Praniti Shinde : ‘प्रणिती शिंदे खासदार झाल्या, त्या फक्त…’, शिवसेना शिंदे गटाचा आरोप काय?

Praniti Shinde : सोलापूरच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर शिवसेना शिंदे गटाने आरोप केला आहे. त्यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपा उमेदवार राम सातपुते यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. प्रणिती शिंदे या नेहमीच चर्चेत असणाऱ्या नेत्या आहेत.

Praniti Shinde : 'प्रणिती शिंदे खासदार झाल्या, त्या फक्त...', शिवसेना शिंदे गटाचा आरोप काय?
Praniti shinde
Follow us
| Updated on: Jun 18, 2024 | 12:42 PM

सोलापूरमधून प्रणिती शिंदे पहिल्यांदाच खासदार म्हणून लोकसभेवर निवडून गेल्या आहेत. त्यांनी भाजपाच्या राम सातपुते यांचा पराभव केला. याआधी मागची दहावर्ष सोलापूरची जागा भाजपाकडे होती. प्रणिती शिंदे यांनी पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवली व विजय मिळवला. याआधी प्रणिती शिंदे आमदार होत्या. प्रणिती शिंदे या नेहमी चर्चेत असतात. सत्ताधाऱ्यांचा नेहमीच त्यांनी आपल्या खास शैलीत समाचार घेतला आहे. आता शिवसेना शिंदे गटाने काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर आरोप केला आहे.

“मराठ्यांची मतं पाहिजेत. मात्र जरांगे पाटील यांना भेटायला, पाठिंबा द्यायला नको. प्रणिती शिंदेंची भूमिका चुकीची आहे” अशी टीका शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी केली. “प्रणिती शिंदे या मराठा समाज आणि मनोज जरांगे फॅक्टरमुळे खासदार झाल्या आहेत. त्यांनी कदापी डोक्यात हवा घालून घेऊ नये की काँग्रेसच्या लोकप्रियतेवर आपण खासदार झालो आहोत” अशी टीका अमोल शिंदे यांनी केली.

मराठ्यांची मते पाहिजेत, पण….

“जरांगे पाटलांसोबत बुके देऊन फोटो काढत तो व्हायरल करण्यासाठी किती आटापिटा केला ते सगळ्यांनी पाहिले. मात्र जरांगे पाटलांनी केलेल्या आमरण उपोषणाला तिथे जाऊन प्रणिती शिंदे यांनी पाठिंबा दिला नाही. मराठ्यांची मते पाहिजेत. मात्र जरांगे पाटील यांना भेटायला, पाठिंबा द्यायला नको प्रणिती शिंदेंची ही भूमिका चुकीची आहे” असं अमोल शिंदे म्हणाले.

जरांगे पाटलांना का भेटल्या नाहीत?

“मराठा समाजाने देखील मराठा समाजाची फसवणूक करणाऱ्या नेत्यांना वेळीच ओळखले पाहिजे. एकीकडे पंकजा मुंडे यां ओबीसी नेते लक्ष्मण हाकेना भेटतात, मग प्रणिती शिंदे जरांगे पाटलांना का भेटल्या नाहीत?” असा सवाल अमोल शिंदे यांनी उपस्थित केला. ते शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख आहेत.

बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.