मनमोहन सिंग यांच्या काळात पेट्रोलचा दर किती आणि आता किती?, अर्थसंकल्पात बोलेनच, अजितदादांनी सुनावलं

वाढत्या इंधन दरवाढीचा मुद्दा महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सातत्याने चर्चिला जात आहे. | DCM Ajit Pawar

मनमोहन सिंग यांच्या काळात पेट्रोलचा दर किती आणि आता किती?, अर्थसंकल्पात बोलेनच, अजितदादांनी सुनावलं
अजित पवार
Follow us
| Updated on: Apr 19, 2023 | 1:02 PM

मुंबई : वाढत्या इंधन (Petrol Diesel hike) दरवाढीचा मुद्दा महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Maharashtra Budget Session 2021) सातत्याने चर्चिला जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग (Dr Manmohan Sing) यांच्या कार्यकाळातील पेट्रोल डिझेलच्या दराचा दाखला देत केंद्र सरकारवर तसंच भाजपवर शरसंधान साधलं तसंच 8 तारखेला मांडल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पात मी याविषयावर बोलेनच, असंही सुनावलं. (DCM Ajit Pawar On Petrol Diesel Price)

अजित पवार नेमकं काय म्हणाले?

“पेट्रोलवर केंद्र सरकारने लावलेले कर किमतीपेक्षा जास्त आहेत, असा आरोप करत या राज्य सरकारने पूर्वीच्या सरकारने ठेवलेले दर कायम ठेवले आहेत, असं अजित पवार म्हणाले. पेट्रोलचे डिझेलचे सध्याचे आंतराष्ट्रीय बाजार प्रति बॅरल 63 डाॅलर असताना इतके दर वाढत आहेत. मनमोहन सिंग यांच्या काळात प्रति बॅलर 103 डॉलर होते”, असंही अजित पवार सांगायला विसरले नाहीत.

“केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीपेक्षा जास्त कर लावले आहेत. आम्ही अधिकचे टॅक्स लावलेले नाहीत. ते पहिलेच आहेत, आम्ही यामध्ये अजिबात जास्तीचे कर लावलेले नाहीत. आमची टॅक्स लावायची भूमिका नाही”, असंही अजित पवार म्हणाले.

राज्यपालांनी वेळ दवडू नये, त्या 12 लोकांना घटनेने सभागृहात बसण्याचा अधिकार दिलाय

राज्यपालांनी 12 आमदारांच्या प्रस्तावावर अजूनही कोणताही निर्णय घेतलेला नाही. यावर बोलताना अजित पवार म्हणाले, “राज्यपालांनी सामंजस्य भूमिका दाखविली तर राज्यात वातावरण चांगलं राहील. संबंधित 12 लोकांना देखील कायद्याने आणि घटनेने सभागृहात बसण्याचा अधिकार दिला आहे”.

शरजील प्रकरणात कुणालाही पाठीशी घालणार नाही

“शरजील प्रकरणात आम्ही गुन्हा दाखल केला आहे. पोलीस तपास करीत आहेत. लोकांच्या भावना भडकविण्याचे काम कोणीही करु नये. कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही”, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आश्वस्त केलं.

तथाकथित पत्रकाराने व्हाट्सअ‌ॅपच्या माध्यमातून देशाच्या सुरक्षितेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं

“एक तथाकथित पत्रकाराने व्हाट्सएपच्या माध्यमातून देशाच्या सुरक्षितेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर एक सदस्य मंत्रालय बाहेर आंदोलन करीत होते जिथे आंदोलक कमी होते”, असा टोला त्यांनी अर्णब गोस्वामी आणि आमदार राम कदम यांना लगावला.

हे ही वाचा :

‘त्या’ महिलेनेच अंगातील झगा काढला, गृहमंत्र्यांनी सांगितलं जळगाव वसतीगृहात त्यादिवशी नेमकं काय घडलं?

अजित पवारांविरोधात सुधीर मुनगंटीवारांचा हक्कभंग प्रस्ताव, जर प्रस्ताव सिद्ध झाल्यास शिक्षा काय?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.