Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपच्या गडात काँग्रेस लागली कामाला, नाना पटोलेंचं ‘मिशन विदर्भ’, भाजपवासी झालेल्या अनेकांची घरवापसी होणार!

विधानसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेसला रामराम ठोकत भाजपवासी झालेल्या अनेक नेत्यांची यावेळी घरवापसी होणार असल्याचा दावा पटोले यांनी केलाय.

भाजपच्या गडात काँग्रेस लागली कामाला, नाना पटोलेंचं 'मिशन विदर्भ', भाजपवासी झालेल्या अनेकांची घरवापसी होणार!
Follow us
| Updated on: Jun 05, 2021 | 5:41 PM

नागपूर : भाजपचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विदर्भात आता काँग्रेस कामाला लागल्याचं पाहायला मिळत आहे. प्रदेश काँग्रेसचं उद्यापासून मिशन विदर्भ सुरु होणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उद्यापासून संपूर्ण विदर्भाचा दौरा सुरु करणार आहेत. विदर्भात संघटना मजबूत करण्यावर आता काँग्रेसचा भर असणार आहे. नाना पटोले रविवारी गोंदियामधून आपल्या दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेसला रामराम ठोकत भाजपवासी झालेल्या अनेक नेत्यांची यावेळी घरवापसी होणार असल्याचा दावा पटोले यांनी केलाय. (Nana Patole’s Mission Vidarbha, visit every district of Vidarbha from tomorrow)

विदर्भ हा भाजपचा गड म्हणून ओळखला जातो. भाजपचा हा गड भेदण्यासाठी काँग्रेसचं मिशन विदर्भ सुरु झालंय. पक्ष मजबूत करणे, पक्ष सोडून गेलेल्या कार्यकर्त्यांना परत आणणे, कार्यकर्त्यांना पुढील कार्यक्रम देणे, यासाठी नाना पटोले उद्यापासून विदर्भाचा दौरा करणार आहेत. विदर्भातील प्रत्येक जिल्हयात जावून ते पक्ष उभारणीवर विशेष भर देणार आहे. नाना पटोले उद्या गोंदिया जिल्ह्यापासून आपल्या विदर्भ दौऱ्याला सुरुवात करणार आहेत, तशी माहिती त्यांनी दिलीय.

‘..तर 2024 मध्ये काँग्रेस स्वबळावर सत्तेत येईल’

उत्तर महाराष्ट्र हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता, आता पुन्हा या भागातून लोकसभा, विधानसभेचे प्रतिनिधित्व वाढवून 2024 मध्ये काँग्रेस स्वबळावर सत्तेत येईल, यासाठी काम करा असे, असे आवाहन पटोले यांनी गुरुवारी केलंय. काँग्रेस पक्ष हा देशाला तारणारा, सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारा पक्ष असून, भारतीय जनता पक्षाने खोटी स्वप्ने दाखवून देशाला अधोगतीकडे नेण्याचे काम केले. लोकांचा आता भाजपावरचा विश्वास उडाला असून, काँग्रेसचा विचारच देशाच्या हिताचा आहे हे लोकांना पटल्यानेच आज धुळे जिल्ह्यातील विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या पदाधिकाऱ्यांच्या काँग्रेस प्रवेशाने उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेस पक्ष संघटनेला बळकटी मिळून उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसचा झेंडा पुन्हा मानाने फडकत राहील, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.

माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी काँग्रेस पक्षात घरवापसी

गांधी भवन येथे नाना पटोले यांच्या उपस्थितीत गुरुवारी धुळे ग्रामीणचे माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी काँग्रेस पक्षात घरवापसी केली. त्यांच्यासोबत माजी नगरसेवक, माजी जिल्हा परिषद सदस्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना पक्षातील शेकडो सदस्यांनीही काँग्रेस पक्षात प्रवेश केला. नाना पटोले पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्षाला गतवैभव मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्रपणे काम केले पाहिजे. उत्तर महाराष्ट्र हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता आता पुन्हा या भागातून लोकसभा, विधानसभेचे प्रतिनिधित्व वाढवून 2024 मध्ये काँग्रेस स्वबळावर सत्तेत येईल यासाठी काम करा असे, आवाहन करून शरद पाटील यांच्यासह पक्षात प्रवेश केलेल्या सर्वांचे त्यांनी काँग्रेस परिवारात स्वागत केले.

संबंधित बातम्या :

‘भाजपनेच ओबीसी आरक्षणाचा मुडदा पाडला, आता चोराच्या उलट्या बोंबा’, पटोलेंचा पलटवार

आधी मुंबईत घोषणा, आता नवी मुंबईत एल्गार, काँग्रेस स्वतंत्र निवडणूक लढणार

Nana Patole’s Mission Vidarbha, visit every district of Vidarbha from tomorrow

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.