‘आशिष शेलारांचे आरोप बालिशपणाचे, त्यांची कीव येते’, नाना पटोलेंचा पलटवार
भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी या प्रकरणात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. त्या आरोपांवर आता नाना पटोले यांनीही पलटवार केलाय.
मुंबई : सचिन वाझे प्रकरणात आता राज्यात जोरदार राजकारण रंगलेलं पाहायला मिळत आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी या प्रकरणात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. त्या आरोपांवर आता नाना पटोले यांनीही पलटवार केलाय. सचिन वाझे यांनी वापरलेल्या आणि सध्या NIA ने तपासासाठी ताब्यात घेतलेल्या मर्सिडीज 4 मॅटिक कारवरुन हे आरोप लावण्यात आले आहेत. शेलार यांनी केलेल्या या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.(Nana Patole responds to allegations made by Ashish Shelar on Sachin Waze case)
दरम्यान, आशिष शेलार यांचा आरोप बालिशपणाचा आहे. त्यांच्या आरोपांची कीव येत असल्याचा पलटवार नाना पटोले यांनी केलाय. शेलार हे अशाप्रकारचे आरोप करुन लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. पेट्रोल, डिझेल दरवाढीकडे लोकांचं लक्ष जाऊ नये म्हणून हा विषय लावून धरला जात असल्याचं पटोले म्हणाले. तसंच अंबानींची वकिली करण्याचा अधिकार यांना कुणी दिला? असा सवालही पटोले यांनी केलाय. महाविकास आघाडी सरकारमध्ये कुठलेही मतभेद नसल्याचा दावाही त्यांना केला आहे.
आशिष शेलारांचा आरोप काय?
भाजप नेते आशिष शेलार यांनी काँग्रेस नेत्यांवर गंभीर आरोप केला आहे. वाझे यांना कार घेण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी मदत केल्याचा गंभीर आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन वाझे प्रकरणावरून काँग्रेस नेत्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. नाना पटोले आणि सचिन सावंत यांनीच कार घेण्यासाटी वाझेंना मदत केल्याची माहिती पुढे येत आहे. आपल्याकडे चौकशीचा अंगुली निर्देश होऊ नये म्हणून या दोन्ही नेत्यांकडून बिनबुडाचे आरोप सुरू आहेत. याची तपास यंत्रणेने चौकशी करावी, अशी मागणी शेलार यांनी केली.
हाच का तो ‘किमान समान कार्यक्रम’
एका एपीआयला वाचवण्याची सरकार धडपड का करत आहे, हे आता दिसून आलं आहे. वाझेंच्या गाडीत नोटा मोजण्याची मशीन सापडली आहे. यावरून हाच का तो ठाकरे सरकारचा ‘किमान समान कार्यक्रम’ आहे का हे दिसून आलं आहे, असा टोला लगावतानाच एका एपीआयला पैसे मोजण्याची मशीन का लागत होती? वाझे ही मशीन घेऊन का फिरत होते? असा सवालही त्यांनी केला.
संबंधित बातम्या :
मोठी बातमी: NIA चे अधिकारी सचिन वाझेंना पीपीई किट घालून चालायला लावणार
स्कॉर्पिओ गाडीवर सचिन वाझेंच्या हाताचे ठसे; NIA ने पुरावे दाखवल्यानंतर वाझेंची बोलती बंद
Nana Patole responds to allegations made by Ashish Shelar on Sachin Waze case