काँग्रेसची नवी सुरुवात, नवा अध्यक्ष आज ठरणार, निकाल कधी? वाचा अपडेट्स

देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी 17 ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. यासाठी जवळपास 96 टक्के  मतदान झालं. 

काँग्रेसची नवी सुरुवात, नवा अध्यक्ष आज ठरणार, निकाल कधी? वाचा अपडेट्स
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Oct 19, 2022 | 9:55 AM

नवी दिल्लीः दीर्घ प्रतीक्षेनंतर काँग्रेसला आज पुन्हा एकदा पूर्णकाळ अध्यक्ष (Congress President) मिळणार आहे. विशेष म्हणजे 24 वर्षानंतर गांधी घराण्याबाहेरील व्यक्ती आज काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान होईल. मल्लिकार्जून खरगे (Mallikarjun Kharge) आणि तिरुअनंतपुरमचे खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) यांच्यापैकी एकजण काँग्रेसचा नवा अध्यक्ष असेल. यानिमित्ताने देशातील प्रमुख विरोधी पक्ष असेलल्या काँग्रेसची ध्येय-धोरणं नव्याने आखली जाण्याची अपेक्षा आहे.

  1. देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी 17 ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. यासाठी जवळपास 96 टक्के  मतदान झालं.
  2. मतदान झाल्यानंतर सर्व मतदान केंद्रावरील मतपेट्या काँग्रेसच्या मुख्यालयात आणण्यात आल्या आहेत. येथील एका स्ट्राँग रुमममध्ये पेट्या सुरक्षित असल्याची माहिती पक्षातील केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाच्या एका पदाधिकाऱ्याने दिली.
  3. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सोनिया गांधी, मनमोहन सिंग, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसह जवळपास 9500 सदस्यांनी या निवडणुकीत सहभाग घेतला.
  4. काँग्रेस पक्षाला 137 वर्षांचा इतिहास आहे. अध्यक्षपदासाठीची ही 6 वी निवडणूक आहे.
  5.  सोमवारी अध्यक्षपदासाठी 96 टक्के मतदान झाले. काँग्रेसच्या नवी दिल्लीतील मुख्यालयासह जवळपास 68 मतदान केंद्रांवर हे मतदान घेण्यात आलं.
  6. अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जून खरगे आणि शशी थरूर यांची लढत असली तरीही खरगे यांचा दावा प्रबळ मानला जातोय.
  7. काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळाल्यानंतर  सोनिया गांधी या काँग्रेस अध्यक्षपदावरून बाजूला होतील. यासोबत काँग्रेसमधील सोनिया गांधीचं युग यानिमित्ताने संपेल असं म्हटलं जातंय. सोशल मीडियावर यासंबंधीचे अनेक संदेश फिरत आहेत.
  8. दरम्यान, गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष असला तरीही तो हायकमांडच्या हुकुमाबाहेर नसेल, असाही एक सूर उमटतोय.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.