मुंबई महापालिकेची नालेसफाईची आकडेवारी खोटी; काँग्रेस आणणार शिवसेनेला अडचणीत

राज्यात शिवसेना आणि काँग्रेस सत्तेत एकत्र असले तरी मुंबई महापालिकेत मात्र या दोन्ही पक्षात विस्तवही जात नाही. (Congress leader ravi raja attacks bmc over nullah cleaning work)

मुंबई महापालिकेची नालेसफाईची आकडेवारी खोटी; काँग्रेस आणणार शिवसेनेला अडचणीत
रवी राजा, विरोधी पक्षनेते, मुंबई महापालिका
Follow us
| Updated on: May 26, 2021 | 3:40 PM

मुंबई: राज्यात शिवसेना आणि काँग्रेस सत्तेत एकत्र असले तरी मुंबई महापालिकेत मात्र या दोन्ही पक्षात विस्तवही जात नाही. संधी मिळताच महापालिकेत शिवसेनेला अडचणीत आणायचं असं धोरण काँग्रेसने घेतलेलं दिसतंय. आता नालेसफाईच्या मुद्द्यावरून काँग्रेसने महापालिका प्रशासनाला घेरण्याची तयारी सुरू केली आहे. प्रशासनाच्या माध्यमातून काँग्रेस शिवसेनेलाच अप्रत्यक्षपणे घेरणार असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. (Congress leader ravi raja attacks bmc over nullah cleaning work)

काँग्रेसचे महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी महापालिकेची नालेसफाईची आकडेवारी खोटी असल्याचा दावा केला आहे. महापालिकेच्या नालेसफाईच्या या आकडेवारीचा पर्दाफाश करणार असल्याचंही रवी राजा यांनी स्पष्ट केलं आहे.

ठेकेदारांसाठी सर्व काही

मुंबई महापालिकेने मुंबई शहरात 102 टक्के, पूर्व उपनगरात 93 टक्के तर पश्चिम उपनगर 96 टक्के नालेसफाई झाल्याचा दावा केला आहे. त्यावर रवी राजा यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. पालिकेचा हा दावा खोटा असून ठेकेदाराना मदत करण्यासाठी नालेसफाईचे आकडे फुगवले जात आहेत, असा गंभीर आरोप रवी राजा यांनी केला आहे.

वर्षभर नालेसफाई करा

मुंबईतील सत्य परिस्थिती अशी आहे की पालिका जी आकडेवारी सांगत आहे. तेवढी नालेसफाई झालेली नाही. केवळ पावसाळ्याच्या तोंडावर नालेसफाई करणं योग्य नाही. वर्षभर नालेसफाई झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे, असं त्यांनी सांगितलं.

गेला गाळ कुणीकडे?

पालिका नालेसफाईची देत असलेली आकडेवारी खोटी आहे. पालिकेने एवढी नालेसफाई केली तर नाल्यातील गाळ गेला कुठे? हा गाळ कुठे टाकला याची माहिती पालिका देत नाही. मग नालेसफाईची आकडेवारी आलीच कुठून?, असा सवाल रवी राजा यांनी केला आहे. त्यामुळे नालेसफाईच्या मुद्दयावरून आता काँग्रेस आणि शिवसेना पालिकेत आमनेसामने उभे ठाकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Congress leader ravi raja attacks bmc over nullah cleaning work)

संबंधित बातम्या:

वृक्ष छाटणीची परवानगी अ‍ॅपवरून मिळणार; पावसाळ्यातील जीवितहानी टाळण्यासाठी मुंबई पालिकेचा निर्णय!

Maharashtra News LIVE Update | ‘यास’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई ते भूवनेश्वर, कोलकाताची विमान वाहतूक पुढील 6 तासांसाठी बंद

रस्त्यावर लुटमारीचा धंदा बंद होताच सराईत गुन्हेगार टीसी बनला, प्रवाशाच्या सतर्कतेमुळे बिंग फुटलं

(Congress leader ravi raja attacks bmc over nullah cleaning work)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.