in the forthcoming Assembly elections to defeat the opposition parties: Congress leader Ghulam Nabi Azad after meeting party president Sonia Gandhi pic.twitter.com/av6WysOsom
— ANI (@ANI) March 18, 2022
जी-21 नेत्यांनी बैठकीआधी हरणायाचे माजी मुख्यमंत्री भुपेंद्र सिंह हुड्डा यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली होती. काँग्रेस पक्षाची बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी काय करता येईल, या अनुशंगाननं ही बैठक झाली होती. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये नेतृत्त्व बदलाच्या चर्चांना उधाण आलं आहे. जी-21 नेत्यांनी काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल आणि सामूहिक नेतृत्व करण्याची मागणी केली आहे.
खरगेंचे आरोप
जी-23 च्या नेत्यांनी केलेल्या मागणीवरुन आता काँग्रेसचं राजकारण आणखी तापलंय. काही जण काँग्रेस पक्षाला तोडण्याच्या प्रयत्नात आहेत, असा घणाघाती आरोप मल्लिकार्जून खरगे यांनी केलाय. सोनिया गांधी या सध्या पक्षाच्या अध्यक्ष आहेत. त्यांच्या नेतृत्त्वावरुन सध्या काँग्रेस पक्षातील राजकारण ढवळून निघालंय.
नुकतीच जी-23 समुहाची बैठक पार पडली होती. या बैठकीला कपिल सिब्बल, आनंद शर्मा, मनिष तिवारी, शशी थरूर, शंकर सिंह वाघेला, अखिलेश प्रसाद सिंह, संदीप दिक्षीत, विवेक तन्खा, पृथ्वीराज चव्हाण, भूपेंद्र सिंह हुड्डा, राज बब्बर, मणिशंकर अय्यर, पीजे कुरियन, राजेंद्र कौर भट्टल, कुलदीप शर्मा, परनीत कौर आणि एमए खान यांनी या बैठकीला हजेरी लावली होती.
कांग्रेस G-23नेत्यामध्ये कुणाकुणाचा समावेश?
- गुलाम नबी आजाद
- कपिल सिब्बल
- शशि थरूर
- मनीष तिवारी
- आनंद शर्मा
- पीजे कुरियन
- रेणुका चौधरी
- मिलिंद देवड़ा
- मुकुल वासनिक
- जितिन प्रसाद पूर्व केंद्रीय मंत्री
- भूपेंदर सिंह हुड्डा
- राजिंदर कौर भट्टल
- एम वीरप्पा मोइली
- पृथ्वीराज चव्हाण
- अजय सिंह
- राज बब्बर
- अरविंदर सिंह लवली
- कौल सिंह ठाकुर
- अखिलेश प्रसाद सिंह
- कुलदीप शर्मा
- योगानंद शास्त्री
- संदीप दीक्षित
- विवेक तन्खा
संबंधित बातम्या :
जरा धीर धरा, मोदी युगानंतर BJPमध्ये फूट पडेल; Veerappa Moily यांचा G-23 नेत्यांना सल्ला
Pegasus 25 कोटीला खरेदीची ऑफर मिळालेली, ममता बॅनर्जींचा धक्कादायक गौप्यस्फोट
Punjab : मोबाईल रिपेअर करणाऱ्यानं चन्नी यांना धूळ चारली! वाचा आपच्या ‘आम’ उमेदवाराबद्दल