पंकजा मुंडेंच्या जनता दरबारात राडा; महिलांची धक्काबुक्की
पंकजा मुंडेंच्या या जनता दरबारावेळी तुफान राडा पहायला मिळाल. यावेळी महिलांची धक्काबुक्की देखील झाली.
बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे(Pankaja Munde) या बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या संघर्ष योद्धा या भाजप कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. पंकजा मुंडे यांनी हा जनता दरबार घेतला. पंकजा मुंडेंच्या या जनता दरबारावेळी तुफान राडा पहायला मिळाल. यावेळी महिलांची धक्काबुक्की देखील झाली.
आपल्या समस्या मांडण्यासाठी या जनता दरबारात नागरीकांनी तुफान गर्दी केली होती. जनता दरबार संपल्यानंतर मात्र भाजप कार्यालयात एकच गोंधळ पहायला मिळाला.
काही महिलांनी भाजप कार्यकर्ता असलेल्या एका संस्थाचालकाला धक्काबुक्की केली. अनुरथ सानप असे संस्थाचालकाचे नाव आहे.
दरम्यान त्या संस्थाचालकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, माध्यमांशी बोलण्यास त्यांनी नकार दिला आहे. वडझरी येथील संत शिरोमणी भगवान बाबा प्राथमिक आश्रम शाळा आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षकांचा पगार संस्थाचालक उचलत असल्याचा आरोप आहे.
पगार मिळावा या मागणीसाठी काही शिक्षकांच्या पत्नीने पंकजा मुंडे यांच्याकडे दाद मागितली. मात्र, पंकजा मुंडेंनी देखील चौकशी करू असं उडवा उडवीचे उत्तर दिल्यानंतर पीडित शिक्षकांच्या पत्नीला अश्रू अनावर झाले.
यावेळी संस्थाचालने महिलांना शिवीगाळ करताच महिला आक्रमक झाल्या आणि पुन्हा मोठा गोंधळ उडाला. यावेळी या संतप्त महिलांनी संस्थाचालकाला धक्काबुक्की केली.