Congress | काँग्रेसचे अध्यक्षपद कुणाकडे? लवकरच घोषणा, 28 ऑगस्ट रोजी सोनिया गांधींच्या नेतृत्वात वर्किंग कमिटीची महत्त्वाची बैठक

देशभरात पसरलेलं भाजपचं नेटवर्क आणि आम आदमी पार्टीचा वाढता प्रभाव ही दोन मोठी आव्हानं काँग्रेससमोर आहेत.

Congress | काँग्रेसचे अध्यक्षपद कुणाकडे? लवकरच घोषणा, 28 ऑगस्ट रोजी सोनिया गांधींच्या नेतृत्वात वर्किंग कमिटीची महत्त्वाची बैठक
सोनिया गांधीImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Aug 24, 2022 | 1:24 PM

नवी दिल्लीः भाजप आणि विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) तगडी फाईट देणारा विरोधी पक्षातील चेहरा कोण, काँग्रेसचा नवा अध्यक्ष (Congress President) कोण, या प्रश्नांना येत्या काही दिवसातच उत्तर मिळण्याची शक्यता आहे.  येत्या 28 ऑगस्ट रोजी काँग्रेसच्या वर्किंग कमिटीची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या नेतृत्वात होणाऱ्या या बैठकीत अध्यक्षपदाच्या निवडीबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांनी ‘गांधी’ घराण्यातील व्यक्ती अध्यक्ष पदावर विराजमान होणार नाही, असे वक्तव्य केल्यानंतर या व्यतिरिक्त कोणत्या नेत्याला हे स्थान मिळू शकते, याबद्दलच्या चर्चांना उधाण आलंय. आगामी काही दिवसातच ‘गांधी’ व्यतिरिक्त काँग्रेसचा अध्यक्ष कोण होतोय, हे स्पष्ट होईल. या स्पर्धेत अशोक गहलोत यांचं नाव चर्चेत आहे. 28 ऑगस्ट रोजीच्या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष निवडीची तारीख ठरणार आहे.

अध्यक्ष गांधी घराण्याबाहेरचा?

राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाची जबाबादारी स्वीकारावी, अशी काँग्रेसमधील बहुतांश नेत्यांची भूमिका आहे. मात्र राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पक्षाचे अध्यक्ष होण्यास नकार दिला आहे. सोनिया गांधी आता प्रकृती अस्वास्थ्यामुळे हे पद सांभाळू इच्छित नाहीत. मात्र मागील दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये पराभव झाल्यामुळ गांधी घराण्यातील कुणीही व्यक्ती अध्यक्षपदी नको, या भूमिकेवर राहुल गांधी ठाम आहेत. त्यामुळे प्रियंका गांधी यांनीही या पदावर विराजमान होऊ नये, असे त्यांचे मत आहे.

स्पर्धेत गहलोत यांचे नाव पुढे…

दरम्यान, काँग्रेसचे अध्यक्ष पदाच्या स्पर्धेत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे नाव सर्वात पुढे आहे. गहलोत यांना माध्यमांनी यावर प्रतिक्रिया विचारली असता, सध्या तरी मला याविषयी माहिती नाही. मला जे काम सोपवण्यात आलंय, ते प्रामाणिकपणे करतोय, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. मात्र देशातील जनतेच्या भावना लक्षात घेता राहुल गांधींनीच हे पद स्वीकारावे, असं वक्तव्य गहलोत यांनी केलं होतं. गहलोत यांच्यासोबतच मध्य प्रदेशचे कमलनाथ, माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे, मल्लिकार्जुन खरगे, मुकुल वासनिक, माजी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांचंही नाव चर्चेत आहे.

भाजपसोबत आम आदमी पार्टीचं आव्हान

देशभरात पसरलेलं भाजपचं नेटवर्क आणि आम आदमी पार्टीचा वाढता प्रभाव ही दोन मोठी आव्हानं काँग्रेससमोर आहेत. भाजपने संपूर्ण देशभरात काँग्रेसमुक्त भारताचा नारा दिलाय तर दिल्ली, पंजाबनंतर आता गुजरातमध्ये पाय पसरण्यासाठी आपने कंबर कसली आहे. अशा स्थितीत आगामी काँग्रेस अध्यक्षांवर मोठी जबाबदारी असेल. 2024 मधील लोकसभा निवडणुसांसह विविध राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये काहीतरी करिश्मा दाखवणारा नेताच अध्यक्षपदी विराजमान व्हावा, अशी विरोधकांचा सूर आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.