मध्य प्रदेशात काँग्रेसला हादरा, ज्योतिरादित्य शिंदेंचा राजीनामा, वडिलांच्या जयंतीलाच वादळी निर्णय, सरकार संकटात

राहुल गांधी यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia resign)  यांनी राजीनामा दिला आहे.

मध्य प्रदेशात काँग्रेसला हादरा, ज्योतिरादित्य शिंदेंचा राजीनामा, वडिलांच्या जयंतीलाच वादळी निर्णय, सरकार संकटात
Follow us
| Updated on: Mar 10, 2020 | 12:34 PM

भोपाळ : मध्य प्रदेशात काँग्रेसला हादरा बसला आहे. कारण राहुल गांधी यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia resign)  यांनी राजीनामा दिला आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपवला आहे. याशिवाय काँग्रेसच्या 19 आमदारांनीही राजीनामे दिल्याने, मध्य प्रदेशातील कमलनाथ यांच्या नेतृत्त्वातील काँग्रेस सरकार अल्पमतात आलं आहे. (Jyotiraditya Scindia resign) 

काँग्रेसचा महत्त्वाचा चेहरा असलेले ज्योतिरादित्य शिंदे (jyotiraditya Scindia meets PM Narendra Modi ) यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेट घेतली. गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांच्यासोबत ज्योतिरादित्य शिंदे मोदींच्या निवासस्थानी दाखल झाले होते. (MP congress crisis)

भाजपकडून ज्योतिरादित्य शिंदे यांना राज्यसभेवर पाठवून, त्यांना थेट केंद्रात मंत्रिपद देण्याच्या तयारीत आहे. राहुल गांधी यांच्या अत्यंत जवळचे असलेले ज्योतिरादित्य शिंदे हेच भाजपच्या संपर्कात आल्याने, काँग्रेसला मोठा झटका आहे.

“गेल्या 18 वर्षांपासून काँग्रेसचा एक सदस्य आहे. मात्र आता काँग्रेसपासून वेगळं होण्याची वेळ आली आहे. मी माझ्या काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे.गेल्या वर्षभरापासून मी याबाबत विचार करत होतो. आता राजीनामा देतोय. सुरुवातीपासूनच देशातील नागरिकांची सेवा करणे हे माझे ध्येय आणि उद्देश आहे. पण आता मी हे माझ्या पक्षात करु शकत नाही असे मला वाटते. त्यामुळे मी एक नवी सुरुवात करत आहे. देशाची सेवा करुन देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिल्याबद्दल मी पक्षातील सदस्यांचे आभार व्यक्त करतो”, असं ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटलं आहे.

कोण आहेत ज्योतिरादित्य शिंदे?

ज्योतिरादित्य शिंदे हे अखील भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस आहेत. ज्योतिरादित्य शिंदे यांचं सुरुवातीचं शिक्षण मुंबईत झालं. नंतर देहरादूनच्या प्रसिद्ध दून स्कूलमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. स्टॅरफोर्ड बिझनेस स्कूलमध्ये पुढील शिक्षण घेतलं. यानंतर ते साडेसात वर्ष अमेरिकेत राहिले आणि नोकरी केली. त्यांचे वडील माधवराव शिंदे यांचं विमान दुर्घटनेत निधन झाल्यानंतर ज्योतिरादित्य राजकारणात आले.

गुना या मध्य प्रदेशातील मतदारसंघातून पहिल्यांदा त्यांनी 2002 साली निवडणूक लढवली आणि निवडून आले. आतापर्यंत ते सलग 4 वेळा निवडून आले आहेत. 2012 ते 2014 या काळात त्यांना यूपीए सरकारमध्ये मंत्रीपदही देण्यात आलं होतं. त्यांची आत्या वसुंधरा राजे या राजस्थानच्या मावळत्या मुख्यमंत्री होत्या. तर यशोधरा राजे मध्य प्रदेश सरकारमध्ये मंत्री होत्या.

राजघराण्यातील असूनही साधं राहणं, सौम्य संवाद, उदार मन आणि सरळ स्वभाव हे ज्योतिरादित्य शिंदे यांचं वैशिष्ट्य आहे. पक्षातील युवा नेता म्हणून त्यांच्याकडे मोठी जबाबदारी देण्यात आली होती. राहुल गांधी यांच्या विश्वासतील नेते म्हणूनही त्यांची ओळख आहे.

मध्य प्रदेश विधानसभेचं गणित

मध्य प्रदेशात विधानसभेच्या 230 जागा आहेत. दोन आमदारांचं निधन झाल्याने ही संख्या 228 वर पोहोचली आहे. काँग्रेसकडे 114 आमदार आहेत. इथे बहुमताचा आकडा 115 आहे. काँग्रेसला 4 अपक्ष आणि 2 बसपा, 1 सपा आमदाराने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसचं संख्याबळ 121 वर पोहोचलं आहे.

दुसरीकडे भाजपकडे 107 आमदारांचं संख्याबळ आहे. मात्र ज्योतिरादित्य शिंदे यांच्या बाजूचे तब्बल 20 आमदार राजीनामा देऊन भाजपला साथ देऊ शकतात. त्यामुळे काँग्रेसचं सरकार अल्पमतात येऊ शकतं.

मध्य प्रदेश (228)

काँग्रेस – 114 भाजप – 107 बसप – 02 सपा – 01 अपक्ष – 04

‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा.
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले.
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा.
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले..
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले...
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा.
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.