Hanuma Vihari | वैयक्तिक टीका करणं अयोग्य, खासदार सुप्रियोंच्या टीकेवर हनुमा विहारीचा स्ट्रेट ड्राईव्ह
तु क्रिकेटची हत्या केलीस, असा आरोप भाजप खासदार बाबुल सुप्रियो यांनी क्रिकेटपटू हनुमा विहारीवर केला होता.
मुंबई : “प्रत्येकाला क्रिकेट आवडतं. अनेकाचं क्रिकेटवर प्रेम आहे. पण क्रिकेटबाबतीत प्रत्येकाचे विचार हे वेगवेगळे आहेत. याबाबतीत काहीच वाद नाही. पण कोणावर वैयक्तिक टीका करणं हे अयोग्य आहे. मी अशा वक्तव्यांकडे दुर्लक्ष करतो”, अशा शब्दात टीम इंडियाचा (Team India) संकटमोचक हनुमा विहारीने (Hanuma Vihari) भाजप खासदार बाबुल सुप्रियो (Bjp Mp Babul Supriyo) यांच्या टीकेला प्रत्युतर दिलंय. विहारीने एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली. यादरम्यान त्याने याबाबत प्रतिक्रिया दिली. तु क्रिकेटची हत्या केलीस अशी टीका सुप्रियो यांनी केली होती. (Cricketer Hanuma Vihari responds to BJP MP babul supriyo criticism)
“मी अशा वक्तव्यांना महत्व देत नाही. अशा गोष्टी मी फार मनावरही घेत नाही. सुप्रियो यांनी ट्विटमध्ये माझ्या नावाचा उल्लेख चुकीचा केला होता. यासाठी मी सुप्रियोंच्या ट्विटला उत्तर दिलं”, असंही विहारीने स्पष्ट केलं. सुप्रियो यांनी ट्विटमध्ये हनुमाचं आडनाव चुकवलं होतं. त्यांनी ट्विटमध्ये विहारी ऐवजी बिहारी लिहिलं होतं. यावर विहारीने आपलं नाव लिहून सुप्रियो यांना त्यांची चूक लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला होता.
*Hanuma Vihari
— Hanuma vihari (@Hanumavihari) January 13, 2021
सुप्रियो काय म्हणाले होते?
हनुमा विहारीने ऑस्ट्रेलियाविरोधातील तिसऱ्या सामन्यातील चौथ्या डावात 109 चेंडूत 7 धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे भारताला हा तिसरा सामना अनिर्णित राखण्यास यश आले. विहारीच्या संथ खेळीवरुन सुप्रियो यांनी ट्विटद्वारे टीका केली होती. “हा अत्याचार आहे. हनुमा विहारीने भारताच्या ऐतिहासिक विजयाच्या शक्यतेलाच मारले नाही, तर त्याने क्रिकेटची हत्या केली. विजयाकडे पर्याय म्हणून न बघणे, मग तो कितीही दुरापास्त असू दे, असे करणे म्हणजे गुन्हा आहे, असं सुप्रियो ट्विटमध्ये म्हणाले होते. पण आपल्याला क्रिकेटमधील काहीही कळत नाही, असं स्पष्टीकरणही सुप्रियोंनी दिलं होतं.
If Hanuma showed this little initiative of just standing& hitting the BAD BALLS for boundaries, India may hv got this historic win GIVEN that Pant did what no one expected•And, I am reiterating that it's ONLY the bad balls that cud hv been hit given Hanuma was set batman by then https://t.co/C8Z5YKOHCk
— Babul Supriyo (@SuPriyoBabul) January 11, 2021
“जर हनुमा विहारीने खेळपट्टीवर फक्त उभे राहण्यापेक्षा वाईट चेंडूंवर चौकार मारले असते तर कदाचित भारताला ऐतिहासिक विजय मिळाला असता. कोणी अपेक्षा केली नव्हती, ते पंतने करुन दाखवले. हनुमा विहारी खेळपट्टीवर स्थिरावला होता. त्यामुळे त्याने खराब चेंडूंवर चौकार ठोकायला पाहिजे होते, असेही सुप्रियो म्हणाले होते.
अश्विन आणि विहारीची झुंजार खेळी
ऑस्ट्रेलियाविरोधातील तिसऱ्या सामन्याच्या चौथ्या दिवशी टीम इंडियाला विजयासाठी 300 पेक्षा अधिक धावांची आवश्यकता होती. पुजारा आणि पंत ही सेट जोडी बाद झाली. त्यामुळे सामना रंगतदार स्थितीत आला होता. मात्र विजयासह पराभवाची शक्यता होती. यामुळे आक्रमकपणे न खेळता सावध खेळणं अश्विन आणि विहारीने पसंत केलं. यामुळे अश्विन आणि विहारीने सामना अनिर्णित करण्याच्या उद्देशाने खेळी केली. या दोघांनी कांगारुंना चांगलचं रडवलं. दोघांनी मैदानात घट्ट पाय रोवले. झुंजार खेळी केली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी पाचव्या दिवसखेर 259 चेंडूत 62 धावांची भागीदारी केली. यामध्ये हनुमा विहारीने 161 चेंडूत 23 धावा तर, रवीचंद्रन अश्विनने 128 चेंडूत 39 धावा केल्या होत्या.
संबंधित बातम्या :
Hanuma Vihari | हनुमा विहारीचे भाजप खासदाराला सणसणीत प्रत्युत्तर, म्हणाला…
तू क्रिकेटची हत्या केलीस; भाजपचे खासदार महाशय हनुमा विहारीवर भडकतात तेव्हा…
(Cricketer Hanuma Vihari responds to BJP MP babul supriyo criticism)