Eknath Shinde: काँग्रेसच्या गोटात सर्व काही आलबेल? केंद्रीय निरिक्षक कमलनाथ मुंबईत दाखल, आधी पवारांसोबत नंतर ठाकरेंसोबत चर्चा?

काँग्रेसचे केंद्रीय निरिक्षक कमलनाथ हे मुंबईत दाखल झाले असून, ते आधी शरद पवार यांना भेटणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करणार आहेत.

Eknath Shinde: काँग्रेसच्या गोटात सर्व काही आलबेल? केंद्रीय निरिक्षक कमलनाथ मुंबईत दाखल, आधी पवारांसोबत नंतर ठाकरेंसोबत चर्चा?
Follow us
| Updated on: Jun 22, 2022 | 11:51 AM

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेसोबत बंडोखोरी केली आहे. आपल्याला 40 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा देखील त्यांच्याकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात मोठा पेच निर्माण झाला असून, महाविकास आघाडीचे सरकार कोणत्याही क्षणी कोसळू शकते अशी परिस्थिती आहे. शिवसेनेचे आमदार फुटल्याने आता  महाविकास आघाडीतील उर्वरीत दोन्ही पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी सावध झाले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेसचे (congress) केंद्रीय निरिक्षक कमलनाथ (Kamalnath) हे राज्यात दाखल झाले आहेत. ते मुंबईत दाखल झाले आहेत. कमल नाथ आधी शरद पवार यांच्यासोबत चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. काँग्रेसमध्ये सर्व अलबेल असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

काय म्हटले कमलनाथ यांनी?

कमलनाथ यांनी या सर्व प्रकरणावरून भाजपावर निशाणा साधला आहे. ते सैद्याचे राजकारण करतात. देशभरात त्यांच्याकडून असाच प्रकार सुरू आहे. झारखंडमध्येही तेच झालं, मध्यप्रेदेशच्या जनतेने देखील हेच अनुभवलं. हे लोकशाहीविरोधी आहे. आमच्या संविधानाच्याविरोधी आहे. अशा राजकारणाची सुरुवात ही पुढे धोक्याची घंट ठरणार आहे.  शिवेसेनेचे आमदार फुटले आहे, आता त्यांच्याशी कसा संपर्क साधायचा हे शिवसेनेने ठरवावे. आमच्या गोटात सर्व अलबेल आहे. काँग्रेसचे आमदार विकावू  नाहीत. ते काय काँग्रेससोबत राहातील असा विश्वास असल्याची प्रतिक्रिया यावेळी कमलनाथ यांनी दिली आहे. कमलनाथ हे आधी या सर्व घडामोडींबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर ते उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

हे सुद्धा वाचा

एकनाथ शिंदेंशी चर्चा

दरम्यान दुसरीकडे  शिवसेना नेते संजय राऊत यांनी अजूनही एकनाथ शिंदे हे परत येतील असा विश्वास व्यक्त केला आहे. एकनाथ शिंदे हे आमचे मित्र आहेत. आज सकाळीच त्यांच्यांशी तासभर चर्चा झाली. आमदारांशी देखील चर्चा सुरू आहे. सगळे आपलेच आहेत. लवकरच ते पुन्हा शिवसेनेत परततील असे राऊत यांनी म्हटले आहे. मात्र दुसरीकडे सामनामधून एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे हे ईडी, सीबीआयच्या दबावाला बळी पडले आणि भाजपाच्या जाळ्यात फसले असे सामनामध्ये म्हटले आहे.

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.