AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ब्रेकिंग! मुख्यमंत्र्यांकडून पुन्हा मोठे फेरबदल, 20 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे बदली?

मुंबई, औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांसह नेमक्या कुणाकुणाच्या बदल्या केल्या? जाणून घ्या सविस्तर

ब्रेकिंग! मुख्यमंत्र्यांकडून पुन्हा मोठे फेरबदल, 20 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे बदली?
अधिकाऱ्यांच्या पुन्हा बदल्याImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Oct 13, 2022 | 8:17 AM
Share

अमरदीप वाघमारे, TV9 मराठी, मुंबई : राज्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या पुन्हा एकदा बदल्या (IAS Officer Transfers) करण्यात आल्यात. बुधवारी 20 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या (Officers Transfer order) करण्यात आल्या असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये राज्यातील महत्त्वाच्या शहरांमधील जिल्हाधिकाऱ्यांसह एकूण 20 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडून प्रशासनात मोठा प्रमाणात फेरबदल करण्यात आले आहेत.

पाहा व्हिडीओ :

मुंबईचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांची वैद्यकीय शिक्षण आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तर अस्तिमक कुमार पांडे यांची औरंगाबादत जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच राज्यात 44 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आणखी 20 अधिकाऱ्यांच्या बदलीचा आदेशही जारी करण्यात आलाय.

कुणा कुणाची बदली?

  1. विरेंद्र सिंह – IAS (2006) – वैद्यकीय शिक्षण, आयुक्तपदावरुन महाराष्ट्र आयटी कॉर्पोरेशचे एमडी म्हणून बदली
  2. मिताली सेठी IAS-2017 – डायरेक्टर, वानामती, नागपूर
  3. सुशील चव्हाण IAS-2007 – औरंगाबादच्या जिल्हाधिकारी पदावरुन मुंबईत असंघटीत कामगार डेव्हलपमेन्ट कमिशनर म्हणून बदली
  4. अजय गुल्हाने, IAS-2010 – चंद्रपूर जिल्हाधिकारी पदावरुन आता अतिरीक्त पालिका आयुक्त नागपूर म्हणून बदली
  5. दीपक कुमार मीना IAS-2013 – नागपूर पालिकेचे अतिरीक्त आयुक्त पदावरुन अतिरीक्त आदिवासी आयुक्त, ठाणे म्हणून बदली
  6. विनय गोवडा IAS-2015 – सीईओ, जिल्हा परीषद साताराहून आता चंद्रपूरचे जिल्हाधिकारी म्हणून बदली
  7. आर.के. गावडे IAS-2011 – नंदुरबार झेडपी सीईओ पदावरुन आता मुंबई अतिरीक्त निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती
  8. माणिक गुरसल IAS-2009 – अतिरीक्त आयुक्त (उद्योग)
  9. शिवराज श्रीकांत पाटील IAS-2011 – महानंद मुंबईचे एमडी म्हणून नियुक्ती
  10. अस्तिक कुमार पांडे IAS-2011 – औरंगाबादचे जिल्हाधिकारी
  11. लीना बनसोड IAS-2015 – एमडी, एम.एस को ऑप. ट्रायबल देवे. कॉर्पोरेशन, नाशिक म्हणून नियुक्ती
  12. दीपक सिंगला IAS-2012- एमएमआरडीचे जॉईन्ट कमिशन म्हणून मुंबईत नियुक्ती
  13. एस.एस माळी IAS-2009 – संचालक, ओबीसी बहुजन वेल्फेअर संचालनालय, पुणे म्हणून नियुक्ती
  14. एस.सी. पाटील IAS-9999 – जॉईन्ट सेक्रेटरी म्हणून मुख्यमंत्री कार्यालय, मंत्रालय, मुंबईत येथे नियुक्ती
  15. डी.के खिलारी IAS-9999 – सातार झेडपी सीईओ म्हणून नियुक्ती
  16. एस.के. सलिमनाथ IAS-2011 – सिडको, मुंबई येथे जॉईन्ट एमडी म्हणून नियुक्ती
  17. एस.एम.कुर्तकोटी IAS-9999 – नंदुरबार झेडपीचे सीईओ म्हणून नियुक्ती
  18. राजीव निवतकर IAS-2010 -मुंबई जिल्हाधिकारीसह वैद्यकीय शिक्षण संचालक म्हणून नियुक्ती
  19. बी.एच पालवे IAS-9999 – अतिरीक्त विभागीय आयुक्त नाशिक म्हणून नियुक्ती
  20. आ.एस. चव्हाण IAS-9999 – जॉईन्ट सेक्रेटरी, रेव्हेन्यू स्टॅम्ट आणि वनविभाग, मंत्रालय मुंबई म्हणून नियुक्ती

बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 20 अधिकाऱ्यांच्या बदलीचा आदेश जारी केलाय. याआधी 44 अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली होती. त्यामुळे एकूण 64 अधिकाऱ्यांच्या बदल्या आतापर्यंत शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात करण्यात आल्या आहेत.

भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.