‘टीका करण्याची आवड असेल तर टीका सहन करण्याची ताकद ठेवा’, वडेट्टीवारांचा चंद्रकांतदादांना टोला

मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केलीय.

'टीका करण्याची आवड असेल तर टीका सहन करण्याची ताकद ठेवा', वडेट्टीवारांचा चंद्रकांतदादांना टोला
विजय वडेट्टीवार, मदत आणि पुनर्वसनमंत्री
Follow us
| Updated on: May 03, 2021 | 6:14 PM

मुंबई : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्तेचा सोपान गाठता आला नाही. निवडणुकीदरम्यान भाजप नेत्यांनी 205 जागा जिंकण्याचा दावा केला होता. त्यावरुन काँग्रेस नेते, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केलीय. बंगाल निवडणुकीतील पराभवानंतर पाटील डिस्टर्ब झाले आहेत. टीका करण्याची आवड असेल तर टीका सहन करण्याचीही ताकद असायला हवी, असा टोलाही वडेट्टीवारांनी पाटलांना लगावला आहे. (Vijay Vadettiwar criticizes Chandrakant Patil over West Bengal Election result)

निवडणुकांचे योग्य नियोजन केलं असतं तर कोरोना वाढला नसता. 5 राज्याच्या निवडणुका जिंकण्याच्या हव्यासापोटी देशात बिकट स्थिती निर्माण झाल्याचा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केलाय. महाराष्ट्रानं आकडे लपवले नाहीत. इतर राज्यांनी आकडे लपवले, असंही वडेट्टीवार म्हणाले. राज्य सरकारने साडे सहा हजार कोटी रुपये कोरोना लस आणि ऑक्सिजन खरेदीसाठी ठेवले आहेत. आता केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला किती मानतं हे पाहावं लागेल. लाखोंच्या संख्येनं रुग्ण मिळत असूनही लॉकडाऊन का घोषित केला जात नाही? असा सवालही वडेट्टीवार यांनी केंद्राला विचारलाय.

अदर पुनावाला प्रकरणाची चौकशी व्हायला हवी

केंद्र सरकारचं लसीकरणाचं नियोजन बिघडलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला मोठी चपराक दिली आहे. सामुहिक जबाबदारीने संकटावर मात करण्याची तयारी न दाखवता फक्त घोषणा केली जाते. नागपुरात कोरोनाचे 5 स्ट्रेन पाहायला मिळाले आहेत. अदर पुनावाला प्रकरणाची चौकशी व्हायला हवी. आशिष शेलार यांनी अदर पूनावाला यांना कुणी धमकावलं याचा भांडाफोड करावाच, असं आव्हानही वडेट्टीवार यांनी केलंय.

छगन भुजबळांचीही चंद्रकांतदादांवर टीका

छगन भुजबळ तुम्ही जामिनावर बाहेर आहात. निर्दोष सुटलेले नाहीत. फार बोलू नका. नाही तर महागात पडेल, या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या धमकीवर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पलटवार केला आहे. तुम्ही सांगाल ते करायला न्यायदेवता म्हणजे सीबीआय, ईडी नाही, असा टोला छगन भुजबळांनी लगावला आहे.

कुणाकुणावर रागावणार?

छगन भुजबळांनी मीडियाशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील यांच्या धमकीची खिल्ली उडवली. ममता बॅनर्जी या झाशीच्या राणी सारख्या एकहाती लढल्या. झाशीच्या राणीने मेरी झाशी नही दुंगी असं म्हटलं होतं. ममता दीदींनीही मेरा बंगाल नही दुंगी असं म्हटलं. माझ्या या विधानावर रागावण्यासारखं काय आहे? आता पराभवाची सवय करून घेतली पाहिजे. पराभव सहन करायला हवा. आता वारंवार फटके बसणार, तुम्ही किती लोकांवर रागावणार आहात?, असा चिमटाही त्यांनी काढला.

संबंधित बातम्या :

‘चंद्रकांतदादा… दैदिप्यमान कामगिरीमुळेच तुम्हाला कोल्हापूर सोडून पुण्यातील मतदारसंघ निवडावा लागला’

… तर अजित पवारांचा राजीनामा घेणार का?; आशिष शेलारांचा नवाब मलिक यांना सवाल

Vijay Vadettiwar criticizes Chandrakant Patil over West Bengal Election result

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.