AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

किरीट सोमय्यांनी बोलताना भान ठेवावं, कोविड सेंटर काय कमाईचं साधन आहे का? गुलाबराव पाटलांचा पलटवार

सोमय्या यांनी आज मुंबईतील दहिसर, बीकेसी आणि नेस्को कोविड सेंटरला भेट दिली. त्यावेळी सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका करत, घोटाळा उघड करण्याचा इशारा दिलाय. तर सोमय्या यांच्या या इशाऱ्याला शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

किरीट सोमय्यांनी बोलताना भान ठेवावं, कोविड सेंटर काय कमाईचं साधन आहे का? गुलाबराव पाटलांचा पलटवार
किरीट सोमय्या, गुलाबराव पाटील
Follow us
| Updated on: Jan 08, 2022 | 3:24 PM

जळगाव : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी येत्या 10 दिवसांत ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा (Covid Center Scam) बाहेर काढणार असा इशारा दिला आहे. तसंच सोमय्या यांनी आज मुंबईतील दहिसर, बीकेसी आणि नेस्को कोविड सेंटरला भेट दिली. त्यावेळी सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray Government) जोरदार टीका करत, घोटाळा उघड करण्याचा इशारा दिलाय. तर सोमय्या यांच्या या इशाऱ्याला शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

सरकारवर आरोप करण्यासाठी जो तो खिशात कोरोना घेऊन फिरतोय. आली की टाकली पुडी… आली की टाकली पुडी… कोरोना काय कमाईचं साधन आहे का? असा सवाल पाटील यांनी केलाय. कोरोनावरुन काहीही बोलायचं आणि कोणतेही आरोप करायचे असा प्रकार सध्या सुरु आहे. सोमय्यांसारख्या माणसाने असे आरोप करणे बरोबर नाही. जिल्हा रुग्णालय काय कमाईचं साधन आहे का? कोरोना काळात लोक सेवाभावी वृत्तीने लोक शासनाला मदत करत आहेत. त्यामुळे सोमय्या यांनी बोलताना भान ठेवलं पाहिजे. त्यांनी कोरोना जाऊ दे म्हणून देवाला साकडं घातलं पाहिजे, असा सल्लाही पाटील यांनी सोमय्या यांना दिलाय.

किरीट सोमय्यांचा इशारा काय?

येत्या दहा दिवसात ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा बाहेर काढणार असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. आर्थिक कमाईसाठी सत्ताधाऱ्यांकडून घाबरवण्याचं काम सुरु आहे, असा आरोपही त्यांनी केलाय. मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा वाढला असला तरी कोविड सेंटर्स रिकामे आहेत. बीकेसीमध्ये 2 हजार 400 बेडपैकी 800 बेडवर रुग्ण आहेत. दहीसरमध्ये 750 बेड आहेत पण अजून एकही रुग्ण तिथे दाखल नाही. नेस्को सेंटरमध्ये 2 हजार बेड्सपैकी 900 बेड भरले आहेत. याचा अर्थ 98 टक्के रुग्ण आपल्या घरी किंवा नर्सिंग होममध्ये बरे होतात. तसंच ज्यांचे लसीकरण झाले आहे त्यातील 99.99 टक्के लोक सुरक्षित असल्याचा दावाही सोमय्यांनी केलाय.

‘काही अधिकारी मुद्दाम घाबरवण्याचं काम करत आहेत’

त्याचबरोबर काही आयएएस अधिकारी मुद्दाम घाबरवण्याचं काम करत आहेत. कारण कोविड सेंटर हे त्यांच्यासाठी कमाईचं साधन आहे. येत्या 10 दिवसात मी ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा प्रसिद्ध करणार आहे. सगळ्या घोटाळ्यांचे कागदपत्र मी जनतेसमोर आणणार असल्याचा इशाराही सोमय्यांनी दिलाय. मुंबई महापालिकेचे आयुक्त टेन्शन का पसरवत आहेत? आर्थिक कमाईसाठी सत्ताधाऱ्यांकडून घाबरवण्याचं काम सुरु आहे, असा आरोपही त्यांनी केलाय.

इतर बातम्या : 

MSEC Scholarship Result Topper : पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत सातारा, अहमदनगरचा डंका, गुणवत्ता यादी जाहीर

मंजूर है, मंजूर है.. च्या यादीत अचानक 6 वर्षांपूर्वीचा प्रस्ताव आला अन् औरंगाबाद ZP महिला सदस्या आक्रमक झाल्या, काय घडलं?

मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'
मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'.
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?.
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?.
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?.
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती.
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर.
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्...
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्....
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून...
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून....
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने.
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी.