Video : ‘आधी App बंद पाडला, आता वॅक्सिनेशन सेंटर बिन माय बापाचे’, निरुपमांचा राज्य सरकारवरच संशय
राज्य सरकारच्या या लसीकरण मोहिमेदरम्यान अनेक अडचणी निर्माण होत आहेत. या अडचणींबाबत आता सत्ताधारी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसमधीलच एका नेत्याने आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाची रुग्णसंख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. अशावेळी राज्य सरकारच्या या लसीकरण मोहिमेदरम्यान अनेक अडचणी निर्माण होत आहेत. या अडचणींबाबत आता सत्ताधारी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसमधीलच एका नेत्याने आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तसंच सरकारच्या भूमिकेबाबतही शंका उपस्थित केली आहे.(Sanjay Nirupam’s serious question on the management of health department)
संजय निरुपमांचा गंभीर सवाल
काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी राज्यातील कोरोना लसीकरण मोहिमेतील त्रुटींवर बोट ठेवलं आहे. राज्याच्या आरोग्य यंत्रणेच्या कारभारावर बोट ठेवत त्यांनी एक ट्वीट केलंय. तसंच एक व्हिडीओही शेअर केला आहे. “काल महाराष्ट्रात कोरोना लसीकरणाचं App निकामी झालं. लोक परेशान झाले होते. आज वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये लसीकरण केंद्र विना माय-बापाचं पाहायला मिळालं. 6 मार्चपासून खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरु होणार आहे. त्यांचा धंदा होण्यासाठी तर सरकारी यंत्रणा फेल होत नाही ना?” असा गंभीर सवाल निरुपम यांनी उपस्थित केला आहे.
कल महाराष्ट्र में वैक्सिनेशन का ऐप ध्वस्त हो गया था।लोग परेशान हो गए थे। आज बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स में वैक्सिनेशन सेंटर बिना माँ-बाप का दिख रहा है। 6 मार्च से प्राइवेट अस्पतालों में वैक्सिनेशन शुरु होने हैं। उनके धंधे के लिए तो सरकारी तंत्र फेल नहीं हो रहा है ?#vaccination pic.twitter.com/VhwXnWBYSZ
— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) March 2, 2021
आरोग्य यंत्रणेचा कारभार चव्हाट्यावर!
निरुपम यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे. इतकंच नाही तर याठिकाणी ढकलाढकली होत असल्याचं चित्रही दिसत आहे. त्यात या गर्दीत अनेक वृद्ध नागरिक आणि महिलांही सहभागी होत्या. झालेली गर्दी आणि ढकलाढकलीमुळे त्यांना मोठा त्रास होत असल्याचं या व्हिडीओतून दिसून येत आहे.
निरुपम यांनी ट्वीट केलेल्या या व्हिडीओमुळे सरकारच्या आरोग्य विभागाच्या कारभाराचा नमुना पाहायला मिळत आहे. यावरुनच निरुपम यांनी खासगी रुग्णालयांचा धंदा होण्यासाठी तर सरकारी यंत्रणा फेल होत नाही ना? असा खोचक आणि गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे.
संबंधित बातम्या :
कोरोनाच्या लसीसाठी 250 रुपये का?; अर्थसंकल्पात 35 हजार कोटींची तरतूद कशासाठी आहे?: पृथ्वीराज चव्हाण
कोल्हापूरमध्ये कोरोनाकाळात 35 कोटींचा भ्रष्टाचार?, भाजपच्या आरोपाने खळबळ
Sanjay Nirupam’s serious question on the management of health department