अशोक चव्हाण यांच्या जबाबदारीत वाढ, मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय
काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या जबाबदारीत वाढ करण्यात आली (Minister Ashok Chavan New Responsibility) आहे.
मुंबई : काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या जबाबदारीत वाढ करण्यात आली आहे. अशोक चव्हाण यांच्यावर मराठा समाजाच्या विविध मागण्यांच्या पाठपुराव्याची जबाबदारी सोपावण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अशोक चव्हाण यांच्या जबाबदारीत वाढ करुन मुख्यमंत्र्यांनी भाजपला चोख प्रत्युत्तर दिले आहे. (Minister Ashok Chavan New Responsibility)
मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानुसार मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात संबंधित विभागाचे मंत्री आणि सचिवांची बैठक घेऊन शासनाला प्रस्ताव सादर करण्याची जबाबदारी अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील उपसमितीकडेच सोपवण्यात आली आहे.
मराठा आरक्षणविषयक कायदेशीर बाबींचा पाठपुरावा करणाऱ्या या उपसमितीत एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील, विजय वडेट्टीवार सदस्यांचा समावेश आहे. हीच समिती आता मराठा समाजाच्या इतर मागण्यांचाही पाठपुरावा करेल.
मराठा समाजाच्या विविध मागण्यांच्या पाठपुराव्याची जबाबदारी अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीकडे सोपवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.
काही दिवसांपूर्वी शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख आणि आमदार विनायक मेटे यांनी अशोक चव्हाण यांना राज्य सरकारच्या मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीच्या अध्यक्षपदावरुन यांना हटवण्याची मागणी केली होती.
“मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर समस्यांबाबत सरकार झोपेचं सोंग करतंय. त्यामुळं सरकारला जागं करावं लागणार आहे. त्यासाठी आंदोलन करावंच लागणार आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षण विषयक उपसमितीच्या अध्यक्ष पदावरून अशोक चव्हाण यांना हटवावे. अशोक चव्हाण यांच्याऐवजी मंत्री एकनाथ शिंदे किंवा इतर सक्षम मंत्र्याची अध्यक्षपदी नियुक्त करावी,” असे विनायक मेटे म्हणाले होते.
मात्र मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या विविध मागण्यांच्या पाठपुराव्याची जबाबदारी अशोक चव्हाणांना दिली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीकडे सोपवण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.(Minister Ashok Chavan New Responsibility)
संबंधित बातम्या :
‘सरकारमध्ये काँग्रेसला योग्य स्थान नाही’, अशोक चव्हाणांकडून नाराजी व्यक्त