Abdul Sattar : चंद्रकांत खैरे यांचे डोके तपासावे लागेल, खोके प्रकरणावरुन कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची जहरी टीका, खैरेंना देणार हे काम..

Abdul Sattar : खोक्यावरुन चंद्रकांत खैरे यांच्या आरोपानंतर नवे वादंग उठले आहे..

Abdul Sattar : चंद्रकांत खैरे यांचे डोके तपासावे लागेल, खोके प्रकरणावरुन कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची जहरी टीका, खैरेंना देणार हे काम..
सत्तार यांचा पलटवारImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 01, 2022 | 10:57 PM

नवी दिल्ली : राज्याच्या राजकारणात खोक्याला (Khoke)अनन्यसाधारण महत्व आले आहे. खोके सरकारवरुन पावसाळी अधिवेशनात विरोधक (Opposition) आणि सरकारमध्ये (Government) वाद टोकाला पोहचला होता. त्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटात खोक्यावरुन शाब्दिक चकमक सुरुच आहेत. त्यात शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंच्या (Chandrakant Khaire) एका वक्तव्यावरुन पुन्हा वाद उफळला आहे. खैरेंच्या खोकेप्रकरणावरुन त्यांचे डोके तपासावे लागेल, अशी जहरी टीका कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बंडखोर आमदारांनी पुन्हा एकदा गुवाहाटी दौरा केला. कामाख्या देवीची पूजा केली. या दौऱ्यावर विरोधी पक्षाने तोंडसूख घेतले. आमदार फुटू नये यासाठीच हा दौरा काढण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.

चंद्रकांत खैरे यांनी तर गंभीर आरोप केला.गुवाहाटीला मुख्यमंत्र्यांसोबत गेलेल्या आमदारांना पाच-पाच कोटी रुपये मिळाल्याचा दावा करत, त्यांनी राज्याच्या राजकारणाच्या पिचवर आज जोरदार बँटिंग केली. त्यांच्या या दाव्यामुळे एकच खळबळ माजली.

हे सुद्धा वाचा

चंद्रकांत खैरे यांच्या वक्तव्यावर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. खोके प्रकरणावरुन त्यांचे डोके तपासावे लागेल, अशी जहरी टीका सत्तार यांनी केली. मुंबईत शिबिर आयोजीत करुन खैरेंचे डोके तपासावे लागेल असा पलटवार त्यांनी केला. खैरे यांनी त्यांच्याकडील जूने खोके मोजले नसावे, आमच्याकडेच खोके मोजण्यासाठी त्यांना पाठवून द्यावे लागतील, असा टोलाही सत्तार यांनी लगावला. खोके मुद्यावरुन विरोधक सरकारची नाहक बदनामी करत असल्याचा शिंदे गटाकडून दावा करण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वी नंदुरबार जिल्ह्यातील जाहीर सभेत गुलाबराव पाटील यांनी सुद्धा खोके मोजायला किती ट्रक लागले असते, असा सवाल करत, विरोधकांच्या आरोपावर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. पण खोके प्रकरण सरकारची पाठ सोडणार नसल्याचे एकंदरीत चित्र आहे.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.