शरद पवार यूपीए अध्यक्ष होणार का, पी. चिदंबरम काय म्हणाले?
संयुक्त पुरोगामी आघाडी (UPA) चे अध्यक्षपद म्हणजे पंतप्रधानपद नाही. आघाडीमध्ये अध्यक्ष नावाची कोणतीही संकल्पना नाही, असे पी. चिदंबरम म्हणाले.
नवी दिल्ली : “संयुक्त पुरोगामी आघाडी (UPA) चे अध्यक्षपद म्हणजे पंतप्रधानपद नाही. आघाडीमध्ये अध्यक्ष नावाची कोणतीही संकल्पना नाही,” असं वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम (P Chidambaram) यांनी केलं. तसेच, राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणजे खुद्द शरद पवार (Sharad Pawar) यांनाच यूपीएच्या अध्यक्षपदामध्ये रस नसावा असेही चिदंबरम यांनी म्हटलं आहे. यूपीएचे अध्यक्षपद शऱद पवार यांना दिले जावे, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले होते. राऊतांनी केलेल्या या वक्तव्यांनतर चिदंबरम यांनी वरील भाष्य केले आहे. (congress leader P. Chidambaram on presidency of the United Progressive Alliance UPA)
“संयुक्त पुरोगामी आघाडीमध्ये अध्यक्ष नावाची कोणतीही संकल्पना नाही. अनेक दल जेव्हा एकत्र येतात, तेव्हा आघाडीचा विस्तार आणि त्यांच्यात बैठका घडवून आणण्यासाठी एका नेत्याची गरज असते. आघाडीमध्ये जो पक्ष सर्वांत मोठा आहे, त्याच पक्षाचा नेता हा यूपीएचा अध्यक्ष असतो, असे चिदंबरम म्हणाले. तसेच, यूपीएच्या अध्यक्षांची निवड ही पंतप्रधानपदाची निवड नाही. सर्वांत मोठ्या पक्षाचा नेता हाच यूपीएच्या बैठाकांचा अध्यक्ष असतो. शरद पवार यांनासुद्धा यूपीएच्या अध्यक्षपदात रस नसावा, असे चिदंबरम म्हणाले.
जो बैठक बोलवेल त्याच पक्षाचा अध्यक्ष
यावेळी बोलताना यूपीएमधील पक्षांची बैठक जो बोलावेल तोच त्या बैठकीचा अध्यक्ष असतो असं चिदंबरम यांनी सांगितलं. तसेच, “कोणताही पक्ष आघाडीची बैठक बोलावणार असेल तर काँग्रेस त्या बैठकीत सहभागी होईल. मात्र, काँग्रेसने बैठक बोलावली असेल तर त्या बैठकीचा अध्यक्ष हा काँग्रेसचाच नेता असतो,” असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
यूपीएमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष
संयुक्त पुरोगामी आघाडीमध्ये एकूण 9 ते 10 पक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, या सर्व पक्षांमध्ये काँग्रेस हाच सर्वात मोठा पक्ष असून काँग्रेसचे लोकसभा आणि राज्यसभेत एकूण 90 ते 100 सदस्य आहेत, असे चिदंबरम म्हणाले.
दरम्यान, राऊत यांनी यूपीएच्या अध्यक्षपदावर केलेल्या भाष्यामुळे राज्यातील काँग्रेस नेत्यांनी राऊतांवर नाराजी व्यक्त करत टीका केली होती.
राहुल गांधी हॉलिडे ट्रिपसाठी इटलीला; संतप्त शेतकरी नेते म्हणाले… https://t.co/xtUFuMtRwX #RahulGandhi #farmersrprotest #CongressFoundationDay
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 28, 2020
संबंधित बातम्या :
“शरद पवार मुख्यमंत्री व्हावेत, संजय राऊतांनी त्यासाठी आग्रह करावा”
(congress leader P. Chidambaram on presidency of the United Progressive Alliance UPA)