Rajeev Satav Death | राष्ट्रवादीची सीट घेऊन राजीव सातवांना मैदानात उतरवलं, मोदी लाटेतही जिंकून काँग्रेसची मान उंचावली

राष्ट्रवादीला दुसरा मतदारसंघ सोडून राजीव सातव यांच्यासाठी हिंगोली मतदरासंघ मागून घेण्यात आला होता. काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांच्याकडून आठवणींना उजाळा (Rajeev Satav won Hingoli Loksabha )

Rajeev Satav Death | राष्ट्रवादीची सीट घेऊन राजीव सातवांना मैदानात उतरवलं, मोदी लाटेतही जिंकून काँग्रेसची मान उंचावली
Rajeev Satav PM Narendra Modi
Follow us
| Updated on: May 16, 2021 | 10:56 AM

मुंबई : काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव (Congress MP Rajeev Satav) यांचे कोरोना संसर्गानंतर उपचारादरम्यान निधन झाले. गेल्या काही वर्षांमध्ये काँग्रेसच्या संघटनात्मक राजकारणात राजीव सातव हे नाव सातत्याने चर्चेत होते. राहुल गांधी यांचे निकटवर्तीय एवढ्यापुरताच त्यांची ओळख मर्यादित नव्हती. तर राजीव सातव यांनी लोकांमधून निवडून येण्याचीही कामगिरी करून दाखवली होती. 2014 मध्ये संपूर्ण देशात मोदी लाटेचा प्रचंड जोर असतानाही राजीव सातव यांनी हिंगोली मतदारसंघातून विजय मिळवून दाखवला होता. (Congress MP Rajeev Satav won Hingoli Loksabha 2014 seat after exchanging seat with NCP)

हिंगोली मतदारसंघ राष्ट्रवादीकडे

2014 च्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेसचे अशोक चव्हाण आणि राजीव सातव हे दोनच खासदार निवडून आले होते. 2014 मध्ये राजीव सातव यांना लोकसभेची उमेदवारी दिली गेली त्यावेळी हिंगोली मतदारसंघ हा राष्ट्रवादीकडे होता. मात्र, राजीव सातव यांच्यासाठी त्यावेळी काँग्रेसने राष्ट्रवादीशी वाटाघाटी केल्या होत्या.

माणिकराव ठाकरेंची सातवांसाठी फील्डिंग

राष्ट्रवादीला दुसरा मतदारसंघ सोडून राजीव सातव यांच्यासाठी हिंगोली मतदरासंघ मागून घेण्यात आला. यावरुन तत्कालीन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि राजीव सातव यांच्या समर्थकांना पक्षांतर्गत टीकेला सामोरे जावे लागले होते. मात्र, राजीव सातव यांनी शिवसेनेच्या सुभाष वानखेडे यांचा पराभव करत पक्षाचा विश्वास सार्थ ठरवला होता.

2019 मध्ये लोकसभेची उमेदवारी नाकारली

त्यानंतर 2019 मध्ये राजीव सातव यांनी लोकसभेची उमेदवारी नाकारली. तोपर्यंत राजीव सातव यांनी काँग्रेसमध्ये राष्ट्रीय पातळीवर चांगल्या प्रकारे बस्तान बसवले होते. ते राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक म्हणून ओळखले जात होते. राजीव सातव यांच्या नेतृत्वात काँग्रेसने 2017 मधील गुजरात विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळवलं होतं. फेब्रुवारी 2010 ते डिसेंबर 2014 या काळात त्यांनी भारतीय युवा काँग्रेसचं अध्यक्षपदही भूषवलं होतं.

राजीव सातव यांचे निधन

गेल्या काही दिवसांपासून राजीव सातव कोरोनाशी झुंज देत होते. 23 दिवसांपासून सातव व्हेंटिलेटरवर होते. कोरोनावर मात केल्यानंतर त्यांच्या शरीरात सायटोमॅजिलो व्हायरस आढळला होता. मात्र व्हायरसशी झुंज देताना पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये (Pune Jehangir hospital) राजीव सातव यांनी अखेरचा श्वास घेतला.

कोण होते राजीव सातव?

45 वर्षीय राजीव सातव हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (एआयसीसी) चे गुजरात प्रभारी होते, तर काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे निमंत्रक होते. राजीव सातव यांच्या मातोश्री रजनी सातव काँग्रेसच्या आमदार होत्या. राजीव सातव यांच्या नेतृत्वात काँग्रेसने 2017 मधील गुजरात विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळवलं होतं. फेब्रुवारी 2010 ते डिसेंबर 2014 या काळात त्यांनी भारतीय युवा काँग्रेसचं अध्यक्षपदही भूषवलं होतं. काँग्रेस पक्ष आणि गांधी घराण्यावर असलेल्या निष्ठेमुळे त्यांचं पक्षात वजन होतं. याशिवाय ते थेट राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याशी कोणत्याही मुद्द्यांवर बोलत असायचे. (Rajeev Satav won Hingoli Loksabha )

चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्कार

हिंगोलीच्या खासदारपदी असताना सातव यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, मनरेगा, दुष्काळ, रेल्वे यासारख्या अनेक मुद्द्यांवर संसदेत आवाज उठवला. संसदेत 1075 प्रश्न विचारत 205 वादविवादांमध्ये सातव सहभागी झाले होते. राजीव सातव यांची 81 टक्के उपस्थितीही उल्लेखनीय होती. त्यांना सलग चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

राज्यसभेवर वर्णी

राजीव सातव यांनी स्वतःहून 2019 मधील लोकसभा निवडणुकीत न उतरण्याचा निर्णय घेतला. मात्र गेल्या वर्षी झालेल्या राज्यसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या कोट्यातून सातव यांची खासदारपदी वर्णी लागली होती.

संबंधित बातम्या :

राजकारणातला देवमाणूस गेला, राजीव सातवांबद्दल बोलताना वडेट्टीवार ढसाढसा रडले

माझा मित्र गेला, आमचं अपरिमित नुकसान, राजीव सातव यांच्या निधनाने राहुल गांधी भावूक

गांधी कुटुंबाचा निष्ठावान नेता, राहुल गांधींचा विश्वासू मोहरा, कोण होते राजीव सातव?

(Congress MP Rajeev Satav won Hingoli Loksabha 2014 seat after exchanging seat with NCP)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.