AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माणिकराव कोकाटे बैठकीला उशिरा पोहोचले, पुढे जे झाले ते… अजितदादांना संताप अनावर!

बैठकीला अर्धा तास उशिराने पोहोचल्यामुळे अजित पवार हे माणिकराव कोकाटे यांच्यावर संतापले आहेत.

माणिकराव कोकाटे बैठकीला उशिरा पोहोचले, पुढे जे झाले ते... अजितदादांना संताप अनावर!
manikrao kokate and ajit pawar
| Updated on: Apr 08, 2025 | 10:05 PM
Share

मुंबई : अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी कर्जमाफीबाबत केलेल्या विधानामुळे चांगलाच वाद झाला होता. त्यांनी केलेल्या विधानाचा निषेध करून विरोधकांनी त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली होती. त्यानंतर कोकाटे यांनी त्यांनी केलेल्या विधानाबाबत दिलगिरी व्यक्त केली होती. असे असतानाच आता बैठकीला अर्धात उशिराने पोहोचल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोकाटे यांना खडे बोल सुनावले असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

माणिकराव कोकाटे अर्धा तास उशिरा पोहोचले

दर मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक होते. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी ही बैठक झाली. आजच्या बैठकीला कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे अर्धा तास उशिराने पोहोचले. याच कारणामुळे अजित पवार संतापले होते. सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनता दरबारालाही माणिकराव कोकाटे अनुपस्थित राहात होते, या सर्व बाबींचा आढावा अजित पवार यांनी या बैठकीत घेतला.

माणिकराव कोकाटे नेमंक काय म्हणाले होते?

माणिकराव कोकाटे काही दिवसांपूर्वी नाशिकच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यावर असताना त्यांनी अवकाळीमुळे शेतमालाच्या नुकसानीची पाहणी केली होती. याच पाहणीदरम्यान एका शेतकऱ्याने कर्जमाफी होणार का? असा सवाल कोकाटे यांना केला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना कोकाटे काहीसे संतापले होते. कर्जमाफीच्या पैशांचं काय करता. लग्न, साखरपुडे यासाठी हे पैसे वापरले जातात. तसेच कर्जमाफीतून मिळालेल्या पैशांचा उपयोग शेतीसाठी केला जातो का? असा सवालही त्यांनी केला होता. त्यांच्या याच विधानानंतर वाद झाला होता. विरोधकांनी त्यांनी मागावी तसेच पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती. नंतर कोकाटे यांनी केलेल्या विधानाबाबत दिलगिरी व्यक्त केली होती.

बैठकीला धनंजय मुंडे यांचीही उपस्थिती

दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीला अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी पक्षाचे अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. यात माजी मंत्री धनंजय मुंडे यांचाही समावेश होता.

मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.