एसटी कर्मचाऱ्यांना भाजपनं उचकावलं आणि साथ सोडली, नाना पटोलेंचा भाजपवर निशाणा

काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST Workers Strike), नागपूर महापालिका निवडणूक, सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणावर भाष्य केलं.

एसटी कर्मचाऱ्यांना भाजपनं उचकावलं आणि साथ सोडली, नाना पटोलेंचा भाजपवर निशाणा
नाना पटोले
Follow us
| Updated on: Feb 22, 2022 | 4:34 PM

नागपूर : काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST Workers Strike), नागपूर महापालिका निवडणूक, सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणावर भाष्य केलं. एसटी कामगारांनी त्यांच्या प्रश्नावर लढा दिला, भाजपनं त्यांना उचकवले, आणि त्यांची साथ सोडली. आज त्यांच्या परिवाराची वाईट अवस्था आहे, यावर सकारात्मक तोडगा काढला पाहिजे अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांना केलीय,असंही नाना पटोले म्हणाले. यासह नाना पटोले यांनी देशात परिवर्तन हवं असेल तर काँग्रेस हा मूळ पक्ष आहे, त्यामुळं आम्ही काँग्रेस सोबत आहोत, असं चंद्रशेखर राव यांना सांगितलं. काल त्यांची भेट होऊ शकली नाही, मी स्वतः त्यांची भेट घेणार आहे, असंही नाना पटोले म्हणाले.

काँग्रेसमध्ये लोक परत येत आहेत

भाजपनं नागपूरकरांना आर्थिक बोजाखाली टाकण्याचं काम केलं आहे. हे लोकांच्या लक्षात आलं, त्यामुळं भाजप मधील लोकं आता काँग्रेस मध्ये परत येत आहेत. देशात परिवर्तन हवं असेल तर काँग्रेस हा मूळ पक्ष आहे, त्यामुळं आम्ही काँग्रेस सोबत आहोत, असं चंद्रशेखर राव यांना सांगितलं, काल त्यांची भेट होऊ शकली नाही, मी स्वतः त्यांची भेट घेणार आहे, असं नाना पटोले म्हणाले.

नागपूरच्या पालकमंत्री यांच्या विरोधात जे काही आरोप लावले गेले त्या संबंधाची माहिती नाही, त्यामुळं आरोपावर भाष्य करण्यात काही अर्थ नाही,असं नाना पटोले म्हणाले.

आरोप कुणी लावला यात अर्थ नाही, आरोपात किती तथ्य आहेत हे महत्त्वाचे आहे, या आरोपांमुळे महाराष्ट्राची बदनामी होत आहे, हे थांबविले पाहिजे, असं नाना पटोले म्हणाले. सुशांतसिंग प्रकरणात तेच केले, त्यात निघाले काय, बिहारच्या निवडणुका लढायचे होते, हे स्पष्ट झाले आहे, असं नाना पटोले यांनी सांगितलं आहे.

ही महाराष्ट्राची संस्कृती नाही

अर्वाच्य भाषेत राजकारण्यांनी बोलणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, मी गावगुंडांबद्दल बोललो, त्यावेळी ते काय बोलले हे सर्वांना माहीत आहे. कुणीही कुणाचा राजीनामा मागू शकतो, परवा मला एका भिकाऱ्याने नरेंद्र मोदी यांचा राजीनामा मागितला, असा टोला देखील नाना पटोले यांनी लगावला.

इतर बातम्या :

एसटी कर्मचाऱ्यांच्या अहवालावर शुक्रवारी सुनावणी, विलीनीकरणाच्या याचिकेला तारीख पे तारीख

नागपूर मनपा निवडणुकीची धूळवड, काँग्रेसच्या शहराध्यक्षांनी फोडला बाँब, भाजपची सत्ता उलथविण्याचा प्लान सांगितला

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.