शरद पवार देशाचे राष्ट्रपती होणार असतील तर काँग्रेसचा फुल्ल सपोर्ट- नाना पटोले
सध्या देशात राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होत आहे. त्यापार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी एक ट्विट केलंय. यात त्यांनी पवारांना काँग्रेसचा पवारांना पूर्ण पाठिंबा असेल, असं म्हटंलय.
मुंबई : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसोबत एक मुद्दा वारंवार चर्चिला जातो, तो म्हणजे शरद पवार (Sharad Pawar) अन् राष्ट्रपतीपद. हा मुद्दा सविस्तर पाहणारच आहोत. पण सध्या देशात राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर नाना पटोले (Nana Patole) यांनी एक ट्विट केलंय. “महाराष्ट्राची व्यक्ती देशाची राष्ट्रपती होत असेल तर याचा मला आनंदच होईल. शरद पवारांकडे राष्ट्रपतीपद येणार असेल तर काँग्रेसचा त्याला पूर्ण पाठिंबा असेल”, असं ट्विट नाना पटोलेंनी केलंय.
सध्या देशात निवडणुकांचं वारं वाहत आहे. राज्यसभेची रणधुमाळी नुकतीच पार पडली. तर आठ दिवसांवर विधान परिषदेची निवडणूक आहे. तर 18 जुलैला मतदान पार पडेल. तर 21 जुलैपर्यंत नव्या राष्ट्रपतींची निवड प्रक्रिया पूर्ण होईल. अश्यात यंदा पवारांनी राष्ट्रपती व्हावं, यासाठी महाराष्ट्र काँग्रेस आग्रही आहे. नाना पटोलेंनी तसं ट्विट केलं आहे.
महाराष्ट्राची व्यक्ती देशाची राष्ट्रपती होत असेल तर याचा मला आनंदच होईल.#Maharashtra pic.twitter.com/IlLgZMliIe
— Nana Patole (@NANA_PATOLE) June 12, 2022
राष्ट्रपतीपद आणि शरद पवार
शरद पवार यांच्या राजकीय सामाजिक वावराला 50 वर्षाहून अधिक काळ पूर्ण झाला. पवारांच्या राजकीय गुगलीची भल्याभल्या राजकीय उस्तादांना उकल होत नाही. पण सगळ्यांना पुरून उरणाऱ्या पवारांना पंतप्रधान आणि राष्ट्रपतीपदाने कायम हुलकावणी दिली आहे. देशाचं घटनात्मक सर्वोच्चपद कायम त्यांच्या नावाच्या भोवती चर्चेत राहिलं. पण त्या खुर्चीत बसण्याचा मान त्यांना मिळाला नाही.
सध्या देशात ही निवडणूक होऊ घातली आहे. तर त्याचवेळी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा पवारांचं नाव पुढे केलं आहे. त्यामुळे पवारांच्या नावाची चर्चा पुन्हा एकदा होऊ लागली आहे.