AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राहुल गांधी यांच्यामुळे ‘हा’ खासदार अडचणीत, पक्षाने केले निलंबित, नेमकं काय आहे प्रकरण

लोकसभेत चांद्रयान-3 वरील चर्चा सुरु असताना भाजप खासदार रमेश बिधुरी यांनी बसपा खासदार कुंवर दानिश अली यांच्याविरोधात काही आक्षेपार्ह शब्द वापरले. हा वाद वाढत गेला. काँग्रेसनेही बिधुरी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती.

राहुल गांधी यांच्यामुळे 'हा' खासदार अडचणीत, पक्षाने केले निलंबित, नेमकं काय आहे प्रकरण
CONGRESS RAHUL GANDHI AND MP DANISH ALI
| Updated on: Dec 09, 2023 | 6:56 PM
Share

बिहार | 9 डिसेंबर 2023 : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पक्षाच्या खासदार महुआ मोइत्रा यांची खासदारकी रद्द करण्यात आली. पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारल्याचा त्यांच्यावर आरोप होता. हा आरोप सिद्ध झाल्याने संसदेमध्ये चर्चा होऊन मोइत्रा यांची खासदारकी रद्द करण्यात आली. या घटनेला काही तास होत नाहीत तोच आणखी एका खासदाराची खासदारकी धोक्यात आली आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी हे त्याला कारणीभूत ठरले आहेत. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका या खासदारावर ठेवण्यात आला आहे.

लोकसभेत चांद्रयान-3 वरील चर्चा सुरु असताना भाजप खासदार रमेश बिधुरी यांनी बसपा खासदार कुंवर दानिश अली यांच्याविरोधात काही आक्षेपार्ह शब्द वापरले. हा वाद वाढत गेला. त्यामुळे भाजपने खासदार बिधुरी यांना पक्षाने त्यांच्यावर कारवाई का करू नये अशी कारणे दाखवा नोटीस बजावली. त्याचवेळी खासदार दानिश अली यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिले. यामध्ये त्यांनी खासदार रमेश बिधुरी यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी रमेश बिधुरी यांचे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतले. अध्यक्ष ओम बिर्ला यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत रमेश बिधुरी यांना भाषेची मर्यादा जपण्याचा इशारा दिला. बिधुरी यांच्या विधानावर सर्वच विरोधी पक्षांनी टीका केली होती. तर, काँग्रेसनेही बिधुरी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती.

भाजप खासदार रमेश बिधुरी यांनी बसपा खासदार दानिश अली यांच्यातील या वादामुळे राजकारण तापले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दानिश अली यांची त्यांच्या निवासस्थानी सप्टेंबरमध्ये भेट घेतली होती. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल आणि खासदार इम्रान प्रतापगढ़ीही होते.

राहुल गांधी यांच्या भेटीनंतर भावूक झालेले खासदार दानिश यांनी राहुल यांना भेटल्यानंतर आपण एकटे नाही असे वाटले. मला प्रोत्साहन देण्यासाठी ते इथे आले होते. या गोष्टी मनावर घेऊ नका आणि माझ्या तब्येतीची काळजी घ्या असे त्यांनी मला सांगितले. त्याच्या बोलण्याने मला आराम वाटला आणि मी एकटी नाही हे चांगले वाटले, अशी प्रतिक्रिया दिली होती.

राहुल गांधी यांच्या भेटीनंतर उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय यांनीही दानिश अली यांची भेट घेतली. यामुळे काही नवी राजकीय खिचडी शिजली जात आहे की काय, अशी अटकळ बांधली जात होती. त्याही भेटीचे वर्णन करताना खासदार दानिश आली यांनी सुख-दु:खात एकत्र उभे आहोत असे विधान केले होते. यानंतर खासदार दानिश अली सातत्याने काँग्रेससोबत उभे असल्याचे दिसले.

बहुजन समाज पक्षाने (BSP) खासदार दानिश अली यांना अनेक वेळा सूचना दिल्या. मात्र, त्यावेळी त्यांनी आपण पक्षासोबतच असल्याचे सांगितले होते. पंरतु, वेळोवेळी समज देऊनही खासदार दानिश अली यांनी संसदेमध्ये कॉंग्रेससोबत उभे राहिले होते. त्यामुळे खासदार दानिश अली यांची वर्तणूक पक्षविरोधी आहे, असा ठपका ठेवून बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी खासदार दानिश अली यांना पक्षातून निलंबित केले.

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.