शिवसेनेला मुंबईत जशास तशी टक्कर देण्याची काँग्रेसची तयारी! भाई जगतापांच्या हाती कोणती सूत्रं?

काही दिवसांपूर्वीच मुंबई काँग्रेसमधील जबाबदारीचं वाटप करण्यात आलं आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी भाई जगताप यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

शिवसेनेला मुंबईत जशास तशी टक्कर देण्याची काँग्रेसची तयारी! भाई जगतापांच्या हाती कोणती सूत्रं?
Follow us
| Updated on: Jan 08, 2021 | 12:09 PM

मुंबई: भाई जगताप यांची नुकतीच मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि विविध समित्यांच्या नियुक्तीनंतर सर्वांना आपल्या जबाबदारीचं वाटप करण्यात आलंय. तसंच काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी 100 दिवसांची योजना तयार करुन सर्वांची जबाबदारी निश्चित केली आहे. त्यानंतर मुंबई काँग्रेसमध्ये कुरघोडीचं राजकारण सुरु झाल्याच्या पार्श्वभूमीवर एच. के. पाटील यांनी संपूर्ण कमान हाती घेतली आहे. (Congress prepares for Mumbai Municipal Corporation elections)

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप असले तरी एच. के. पाटील निर्णय प्रक्रियेतील प्रमुख व्यक्ती बनले आहेत. पक्षाच्या प्रवक्त्यांचीही भूमिका स्पष्ट झाली असून, त्यांना प्रत्येक आठवड्याला पत्रकार परिषद घेण्यास सांगण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबई काँग्रेसमधील जबाबदारीचं वाटप करण्यात आलं आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी भाई जगताप यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तर पक्षाच्या निवडणूक अभियानाचे प्रमुख म्हणून नसीम खान, समन्वय समिती प्रमुख अमरजीत सिंह मनहास, निवडणूक घोषणापत्र आणि प्रचार समिती प्रमुख सुरेश शेट्टी, मुंबई काँग्रेसमध्ये महाराष्ट्र काँग्रेसचे प्रतिनिधी चंद्रकांत हंडोरे, आणि कार्यकारी अध्यक्षपदी चरणसिंह सप्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सर्वांचा रिपोर्ट एच. के. पाटलांकडे

मुंबई काँग्रेसमधील नियुक्त्यांनंतर सर्वांच्या जबाबदाऱ्याही निश्चित करण्यात आल्या आहेत. कुणीही एक-दुसऱ्याच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप करु नये यासाठी या जबाबदाऱ्यांचं वाटप करण्यात आलं आहे. हे सर्वजण मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्याऐवजी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांना रिपोर्ट करतील.

कुणाकडे कुठली जबाबदारी?

भाई जगताप –

मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्याकडे सदस्य नोंदणी अभियान राबवणे, मुंबई काँग्रेसचे सर्व फ्रंट, विभाग, सेलचं पुढील 45 दिवसांत पुनर्गठन करणं, सार्वजनिक सभा करण्यापासून 100 दिवसांत 100 किलोमीटरपर्यंत पदयात्रा करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

नसीम खान –

निवडणूक अभियान समितीचे प्रमुख नसीम खान यांच्याकडे 15 जानेवारीपर्यंत निवडणूक प्रचार उपसमितीची निर्मिती, त्यातील सदस्यांची निवड करण्यापासून अजेंडा ठरवण्याचं काम देण्यात आलं आहे.

अमरजीत सिंह मनहास –

ई काँग्रेस समन्वय समितीचे प्रमुख अमरजीत सिंह मनहास यांच्याकडे मुंबई काँग्रेस, महाराष्ट्र काँग्रेस, राज्य सरकारमधील मंत्री आणि मुंबई महापालिकेत समन्वय राखण्याची जबाबादारी दिली आहे.

सुरेश शेट्टी –

निवडणूक घोषणा पत्र आणि प्रचार समिती प्रमुख सुरेश शेट्टी यांच्याकडे काँग्रेसचं काम लोकांपर्यंत पोहोचवणं, भाजपच्या उणिवा शोधणं, राज्य सरकारनं राबवलेल्या जनहिताच्या योजना समोर आणणं, मुंबईच्या विकासातील मुंबई काँग्रेसचं योगदान, मुंबई काँग्रेसचा प्रचार अशा जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.

सर्व पदाधिकारी –

सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मुंबई महापालिकेच्या सर्व 227 प्रभागांमध्ये उपसमितीचा दौरा करण्यास सांगण्यात आलं आहे. तसंच सर्व 227 वॉर्डात पक्षाला मजबूत करण्यासाठी ताळमेळ राखण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या:

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षाच्या निवडीतही निष्ठावान Vs आयाराम गयाराम?

शिवसेनेची कोंडी करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी भाजप एकवटले, गटनेत्यांकडून आयुक्तांची भेट

Congress prepares for Mumbai Municipal Corporation elections

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.