खामोश!! पहिल्याच रॅलीत ही भाषा शोभत नाही, शत्रुघ्न सिन्हांनी मिथुनला सुनावलं

मिथून यांनी खास आपल्या स्टाईलमध्ये भाषणबाजी केली. पण त्यांच्या याच भाषणावर त्यांचे मित्र, प्रसिद्ध अभिनेते आणि काँग्रेस खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी खडे बोल सुनावले आहेत

खामोश!! पहिल्याच रॅलीत ही भाषा शोभत नाही, शत्रुघ्न सिन्हांनी मिथुनला सुनावलं
Follow us
| Updated on: Mar 08, 2021 | 7:20 PM

नागपूर : पश्चिम बंगाल निवडणुकीचा रणसंग्राम आता शिगेला पोहोचला आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजप हरप्रकारे प्रयत्न करत आहे. त्याचाच भाग म्हणून तृणमूल काँग्रेसच्या अनेक मोठमोठ्या नेत्यांना भाजपने आपल्या गोटात सामावून घेतलं आहे. त्यात ममतांच्या जीवावर संसदेत पोहोचलेल्या बॉलिवूड अभिनेते मिथून चक्रवर्ती यांचाही समावेश आहे. मिथून चक्रवर्ती यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्या पहिल्याच भाषणात त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.(Shatrughan Sinha criticizes Mithun Chakraborty’s speech at BJP’s rally in Kolkata)

मिथून यांनी खास आपल्या स्टाईलमध्ये भाषणबाजी केली. पण त्यांच्या याच भाषणावर त्यांचे मित्र, प्रसिद्ध अभिनेते आणि काँग्रेस खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी खडे बोल सुनावले आहेत. सिन्हा आज नागपुरात होते. जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित महिला पत्रकारांच्या सत्कार सोहळ्यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं.

‘साप, विंचू, कोब्राची भाषा नको होती’

“मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपमध्ये प्रवेश केला हे चांगलं आहे. ते माझे जवळचे मित्र आहेत. लोकप्रिय व्यक्तीमत्व आहे. मात्र, पहिल्याच रॅलीत त्यांनी साप, विंचू, कोब्राची भाषा बोलायला नको होती. ते राजकीय बोलले असते तर चांगलं झालं असतं”, अशा शब्दात सिन्हा यांनी मिथुन चक्रवर्ती यांना राजकीय सल्लाच देऊ केलाय. “मिथून चक्रवर्ती यांच्या प्रवेशानं भाजपला फायदा होईल असं नाही. त्यांना फायद्यासाठीच भाजपमध्ये आणण्यात आलं. पण असं होऊ नये की उशिरा आणलं. ममता बॅनर्जी मजबूत आहेत. त्यांना हलवणं एवढं सोपं होणार नाही”, असा दावाही शत्रुघ्न सिन्हा यांनी केलाय.

पंतप्रधान मोदींवरही टीका

सिन्हा यांनी पंतप्रधान मोदींवरही टीका केली. पंतप्रधान मोदी यांनी रॅलीत जे बोलायला हवं होतं ते झालं नाही. त्यांच्या भाषणात मटेरियलची कमी असल्याचं दिसून आलं. आपल्या भाषणात त्यांनी शेतकरी आंदोलनाचा उल्लेख केला असता तर चांगलं झालं असतं, असंही सिन्हा यांनी म्हटलंय. भाजपची रॅली चांगली झाली. पण ममता बॅनर्जींची रॅली या पेक्षा मोठी होती. मिथुन चक्रवर्ती यांच्यामुळे गर्दी वाढली होती, असा टोलाही सिन्हा यांनी लगावलाय.

मिथुन चक्रवर्ती नेमकं काय म्हणाले?

कोलकाता इथं भाजपच्या रॅलीत बोलताना मिथुन चक्रवर्ती यांनी ममता बॅनर्जींवर जोरदार निशाणा साधला. मी असली कोब्रा आहे. दंश केला तर तुमचा फोटो घरात लागेल. मी फक्त एक साप नाही, मी क्रोब्रा आहे. एका दंशात संपवून टाकेन, अशा शब्दात मिथुन यांनी तृणमूल काँग्रेसला जणू इशाराच दिलाय. यावेळी त्यांनी आपल्या चित्रपटातील ‘मारुंगा यहां लाश गिरेगी समशान में’ हा खास डायलॉगही म्हटला. पण हा डायलॉग आता जुना झाला असल्याचंही मिथुन म्हणाले.

संबंधित बातम्या :

कोबरा हूँ… हक छीनेगा तो खड़ा हो जाऊंगा; मिथुन चक्रवतींचा भाजपच्या रॅलीतून हुंकार!

मोदींची पश्चिम बंगालमध्ये रॅली, मिथुन चक्रवर्तींचीही ‘एन्ट्री’; पश्चिम बंगालची हवा बदलणार?

Shatrughan Sinha criticizes Mithun Chakraborty’s speech at BJP’s rally in Kolkata

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.