नेतेमंडळींनो बोलताना जरा जपूनच… तुमच्यावर मोबाईल कॅमेराची बारीक नजर!, सायबर तज्ज्ञांचा पुढाऱ्यांना मोलाचा सल्ला
काही वेळा लोकांशी संवाद साधताना नेते आपल्या बोलीभाषेत बोलतात, त्याचे दुसऱ्या ठिकाणी वेगळे अर्थ होतात. तसंच दुसऱ्या नेत्यांबाबत किंवा महिलांबाबत असंसदीय वक्तव्य केलं जातं. असं विवादीत वक्तव्य कुणी चोरुन मोबाईलवर रेकॅार्ड केलं आणि ते सोशल मिडियावर व्हायरल झाल्यास, संबंधित नेत्याला त्याचा फटका बसू शकतो, त्यामुळे नेत्यांनो तोलून मापून बोला, असा सल्ला अजित पारसे यांनी नेतेमंडळींना दिलाय.
नागपूर : सध्या विविध पक्षाचे अनेक नेते वादग्रस्त वक्तव्यांमुळे चांगलेच चर्चेत येतात. तर काही नेते आपल्या बोली भाषेमुळं कधी अडचणीतही येतात. सध्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) मोदींवरील केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत सापडले आहेत. भाजप नेत्यांकडून पटोले यांच्यावर जोरदार टीका सुरु आहे. या पार्श्वभूमीवर सायबर तज्ज्ञ अजित पारसे (Ajit Parase) यांनी नेत्यांना मोलाचा आणि महत्वाचा सल्ला दिलाय.
नेत्यांच्या व्हायरल झालेल्या ॲाडीओ, व्हिडीओ क्लीप त्यांच्यासाठी अडचणीच्या ठरत आहेत. गेल्या काही काळात राज्यातील आणि देशातील अनेक नेत्यांच्या क्लिप व्हायरल झाल्या आणि त्या वाऱ्याच्या वेगानं सोशल माध्यमात फिरत राहिल्या. याचा फटका त्या नेत्यांना बसला. त्याचबरोबर त्यांच्या वक्तव्यामुळे समाजात तणाव निर्माण झाल्याचेही उदाहरणं आहेत. त्यामुळे नेते, पुढारी, मंत्री, आमदार, खासदार अशा मंडळींनी बोलताना काळजी घेणं गरजेचं आहे. काही वेळा लोकांशी संवाद साधताना नेते आपल्या बोलीभाषेत बोलतात, त्याचे दुसऱ्या ठिकाणी वेगळे अर्थ होतात. तसंच दुसऱ्या नेत्यांबाबत किंवा महिलांबाबत असंसदीय वक्तव्य केलं जातं. असं विवादीत वक्तव्य कुणी चोरुन मोबाईलवर रेकॅार्ड केलं आणि ते सोशल मिडियावर व्हायरल झाल्यास, संबंधित नेत्याला त्याचा फटका बसू शकतो, त्यामुळे नेत्यांनो तोलून मापून बोला, असा सल्ला अजित पारसे यांनी नेतेमंडळींना दिलाय.
नाना पटोलेंचं मोदींबाबतचं वादग्रस्त वक्तव्य काय?
“मी का भांडतो? मी आता मागील 30 वर्षापासून राजकारणात आहे. लोकं पाच वर्षात आपल्या एका पिढीचा उद्धार करुन टाकतात. शाळा, कॉलेज हे करुन आपल्या एक-दोन पिढीचा उद्धार करुन टाकतात. मी एवढ्या वर्षाच्या राजकारणात एक शाळा नाही घेतली. एक ठेकेदारी नाही केली. जो आला त्याला मदत करतो. म्हणून मी मोदीला मारु शकतो, त्याला शिव्या देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आला. एक प्रमाणिक नेतृत्व तुमच्या इथे आहे….”असं आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्य नाना पटोले यांनी केल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला आणि ऐकायला मिळत आहे. या वक्तव्यामुळे नाना पटोले चांगलेच वादात सापडले आहेत.
‘साला’वरुन दानवेही आले होते अडचणीत
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे आपल्या भाषाशैलीमुळे चांगलेच चर्चेत असतात. त्यांची भाषणं म्हणजे निखळ हास्याची मैफिल असते. मात्र, दानवेही अनेकदा आपल्या याच भाषाशैलीमुळे अडचणीत आले आहेत. दानवे यांनी बोलताना एकदा ‘साला’ या शब्दाचा वापर केला होता. त्यावरुन विरोधकांनी दानवे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. दानवे शेतकऱ्यांना साला म्हणाल्याचा दावा विरोधकांनी केला होता. त्यामुळे बोली भाषेत किंवा आपल्या भागातील प्रचलित शब्दाचा दुसऱ्या भागात काही वेगळाच अर्थ होऊ शकतो, हे लक्षात घेऊन नेतेमंडळींनी बोलायला हवं, असा सल्ला आता सायबर तज्ज्ञांनी दिलाय.
इतर बातम्या :