त्या 6 जागा, जिथे काँग्रेस-राष्ट्रवादीला जिंकण्याची पूर्ण हमी!

मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीनं जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. काँग्रेसनं जानेवारीपर्यंत घटकपक्षांना बरोबर घेऊन आघाडी जाहीर करण्याची भूमिका घेतली आहे. विशेष म्हणजे भाजप- शिवसेनेला पराभूत करण्यासाठी आघाडीनं जागांच्या घासाघिसीवर काहीशी समजुतीची भूमिका घेतली आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर काँग्रेस जोमाने कामाला लागली असून, जास्तीत जास्त छोट्या पक्षांना बरोबर घ्यायचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. त्यामुळं माकप, स्वाभिमानी शेतकरी […]

त्या 6 जागा, जिथे काँग्रेस-राष्ट्रवादीला जिंकण्याची पूर्ण हमी!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:48 PM

मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीनं जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. काँग्रेसनं जानेवारीपर्यंत घटकपक्षांना बरोबर घेऊन आघाडी जाहीर करण्याची भूमिका घेतली आहे. विशेष म्हणजे भाजप- शिवसेनेला पराभूत करण्यासाठी आघाडीनं जागांच्या घासाघिसीवर काहीशी समजुतीची भूमिका घेतली आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर काँग्रेस जोमाने कामाला लागली असून, जास्तीत जास्त छोट्या पक्षांना बरोबर घ्यायचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. त्यामुळं माकप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, सपा, कपिल पाटील यांचा लोकभारती पक्ष, बहुजन विकास आघाडी, गवई आरपीआय गट यांच्याशी काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते मॅरेथॉन चर्चा करताना दिसत आहेत. या आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात आली असून, त्याची घोषणा जानेवारीत दिल्लीच्या पातळीवर केली जाणार आहे.

वाचा:  अखेर राष्ट्रवादीने पुण्याच्या जागेचा हट्ट सोडला!

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 40 जागांवर आघाडीची चर्चा झाली होती.त्यानंतर काही जागांच्या अदलाबदलीवर चर्चा सुरु होती. त्यातल्या पुण्याच्या जागेचा तिढा सोडवण्यात काँग्रेसला यश आलं आहे. त्याठिकाणी वंदना चव्हाण किंवा इतर उमेदवारांना उमेदवारी द्यायचा प्रयत्न राष्ट्रवादीचा होता, पण अखेर हा हट्ट सोडल्याने ही जागा आता काँग्रेस लढणार आहे. तर काही जागा घटकपक्षांना सोडली जाण्याची शक्यता आहे.  त्यामध्ये

-राजू शेट्टी यांच्यासाठी हातकणंगलेची जागा सोडली जाणार आहे

-तर पालघरची जागा बहुजन विकास आघाडीसाठी सोडायचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.

-अकोल्याची जागा भारिप बहुजन महासंघाच्या प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी ठेवण्याची आघाडीची तयारी आहे.

-तर अमरावतीची जागा राजेंद्र गवई यांच्यासाठी सोडली जाऊ शकते.पण त्यांनी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी अशी मागणी होत आहे. त्याला गवई तयार नाहीत.

वाचा: भाजपच्या गुप्त सर्व्हेचे आकडे उघड, शिवसेनेसोबतच्या युतीसाठी धडपड

राजू शेट्टी त्यांच्या पक्षाला सहा जागा मागत असले तरी एकाच जागेवर त्यांना समाधान मानावे लागणार आहे. आघाडीत सर्व काही आलबेल असलं तरी, सहा जागांचा पेच मात्र कायम आहे. त्यामध्ये अहमदनगर, रत्नागिरी सिंधुदुर्ग, नंदूरबार, यवतमाळ, औरंगाबाद आणि रावेर या जागांचा समावेश आहे.

अहमदनगरसाठी काँग्रेस इच्छुक

1) अहमदनगरची जागा सध्या राष्ट्रवादीकडे असली तरी तिथे विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे इच्छुक आहेत. त्यांच्यासाठी काँग्रेसला ही जागा हवी आहे.

सिंधुदुर्ग कुणाकडे?

2) तर सिंधुदुर्गची जागा ही राष्ट्रवादीनं मागितली आहे. काँग्रेसकडे त्यासाठी तुल्यबळ उमेदवार नसल्याचं कारण दिलं जात आहे. पण राणे कुटुंबियांसाठी तर ही जागा राष्ट्रवादी मागत नाही ना अशी चर्चा आहे.

नंदुरबारसाठी दोघांचा हट्ट

3) नंदुरबारमधली जागा काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ आहे. तिथून काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांची कन्या निर्मला गावित यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. पण राष्ट्रवादी मात्र एका भाजपच्या विद्यमान खासदारासाठी या जागेवर दावा ठोकण्याचा प्रयत्न करत आहे.

यवतमाळवर राष्ट्रवादीचा दावा

4) यवतमाळच्या जागेवर राष्ट्रवादीनं दावा सांगितला आहे. तिथून काँग्रेसकडून माणिकराव ठाकरे किंवा शिवाजीराव मोघे यांना तिकीट द्यायचा प्रयत्न केला जात आहे. पण राष्ट्रवादी मनोहर नाईक यांच्यासाठी आग्रही आहे.

औरंगाबादचा तिढा कसा सुटणार?

5) औरंगाबादच्या जागेचा तिढाही असाच आहे. औरंगाबादची जागा काँग्रेसकडे असली तरी तिथे राष्ट्रवादी काँग्रेस सतीश चव्हाण यांच्यासाठी इच्छुक आहे.

रावेरची जागा कुणाला?

6) तर रावेरच्या जागेवर स्थानिक नेत्यांनी काँग्रेसनं ही जागा लढावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. रावेरमध्ये माजी खासदार उल्हास पाटील या जागेसाठी आग्रही आहे. तर गेल्यावेळी मनिष जैन यांनी काँग्रेसकडून राष्ट्रवादीकडे जात निवडणूक लढवली होती.

त्यामुळं सहा जागांचा तिढा सुटला तर आघाडी प्रत्यक्षात येईल आणि हा तिढा समजुतीनं सोडवण्याचा काँग्रेस राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे.

संबंधित बातम्या

अखेर राष्ट्रवादीने पुण्याच्या जागेचा हट्ट सोडला!  

भाजपच्या गुप्त सर्व्हेचे आकडे उघड, शिवसेनेसोबतच्या युतीसाठी धडपड 

धक धक गर्ल पुण्यातून लोकसभेच्या रिंगणात? 

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.